“काव्यांजली - सखी सावली” मालिकेत प्रसाद जवादेची एंट्री !..
“काव्यांजली - सखी सावली” मालिकेत प्रसाद जवादेची एंट्री !
साकारणार प्रीतमची भूमिका …
मुंबई ३० मे, २०२३ : कलर्स मराठीवर कालपासून काव्यांजली - सखी सावली हि नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. मालिकेमध्ये प्रेक्षकांना दोन बहिणींची प्रेमळ गोष्ट बघायला मिळणार आहे. आता लवकरच मालिकेत एक नवी एन्ट्री होणार आहे. बिग बोस मराठी सिझन चौथामध्ये ज्या सदस्याला प्रेक्षकांडून भरभरून प्रेम मिळाले असा आपल्या सगळ्यांचा आवडता प्रसाद जवादे प्रीतमची भूमिका मालिकेत साकारणार आहे. आता नक्की हा कोण आहे ? याच्या येण्याने मालिकेत काय घडणार ? हे आपल्याला हळूहळू कळेलच. तेव्हा बघत राहा काव्यांजली - सखी सावली सोम ते शनिवर रात्री ८.३० वाजता कलर्स मराठी वर.
आपल्या भूमिकेबद्दल बोलताना प्रसाद म्हणाला, “बिग बॉस मराठीमध्ये मला प्रेक्षकांकडून जे प्रेम मिळालं ते मी कधीच विसरु शकणार नाही. खरंतर या प्रेमाची परतफेड करताच येणार नाही. पण मी खूप विचार केला की, ह्याचं एक रिटर्न गिफ्ट मी प्रेक्षकांना कसा देउ शकतो. आणि तेव्हाच मला कलर्स मराठीकडून काव्यांजली - सखी सावली या मलिकेसाठी प्रीतमच्या भूमिकेसाठी विचारणा झाली. प्रीतम या पात्राबद्दल ऐकताच मी ठरवलं की हेच असेल माझ्या चाहत्यांनसाठी एक छान रिटर्न गिफ्ट. काव्यांजली मालिकेद्वारे मी प्रेक्षकांना रोज भेटू शकतो, त्यांचं प्रेम अनुभवू शकतो. प्रीतमच्या भूमिकेचे पैलू लक्षात घेता, मला हे या मालिकेतील एक प्रभावशाली पात्र वाटतं. प्रीतम हा एक इंफ्लूएंजर आहे, त्याला प्रेमा विषयीचे लोकांचे प्रश्न सोडवणं, कविता करणं, त्याचं त्याच्या आईवर असलेलं अमाप प्रेम, आजच्या काळनुसार विचार करणं, असे प्रीतमचे पैलू लोकांसमोर सादर करणं माझ्यासाठी एक खूप मोठं आव्हान आहे. सर्वांना आवडणारा, लोकांच्या मनात घर करणारा, असा हा प्रीतम लवकरच तुमच्या भेटीला येतोय.”
Comments
Post a Comment