युनियन बँक ऑफ इंडिया
युनियन बँक ऑफ इंडिया द्वारा ग्लोबल एक्सेसिबिलिटी अवेयरनेस डे २०२३ चे आयोजन
मुंबई, २३ मे, २०२३: युनियन बँक ऑफ इंडियाने सलग दुसऱ्या वर्षी ग्लोबल एक्सेसिबिलिटी अवेयरनेस डे (GAAD) अनेक उपक्रमांसह साजरा केला.
१. कॉर्पोरेट वेबसाइटवर एक समर्पित वेबपेज "एक्सेसिबल बँकिंग" लाँच करण्यात आलं. हे वेबपेज बँकेद्वारे ग्राहकांना देऊ केलेल्या प्रवेशयोग्य सेवांबद्दल माहिती प्रदान करते
२. बँकेने ग्लोबल एक्सेसिबिलिटी अवेयरनेस डे (GAAD) २०२३ चे आयोजन मासिक ई-बुलेटिन "Pr@Waah मे २०२३" च्या विशेष आवृत्तीसह केले आहे, ज्यामध्ये सर्वसमावेशक बँकिंग ऑफर्सची माहिती ग्राहकांना देण्यात आली
३. दृष्टिहीनांसाठी बँकेचे सुलभ उत्पादन युनियन स्पर्श डेबिट कार्ड दाखवणारे क्रिएटिव्ह आणि व्हिडिओसह सोशल मीडिया पोस्टिंग
४. जागरुकता वाढवण्याकरिता कर्मचार्यांसाठी डिजिटल ऍक्सेसिबिलिटीवर ऑनलाइन क्विझ.
युनियन बँक ऑफ इंडियाने एक वर्षापूर्वी सुलभतेचा प्रवास सुरू केला आणि समावेश करण्याच्या दृष्टिकोनासह युनियन ऍक्सेस प्रकल्पाची अंमलबजावणी केली. आणि बँक आपली बँकिंग उत्पादने आणि सेवांची पोहोच वाढवण्यासाठी वचनबद्ध आहे.
Comments
Post a Comment