'बिग बॉस मराठी' नवा सीझन दिवस दुसरा!

 'बिग बॉस मराठी' नवा सीझन दिवस दुसरा!

"माझा वाद हा वाद नसतो तो बतंगडा असतो"; निक्की तांबोळी स्पष्टच म्हणाली

Bigg Boss Marathi New Season Day 2 : 'बिग बॉस मराठी'च्या नव्या पर्वाचा आजचा भाग खूपच मनोरंजन असणार आहे. नव्या सीझनच्या सुरुवातीपासूनच बॉलिवूड अभिनेत्री निक्की तांबोळी घरातील सदस्यांसोबत वाद घालताना दिसून आली आहे. आता यावर तिने स्पष्टचं भाष्य केलं आहे. जान्हवी किल्लेकरसोबत बोलताना आजच्या भाागात निक्की तांबोळी म्हणाली,"माझा वाद हा वाद नसतो तो बतंगडा असतो".

'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात निक्की तांबोळी जान्हवीला म्हणते,"निखिलने मला सांगितलं की तिने जे मागवलंय ते येतंय तर तुझं पण किनोवा येईल. त्यावर मी त्याला हो असं उत्तर दिलं. पण यावर अंकिता वालावलकरने मात्र वेगळचं तोंड केलं होतं. तेव्हा माझी खूप सटकली आणि मी खरचं खूप सुनावलं असतं. पण मला खूप भूक लागली होती. त्यामुळे मला वातावरण खराब करायचं नव्हतं. वेळ आल्यावर मी नक्की बोलेल.  छोट्या छोट्या गोष्टींवर मला वाद घालायचा नाही. कारण माझा वाद हा वाद नसतो तर तो बतंगडा असतो". निक्की तांबोळीच्या या बोलण्यावर जान्हवी मात्र जोरजोरात हसते. 

इरिना भांडी घासणार का?

दुसरीकडे निखिल दामले इरिना रूडाकोवाला विचारतो,"तू भांडी घासू शकतेस ना? कारण तिथे अशी समज आहे की सूरज आणि तू भांडी घासणार आहात". त्यावर अंकिता म्हणते,"तिने अगदीच काही खाल्लेलं नाही. जेवणानंतर मी भांडी घासू शकते". पण इरिना म्हणते,"मी भांडी घासू शकते. पण सगळी भांडी घासू शकत नाही". त्यावर निखिल म्हणतो,"सूरज आहे तुझ्यासोबत..त्याने भांडी घासायला सुरुवातदेखील केली आहे". तर अंकिता इरिनाला विचारते,"तुला माणसं कमी पडत आहेत की तुला भांडी घासायची नाहीत. यावर इरिना म्हणते,"मी भांड्यांचा वापर केलेला नाही.. तर मी का घासायची?". इरिनाला उत्तर देत निखिल म्हणतो,"अजून कोणाच्या ड्युटी ठरलेल्या नाहीत. उद्या ड्युटी ठरल्यानंतर तुझ्याकडे जर भांडी घासायची ड्यूटी असेल तर तेव्हा तुला तू त्या भांड्यांचा वापर केलाय की नाही याचा विचार न करता तुला ती सगळी भांडी घासावीच लागतील". 

‘BIGG BOSS मराठी’ दररोज, रात्री 9 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि @officialjiocinema वर.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight