एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका ‘दूसरी माँ’...

 एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका ‘दूसरी माँ’मध्‍ये अभिनेता दर्शन दवे नवीन शत्रू रणधीर शर्माच्‍या भूमिकेत सामील! 

टेलिव्हिजन मालिकांमध्‍ये अनेक प्रभावी भूमिका साकारलेले अभिनेते दर्शन दवे यांनी मनोरंजन क्षेत्रातील सुप्रसिद्ध चेहरा म्‍हणून स्वत:चे नावलौकिक केले आहे. आता, ते एण्‍ड टीव्‍हीवरील कौटुंबिक मालिका ‘दूसरी माँ’च्‍या कलाकारांमध्‍ये सामील होण्‍यास सज्‍ज आहेत. ते मालिकेमध्‍ये रणधीर शर्माची उल्‍लेखनीय भूमिका साकारणार आहेत. रणधीरच्‍या भूमिकेच्‍या माध्‍यमातून अभिनेता यशोदा (नेहा जोशी) आणि अशोक (मोहित डागा) यांच्‍या जीवनात नवीन समस्‍या आणतील, ज्‍यामुळे मालिकेमध्‍ये नवीन रोमांचक ड्रामा पाहायला मिळेल आणि प्रेक्षकांच्‍या मनात उत्‍सुकता निर्माण होईल. आपले कौशल्‍य व समर्पिततेसह दर्शन या लक्षवेधक भूमिकेच्‍या सादरीकरणासह प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्‍यास सज्‍ज आहेत.  

मालिकेमध्‍ये रणधीर शर्माच्‍या भूमिकेत प्रवेशाबाबत दर्शन दवे म्‍हणाले, ‘‘माझी भूमिका रणधीर शर्मा नवीन ट्विस्‍ट्स, रोमांच व ड्रामा घेऊन येईल. वकिल असलेला रणधीर अशोकचा प्रतिस्‍पर्धी आहे. रणधीर अशोकविरोधातील सर्व केसेस हरला आहे. असे असताना देखील अशोक गायब झाल्‍यानंतर आणि यशोदाच्‍या कठीण टप्‍प्‍यादरम्‍यान रणधीर मदतीचा हात पुढे करतो. रणधीरचा त्‍याच्‍या धूर्त दयाळूपणासह यशोदाला प्रभावित करण्‍याचा हेतू आहे, जेथे त्‍याचे व्‍यक्तिमत्त्व गुंतागूंतीचे व बहुआयामी आहे. मला ही भूमिका साकारण्‍याचा आनंद होत आहे. मला या भूमिकेमधील सखोलता सादर करण्‍याची संधी मिळाली आहे. मालिकेमध्‍ये रणधीरचा प्रवेश उत्‍साहवर्धक व रोमांचक कथानकाची खात्री देतो. प्रेक्षक रणधीर शर्मा व प्रमुख पात्रांमधील संघर्षाची उत्‍सुकतेने अपेक्षा करू शकतात.’’ शूटिंगबाबत अभिनेता पुढे म्‍हणाले, ‘‘मालिकेमध्‍ये सामील झाल्‍याने मला खूप आनंद झाला आहे. अधिक उत्‍साहवर्धक बाब म्‍हणजे आम्‍ही माझे मूळगाव जयपूरमध्‍ये शूटिंग करत आहोत. माझे कुटुंब आणि मालिका ‘दूसरी माँ’चे निस्‍सीम प्रेक्षक मला परफॉर्म करताना पाहण्‍यासाठी उत्‍सुक आहेत. पण, मी आतापर्यंत माझ्या भूमिकेचे सिक्रेट त्‍यांच्‍यापासून लपवून ठेवले आहे. या मालिकेच्‍या अद्वितीय संकल्‍पनेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि त्‍यांच्‍या पाठिंब्‍यासाठी मी त्‍यांचा ऋणी आहे. आम्‍ही शूटिंगला सुरूवात केली आहे आणि संपूर्ण टीम उत्तम व स्वागतार्ह आहे. मी माझी भूमिका रणधीर शर्माप्रती प्रेक्षकांची प्रतिक्रिया पाहण्‍यासाठी अत्‍यंत उत्‍सुक आहे.’’

पहा दर्शन दवे यांना रणधीर शर्माच्‍या भूमिकेत मालिका ‘दूसरी माँ’मध्‍ये दर सोमवार ते शुक्रवार रात्री ८.३० वाजता फक्‍त एण्‍ड टीव्‍हीवर!

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Cityflo & Salaam Bombay Foundation

June Is Here, But Humidity Isn't Going Anywhere: Functional Fashion Brands Helping Indians Stay Comfortable