स्वराज्याची पायाभरणी करणाऱ्या शिलेदाराची यशोगाथा..

२५ ऑगस्टला  सुभेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

स्वराज्याची पायाभरणी करणाऱ्या शिलेदाराची  यशोगाथा

शिवकालीन इतिहासाच्या पानांमध्ये असंख्य मावळ्यांनी स्वकर्तृत्वाच्या बळावर आपलं नाव अजरामर केलं. महाराजांशी निष्ठा व स्वराज्य रक्षणाची तळमळ प्रत्येक मावळ्याच्या नसा-नसात भिनली होती. स्वराज्यासाठी तळहातावर शीर घेऊन लढणाऱ्या योद्ध्यांच्या नेत्रदीपक कर्तृत्वाने शिवकालीन इतिहास झळाळून उठला आहे. अशा शूरवीर योद्ध्यांनी आपल्यापैकी प्रत्येकालाच प्रेरित केले आहे. 

आधी लगीन कोंढाण्याच आन मग माझ्या रायबाच" म्हणत दंड थोपटून कोंढाण्यावर चढाई करतअखेरच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे हे शिवछत्रपतींच्या योद्ध्यांपैकी महत्त्वाचे नावतान्हाजीरावांच्या नावाशिवाय शिवचरित्र पूर्णच होऊ शकत नाहीपण तान्हाजीराव म्हणजे केवळ सिंहगडाची लढाई नव्हेतर छत्रपतींच्या स्वराज्याची पायाभरणी करणारे आघाडीचे शिलेदार होते. ‘सुभेदार‘ हे मुलकी आणि लष्करी दोन्ही प्रकारचे महत्त्वाचे पद... त्यांच्या अतुलनीय शौर्या बरोबरच त्यांच्या प्रशासकीय पैलूंवर प्रकाश टाकणारा भव्य ऐतिहासिक चित्रपट म्हणजे सुभेदार!

सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा सुवर्ण इतिहास रुपेरी पडद्यावर मांडणाऱ्या सुभेदार चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.  पहिला मानाचा मुजरा असं म्हणत प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या टीझरमधून अतुल्य शौर्याची झलक पहायला मिळतेय.  लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकातील पाचवे चित्रपुष्प असलेला सुभेदार चित्रपट २५ ऑगस्ट २०२३ ला चित्रपटगृहांत झळकणार आहे. 'शिवराज अष्टक'मधील 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त', 'पावनखिंडआणि 'शेर शिवराजचित्रपटाच्या घवघवीत यशानंतर सुभेदार या पाचव्या चित्रपुष्पासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची प्रस्तुती असलेल्या सुभेदार चित्रपटाची निर्मिती राजवारसा प्रोडक्शनमुळाक्षर प्रोडक्शनपृथ्वीराज प्रोडक्शनराजाऊ प्रोडक्शनपरंपरा प्रोडक्शन यांनी केली आहे. प्रद्योत  पेंढारकरअनिल वरखडे दिग्पाल लांजेकरचिन्मय मांडलेकरश्रमिक गोजमगुंडेविनोद जावळकरशिवभक्त अनिकेत जावळकरश्रुती दौंड हे सुभेदार चित्रपटाचे निर्माते आहेत.   

Comments

Popular posts from this blog

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..