अंकित मोहन म्हणतो मी मराठीच !

अंकित मोहन म्हणतोय मी मराठीच ! 

हिंदी टेलिव्हिजनवर आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर दिल्लीच्या अंकित मोहनने मराठी सिनेसृष्टीत आपली छाप पाडली. अंकितने ऐतिहासिक चित्रपटातच्या माध्यमातून मराठीत पदार्पण केले. आणि बघताबघता त्याने मराठीतही स्वतःचा एक चाहता वर्ग निर्माण केला. त्यांनतर त्याने आणखी काही ऐतिहासिक चित्रपटही केले. आता अंकित आगरी-कोळी भाषेत काम करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचा 'बाबू' चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दिल्लीचा अंकित चक्क आगरी कोळी भाषेत बोलताना दिसणार आहे. 

अंकित मराठीच्या अनुभवाबद्दल बोलतो, '' मी आता मराठीच आहे. खरंतर माझे नाव आता अंकित मोहनकर किंवा अंकित मोहन पाटील करायला पाहिजे.  इतका मी मराठी सिनेसृष्टीत रुळलो आहे. ही भाषा आता मला माझीच भाषा वाटते.  ऐतिहासिक चित्रपटांसाठी मी मराठी भाषा शिकायला सुरुवात केली. तर आता 'बाबू'च्या निमित्ताने मी आगरी-कोळी भाषा शिकलो. कोळी भाषा खूप गोड आहे. माझी मराठी भाषेचा सराव करण्याची एक पद्धत आहे. मी गाडीत, घरात, जिममध्ये ऑडीओवर सतत डायलॉग्स ऐकत राहतो. त्यामुळे मला ते कसे उच्चरायचे हे कळते. सेटवरही मी सहकलाकारासोबत मराठी बोलण्याचा प्रयत्न करतो. जेणे करून माझे उच्चार नीट होतील आणि मुळात 'बाबू'मधील व्यक्तिरेखा साकारताना मला त्यात अंकित दिसला. कारण जे जे अंकितने दिल्लीत केले ते सगळे बाबूच्या आयुष्यातही घडत आहे. त्यामुळे 'बाबू' खूप जवळचा आहे.''

श्री समर्थ कृपा प्रोडक्शन प्रस्तुत 'बाबू' या चित्रपटाची निर्मिती सुनीता बाबू भोईर यांनी केली आहे. तर या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा मयूर मधुकर शिंदे यांनी सांभाळली आहे. अंकित मोहन, नेहा महाजन, रुचिरा जाधव, स्मिता तांबे , संजय खापरे, श्रीकांत यादव यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका असून येत्या २ ॲागस्टला ‘बाबू’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight