गोल्डन गर्ल संयुक्ता काळे, सिद्धी हत्तेकर सज्ज, जिम्नॅस्टिकमध्ये महाराष्ट्र महिला टीमचे राहणार वर्चस्व
36 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा
गोल्डन गर्ल संयुक्ता काळे, सिद्धी हत्तेकर सज्ज, जिम्नॅस्टिकमध्ये महाराष्ट्र महिला टीमचे राहणार वर्चस्व
मिशन नॅशनल गेम्स:
-गत नॅशनल गेम्स मध्ये महाराष्ट्राचा महिला संघ उपविजेता-
-महिला व पुरुष संघाचा बालेवाडीत कसून सराव-
क्रीडा प्रतिनिधी/ पुणे: खेलो इंडिया स्पर्धेत विक्रमी सुवर्णपदके जिंकण्याची अपूर्व कामगिरी करणारी संयुक्ता काळे आता नॅशनल गेम्स मध्येही वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. पदार्पणातील या मोठ्या इव्हेंटमध्ये पुन्हा एकदा विक्रमाचा पल्ला गाठण्यासाठी ती उत्सुक आहे. तिच्यासह खेलो इंडियातील चार वेळची पदक विजेती सिद्धी हत्तेकर ही सर्वोत्तम कामगिरीसाठी सज्ज झाली आहे. मुख्य प्रशिक्षक प्रवीण ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचा महिला जिम्नॅस्टिक संघ सध्या पुण्यातील बालेवाडी मध्ये कसून सराव करत आहे. आगामी नॅशनल गेम्स मध्ये महाराष्ट्राचा बारा सदस्य महिला संघ सुवर्णपदकाचा बहुमान मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचबरोबर प्रशिक्षक योगेश शिर्के यांच्या खास ट्रेनिंग मधून पुरुष संघाने ही सर्वोत्तम कामगिरीचा दावा केला आहे.
गट केरळ येथील नॅशनल गेम्स मध्ये महाराष्ट्राच्या महिला संघाने उपविजेतेपदाचा बहुमान पटकावला होता. मात्र आता या कामगिरीमध्ये प्रगती साधत पुणेरी यश संपादन करण्यासाठी महिला संघाने कसून सराव केला आहे. आर्टिस्टिक जिम्मेस्टिक, रीदमिक जिम्नॅस्टिक या खेळ प्रकारामध्ये महाराष्ट्राच्या महिला खेळाडूंना सर्वोत्तम यश संपादन करण्याची संधी आहे. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि खेलो इंडिया स्पर्धेतील सुवर्ण कामगिरी करण्याचा मला मोठा अनुभव या सर्व महिला खेळाडूंच्या पाठीशी आहे. त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्राचे दोन्ही संघ यंदाच्या नॅशनल गेम्स मध्ये बदकाचा मोठा पल्ला गाठू शकतील असा विश्वास प्रशिक्षक प्रवीण ढगे आणि योगेश शिर्के यांनी व्यक्त केला आहे. गेल्या दोन आठवड्यापासून महाराष्ट्राचे दोन्ही संघ तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेत आहेत. 30 सप्टेंबर पासून जिम्नॅस्टिकच्या इव्हेंटला सुरुवात होईल. यासाठी महाराष्ट्राचे दोन्ही संघ 26 सप्टेंबर नंतर गुजरात मध्ये दाखल होणार आहे.
संयुक्तामुळे महाराष्ट्राचे पारडे जड:
खेलो इंडिया स्पर्धेमध्ये आपल्या सर्वोत्तम कामगिरीतून गोल्डन गर्ल संयुक्त कार्यालय सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आता आज सुवर्ण कामगिरीचा कितना गिरवण्यासाठी ती सज्ज झाली आहे. रीथमिक जिम्नॅस्टिक मध्ये तरबेज असलेल्या संयुक्त कडून महाराष्ट्र संघाला मोठ्या संख्येत सुवर्णपदकाची आशा आहे. 'आपण यंदाच्या नॅशनल गेम्स मध्ये महाराष्ट्राच्या शिर्केच्या मानाचा तुरा रोवण्यासाठी सज्ज आहे. यासाठी दोन आठवड्यात असून मी कसून सराव करत आहे. त्यामुळे निश्चितपणे मला सुवर्णपदकाचे टार्गेट पूर्ण करता येईल, असा विश्वास संयुक्ताने व्यक्त केला.
पदकाच्या सलामीसाठी सिद्धी सज्ज
खेलो इंडिया स्पर्धेत सातत्याने महाराष्ट्र संघाला जिम्नॅस्टिक मध्ये पदकाची सलामी देण्याची मोहीम औरंगाबादच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू सिद्धीने कायम ठेवली आहे. आता नॅशनल गेम्स मध्येही महाराष्ट्राला पदकाचे खाते उघडून देण्यासाठी ती सज्ज झाली आहे. तिची आतापर्यंतची कामगिरी लक्षवेधी ठरली आहे. तिच्याकडून महाराष्ट्र संघाला मोठ्या कामगिरीची आशा आहे.
Comments
Post a Comment