वर्षा उसगांवकरांमुळे 'बिग बॉस'ने घरातील सदस्यांना आणलं जमिनीवर; निक्की तांबोळीचा राग अनावर

'बिग बॉस मराठी' नवा सीझन दिवस दुसरा!

वर्षा उसगांवकरांमुळे 'बिग बॉस'ने घरातील सदस्यांना आणलं जमिनीवर; निक्की तांबोळीचा राग अनावर

Bigg Boss Marathi New Season Day 2: 'बिग बॉस मराठी'च्या घरात पहिल्या दिवसापासूनच अनेक कमाल गोष्टी घडत आहेत. सदस्यांना अडचणीत आलेलं पाहून 'बिग बॉस'प्रेमींना मात्र मजा येत आहे. 'बिग बॉस'ने सदस्यांच्या तोंडचं पाणी पळवलं आहे. सदस्यांचं पाणी बंद केल्यानंतर आणि त्यांना उपाशी ठेवल्यानंतर आता 'बिग बॉस'ने सदस्यांना जमिनीवर आणलं आहे. वर्षा उसगांवकरांमुळे जमिनीवर झोपावं लागणार असल्याने निक्की तांबोळीचा राग अनावर झालेला आजच्या भागात पाहायला मिळेल. 

'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या दिवशी काहीही काम नसल्याने वर्षा उसगांवकर झोपल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यासकट घरातील इतर सदस्यांनाही 'बिग बॉस'ने शिक्षा दिलेली आजच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोमध्ये 'बिग बॉस' म्हणत आहेत,"आपल्याला बेडचा वापर करण्याची परवानगी नाही". 'बिग बॉस'च्या या आदेशानंतर घरातील सर्व सदस्य चिंतेत येतात.

वर्षा उसगांवकर 'बिग बॉस'ला म्हणाल्या,"चुकून झालं". त्यावर पारा चढलेली निक्की म्हणते,"आम्हाला भोगावं लागतंय..तुमच्यामुळे आता आम्हाला जमिनीवर झोपावं लागतंय". यावर वर्षा म्हणतात,"माझ्या एकटीमुळे नाही". त्यावर निक्की म्हणते,"तुम्ही झोपला होतात तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली होती". निक्कीला शांत करत वर्षा ताई म्हणतात,"आरडाओरडा करू नको". तरीही निक्की शांत बसत नाही उलट त्यांना प्रतिउत्तर देत त्यांनाच शांत बसण्यास सांगते.

'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्यांना आता बेडचा वापर करता येणार नाही. निक्की आणि वर्षाताईंचा चढलेला पारा 'बिग बॉस' प्रेमींना मनोरंजनाची मेजवानी देणारा ठरेल. तर 'बिग बॉस'च्या घरातील सदस्यांना जमिनीवर झोप लागेल का? हे पाहण्यासाठी आजचा रंजक भाग नक्की पाहा.

‘BIGG BOSS मराठी’ दररोज, रात्री 9 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि @officialjiocinema वर.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight