"मुंबईच्या पावसातला तो प्रसंग कधीच नाही विसरू शकणार"- दक्षता जोईल

"मुंबईच्या पावसातला तो प्रसंग कधीच नाही विसरू शकणार"- दक्षता जोईल

पाऊस हा प्रत्येक व्यक्तीसाठी एक वेगळा अनुभव देतो कोणासाठी तो गोड आठवणींचा साठा देऊन जातो तर कोणाला तो काही भयानक अनुभव देतोअश्याच काहीश्या पावसाळ्यातल्या आठवणी  दक्षता जोईलने सांगितल्या, "पावसाळा मला प्रचंड आवडतो असं नाहीमला हिवाळा आवडतोपावसाळा का नाही आवडत ह्याच मुख्य कारण मुंबईचा पाऊसम्हणजे एकतर चिखल त्यात कामानिम्मित कुठे बाहेर जायचं असेल तर रस्ते तुंबलेलेवाहतूक विस्कळीत झालेली असतेपण मला कोकणातला पाऊस फार आवडतो माझं गाव आहे तिथेपाऊसात मस्त लाल मातीचे रस्तेतो मातीचा सुगंधहिरवीगार झाडंखळ्यात छान बसलोय आणि समोर पाऊस पडतोयहा नुसता संवादच मला आनंद देऊन जातोमुंबईच्या पावसातला एक भयानक किस्सा सांगायचं झाला तर मी ११ वीत होते तेव्हा घरी जात असताना प्रचंड पाऊस वाढला मी पार्ल्यातून प्रवास करत होतेमी लोकांच्या पाऊलावर पाऊल ठेवून  तो रस्ता पार करायची कसरत सुरु केलीमाझं कॉलेज सुरु होऊन एक आठवडाच झाला होता मला कळत नव्हतं की काय करू कसा तो तुंबलेले रस्ता पार करूपाण्याचा प्रवाह लाटांसारखा येत होता.  मी एका ताई सोबत थांबले कारण नाले उघडे होते आणि मला खूप भीती वाटत होती.  मी कशीतरी माझ्या बाबांपर्यंत पोहोचले जे तिथे एका कामानिम्मित आले होते आणि आम्ही रात्री  वाजता कसेतरी घरी पोहचलोपावसात  मला टपरीवरच्या काचेच्या  ग्लासातली कटिंग आणि गरमागरम बटाटा भजी आणि हिरवी चटनी खायला खूप आवडत. 'सारं काही तिच्यासाठीचा सेट ज्या ठिकाणी आहे तिथे ही पावसाळ्यात सर्वत्र हिरवंगार होऊन जातभले शुटिंगमुळे तितका वेळ नाही मिळत पण छान फोटो काढून मी ती मोमेन्ट एन्जॉय करते". 

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight