१०० वे नाट्य संमेलन बोरीवलीत व्हावे
१०० वे नाट्य संमेलन बोरीवलीत व्हावे
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद बोरिवली शाखेची मागणी
१०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन मुंबईत बोरिवलीमध्ये व्हावे, अशी मागणी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद बोरिवली शाखेचे अध्यक्ष श्री. प्रभाकर (गोट्या) सावंत यांनी बोरिवली शाखेच्या वतीने केली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. प्रशांत दामले आणि सदस्यांनी नुकतीच अ. भा. मराठी नाट्य परिषद बोरिवली शाखेला भेट दिली. त्यावेळी अध्यक्ष श्री. प्रशांत दामले यांना एका पत्रकाद्वारे निवेदन करण्यात आले. यावेळी अ. भा. मराठी नाट्य परिषद बोरिवली शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची बोरिवली शाखा गेली तीस वर्ष पश्चिम उपनगरात सांस्कृतिक अभिरुचीच्या परिपोषासाठी व परितोषासाठी रंगभूमी विषयक अनेक उपक्रम नेमाने व यशस्वीपणे राबवित आहे. १ ऑक्टोबरची कलारजनी, दिवाळी पहाट, मराठी रंगभूमी दिवस सोहळा, जागतिक रंगभूमी दिवस, मराठी भाषा दिवस, राज्यस्तरीय “सुवर्ण कलश एकांकिका स्पर्धा”, संगीत गायन, तबला वादन, कथ्थक, भरतनाट्यम, ओडीसी नृत्य, कीबोर्ड वादन हे अभ्यास वर्ग, पाश्चात्य नृत्यशिक्षण वर्ग, नाट्यवाचन व चर्चा, नाट्यलेखन, दिग्दर्शन, अभिनयाच्या कार्यशाळा, नाट्य प्रशिक्षण व बालनाट्य प्रशिक्षण शिबिरे हे उपक्रम राबविले जातात. १०० वे नाट्यसंमेलन आयोजित करण्याची संधी नाट्य परिषद, बोरिवली शाखेस दिल्यास आम्ही आमचे भाग्य समजू, असे निवेदन बोरिवली शाखेतर्फे करण्यात आले आहे
Comments
Post a Comment