सन मराठीच्या ‘नवीन जन्मेन मी…’ मालिका एका नव्या वळणावर; स्वानंदीच्या बाबतीत घडली अघटित घटना पण स्वानंदी आता रडणार नाही तर लढणार

मुलींचं आयुष्य अनेकदा इतक्या नाजूक वळणावर असतं की त्यांना प्रत्येक पाऊल सांभाळून उचलावं लागतं. मग ते वयात येणं असो शिक्षण असो नोकरी/नोकरीच्या निमित्ताने दुस-या ठिकाणी जाणं असो किंवा संसार असो. ब-याच मुली स्वत:च्या जबाबदा-या सांभाळून स्वत:चं आयुष्य देखील सुरळितपणे चालवत असतात पण नेमकं असं काही घडतं की ज्यामुळे आयुष्यापुढे मोठा प्रश्न उभा राहतो. असंच काहीसं घडलंय ‘सन मराठी’ वरील ‘नवीन जन्मेन मी…’ या मालिकेतील स्वानंदीच्या बाबतीत.

आयुष्य आनंदाने जगणा-या आणि इतरांचं जीवन आनंदाने फुलवणा-या स्वानंदीचं आयुष्य एका वेगळ्या वळणावर पोहचलं आहे. एका पार्टीत स्वानंदीच्या बाबतीत अघटित घटना घडली आणि त्यानंतर तिच्यासमोर एक भयंकर प्रश्न उभा राहिला की तिच्या होणा-या बाळाचा बाप कोण? या सगळ्या गोष्टींना मी कशी सामोरी जाणार या विचारांनी जरी स्वानंदीला घेरलं असलं तरी नियतीच्या कचाट्यात अडकलेली स्वानंदी आता रडणार नाही तर लढणार आणि सत्याच्या संघर्षात स्वत: पुन्हा नव्याने घडणार

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO