पीटीई अकॅडेमिक कॅनडामध्ये स्टुडन्ट डायरेक्ट स्ट्रीम व्हिसासाठी स्वीकारले जाणार
मे 29, 2023, मुंबई - शिक्षण क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी पीयर्सनला इमिग्रेशन, रेफ्यूजीज अँड सिटिझनशिप कॅनडाकडून (आयआरसीसी) पीटीई अकॅडेमिकसाठी मंजुरी मिळाली असून, त्यामुळे आता पीटीई अकॅडेमिक सर्व स्टुडन्ट डायरेक्ट स्ट्रीम अर्जांसाठी स्वीकारले जाणार आहे.
१० ऑगस्ट २०२३ पासून आयआरसीसी सर्व एसडीएस अर्जांसाठी पीटीई अकॅडेमिक स्वीकारले जाणार आहे.
या वर्षीच्या सुरुवातीला कॅनेडियन कायमस्वरूपी निवासी किंवा नागरिकत्वासाठी इंग्रजी भाषा नैपुण्याचा पुरावा म्हणून पीटीई कोरला आयआरसीसीने मंजुरी दिली होती.
अँटिगा व बार्बुडा, ब्राझील, चीन, कोलंबिया, कोस्टा रिका, भारत, मोरक्को, पाकिस्तान, पेरू, फिलिपिन्स, सेनेगल, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स, त्रिनिदाद आणि टोबॅगो व व्हिएतनाम येथून कॅनडामध्ये शिक्षणासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना एसडीएस ही जलद स्टडी परमिट प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
२०२२ च्या आयआरसीसीच्या आकडेवारीवरून दिसून येते की, या काळात कॅनडामध्ये जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची संख्या आजवरची सर्वात जास्त होती. ऑक्टोबर अखेरपर्यंत आयआरसीसीने २०२२ कॅलेंडर वर्षात ७,५०,३०० पेक्षा जास्त स्टडी परमिट अर्जांवर कार्यवाही केली होती.
युके, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या सरकारांनी सर्व व्हिसा अर्जांसाठी पीटीई अकॅडेमिक याआधीच स्वीकारले आहे. कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, आयर्लंड, युके आणि यूएसएमधील हजारो विद्यापीठांमध्ये देखील पीटीई अकॅडेमिक स्वीकारले जाते. ११८ देशांमधील ४०० पेक्षा जास्त पीटीई सेंटर्समध्ये पीटीई उपलब्ध आहे.
पीयर्सनचे सीईओ अँडी बर्ड म्हणाले, "विद्यार्थ्यांसाठी कॅनडा खूप चांगला आहे, उत्तम महाविद्यालये, सुंदर निसर्ग, रोचक संस्कृती आणि नाईटलाईफ या सर्वच गोष्टी याठिकाणी खूप चांगल्या आहेत. एसडीएससाठी आता पीटीई अकॅडेमिकला मंजुरी मिळालेली असल्याने मला खूप आनंद होत आहे की, पीयर्सन आता अजून अनेक विद्यार्थ्यांचे कॅनडामध्ये शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करू शकेल.
या वर्षीच्या सुरुवातीला कॅनेडियन इकॉनॉमिक मायग्रेशनसाठी पीटीई कोरला मंजुरी दिली गेल्यानंतर आता ही अजून एक मंजुरी मिळाली आहे. परदेशात राहू, काम करू आणि शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी पीटीई ही पसंतीची टेस्ट बनावी हा आमचा निश्चय यामधून दर्शवला जात आहे."
निष्पक्ष आणि अतिशय अचूक इंग्लिश लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट देण्यासाठी पीटीईने मानवी नैपुण्ये आणि आधुनिक एआय तंत्रज्ञान यांचा मिलाप घडवून आणला आहे. स्कोअरिंगसाठी एआय तंत्रज्ञान वापरले जाते आणि बायोमेट्रिक डेटा कलेक्शनमध्ये प्रगत सुरक्षा पुरवली जाते. पीयर्सनचा संगणक-आधारित टेस्टिंग व्यवसाय पीयर्सन व्हीयुईमार्फत पीटीई उपलब्ध करवून दिली जाते.
टेस्ट देऊ इच्छिणारे विद्यार्थी २४ तास आधीपर्यंतचे ऍडव्हान्स बुकिंग ऑनलाईन करू शकतात, संपूर्ण वर्षभर उपलब्ध असलेल्या जगभरातील टेस्ट सेंटर स्लॉट्सचा फायदा त्यांना मिळू शकतो आणि सरासरी १.३ दिवसांमध्ये त्यांना त्यांचे रिझल्ट मिळू शकतात.
१० ऑगस्टच्या आधी देण्यात आलेल्या पीटीई अकॅडेमिक टेस्ट्स जर या तारखेच्या नंतर प्रस्तुत केल्या जात असतील आणि आयआरसीसीने आखून दिलेल्या एक्स्पायरी कालावधीच्या आत असतील तर त्या स्वीकारल्या जातील. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आयआरसीसीच्या मार्गदर्शक सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात व त्यांचे पालन करावे.
Comments
Post a Comment