परेश शिरोडकर  प्रभुदेवां सोबत काम करण्याची नामी संधी मिळाली - आयुष्य संजीव

1. तुझ्या नृत्यबद्दलचा आतापर्यंतचा प्रवासाबद्दल सांगशील का ?

-   मला अगदी लहानपणांपासून डान्स आवडायचा तेव्हाच नृत्य करण्यास सुरुवात केली. माझ्या करिअरची सुरुवातही नृत्यातून झाली. त्यानंतर मी अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केली व मी बऱ्याच डान्स रिऍलिटी शो साठी असिस्टंट कोरिओग्राफर होतो. मी बॅकग्राउंड डान्सर म्हणूनही अनेक मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा नृत्य केले आहे. त्यामुळे नृत्य हे माझ्या कारकिर्दीतील पहिले काम आहे.

2. तुला अभिनय का करावासा वाटला ?

-  खरे सांगायचे तर, मला नेहमीच नर्तक व्हायचे होते, पण एक कलाकार म्हणून मला हिरो बनायचे असल्याने मी नृत्य आणि मार्शल आर्ट शिकलो. माझ्यासाठी नायक नेहमी अविश्वसनीय गोष्टी करतो. मुळात, लार्जर दॅन लाईफ. मी अमेरिकेत असताना संगीत नाटक केले. यूएस मधील अनुभव माझ्यासाठी सर्वोत्तम होता. आता जेव्हा मी अभिनय करत आहे तेव्हा माझ्यासाठी हे खूप कठीण आहे, जरी मी बऱ्याच मालिका केल्या असल्या तरीही दर वेळी काहीना काही नविन आव्हान असते. मी महाराष्ट्रीयन कुटुंबातून असल्यामुळे मला मराठी भाषेचे विशेष आकर्षण आहे व  मराठी मालिकेत मला माझे अभिनय कौशल्य दाखवायचे संधी मिळाली. ३६ गुणी जोडी ही मालिका एक नवीन अनुभव आहे आणि मला ह्या मालिकेतून खूप शिकायला मिळतंय.

3. नुकतेच तू एका एपिसोड मध्ये नृत्य केलेतुझा अनुभव कसा होता ?

- ३६ गुणी जोडी ह्या मालिकेत माझी व्यक्तिरेखा एका गर्विष्ठ व्यावसायिकाची आहे त्यामुळे मला नृत्य करताना पाहून प्रेक्षकांना आश्चर्य वाटले. खरं तर त्या विशिष्ट भागामध्ये माझा डान्स सीन समाविष्ट करण्याची माझी कल्पना होती. माझ्यासाठी तो एक चांगला आणि अतिशय रोमांचक क्षण होता.

4. नृत्यामध्ये तुझा आदर्श कोण आहेत ?

-   परेश शिरोडकर माझे डान्स गुरू आहेत. ते सर्व प्रकारे हुशार आहेत व खूप छान नृत्य दिग्दर्शन करतात. त्यांनी  बॉलीवूड मध्ये टायगर श्रॉफ, ह्रितिक रोशन सारख्या अप्रतिम अभिनेत्यांना प्रशिक्षण दिले आहे. त्यांनी दक्षिणेतील प्रभू देवासोबतही काम केले आहे व ह्या दरम्यान मला हि परेशजीं व प्रभूदेवा ह्यांच्या सोबत काम करण्याची एक नामी संधी मिळाली. तो क्षण माझ्यासाठी  खूप अविस्मरणीय होता. 

Comments

Popular posts from this blog

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..