कोटक म्युच्युअल फंड..

कोटक म्युच्युअल फंडची ‘लेट्स सेव्ह लाइव्ह्स म्युच्युअली’ पुढाकार आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

~एका दिवसात संस्थेकडून तब्बल 3,471 रक्त युनिट्स संकलित

मुंबई, 13 जुलै 2026: कोटक महिंद्रा अँसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (“KMAMC”/ कोटक म्युच्युअल फंड) यांनी आज जाहीर केले की त्यांच्या देशव्यापी रक्तदान उपक्रमाला आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून मान्यता मिळाली आहे. एका दिवसात संस्थेकडून सर्वाधिक रक्त युनिट्स संकलित करण्याचा विक्रम त्यांनी केला असून, कंपनीने 114 दान केंद्रांमधून यशस्वीपणे 3,471 रक्त युनिट्स गोळा केले. हा उपक्रम भारतातील सर्वात मोठ्या रक्तदान मोहिमांपैकी एक ठरला आहे.

हा व्यापक उपक्रम म्युच्युअल फंड वितरक आणि कर्मचारी यांना एका समान उद्देशाने एकत्र आणतो – रक्तदानाद्वारे जीव वाचवणे. या उपक्रमातून कोटक म्युच्युअल फंडची आर्थिक कल्याणापलीकडे जाऊन सामाजिक परिणाम घडवण्याची बांधिलकी आणि सामूहिक जबाबदारीची संस्कृती दृढ करण्याची भूमिका स्पष्ट होते.

या उपक्रमाबद्दल प्रतिक्रिया देताना कोटक महिंद्रा अँसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक निलेश शाह म्हणाले, “कोटक म्युच्युअल फंडमध्ये आम्ही मानतो की मूल्यनिर्मिती ही केवळ संपत्ती निर्मितीपुरती मर्यादित नसते. ‘लेट्स सेव्ह लाइव्ह्स म्युच्युअली’ हा आमच्या विश्वासाचा परावर्तक आहे की सामूहिक कृती समाजासाठी अर्थपूर्ण बदल घडवू शकते. दाते, स्वयंसेवक, भागीदार आणि आमच्या विस्तारित परिसंस्थेतील लोकांनी या समान कारणासाठी एकत्र येऊन दिलेल्या प्रचंड सहभागामुळे आम्ही विनम्र झालो आहोत.”

या प्रचंड प्रतिसादाबद्दल आपले विचार व्यक्त करताना कोटक महिंद्रा अँसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडचे हेड – डिजिटल बिझनेस, मार्केटिंग आणि अँनालिटिक्स, किंजल शाह म्हणाले, “या उपक्रमाने सहकार्य आणि समुदाय सहभागाची ताकद दाखवून दिली. अनेक शहरांमध्ये हजारो लोक एका मानवतावादी कारणासाठी एकत्र आले, हे पाहून आमची दीर्घकालीन सामाजिक परिणाम घडवणाऱ्या उपक्रमांची बांधिलकी अधिक दृढ झाली आहे. या उपक्रमाला यशस्वी करणाऱ्या प्रत्येक दाता आणि भागीदारांचे आम्ही आभारी आहोत.”

या मान्यतेबद्दल प्रतिक्रिया देताना आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचे मुख्य संपादक डॉ. बिस्वरूप रॉय चौधरी म्हणाले, “कोटक म्युच्युअल फंडचा ‘लेट्स सेव्ह लाइव्ह्स म्युच्युअली’ उपक्रम हा कॉर्पोरेट-नेतृत्वाखालील मोहिमेने समुदायांना अभूतपूर्व प्रमाणात एका उदात्त कारणासाठी एकत्र आणण्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. एका दिवसात अनेक शहरांमध्ये हजारो युनिट्स संकलित करणे ही उल्लेखनीय कामगिरी असून त्यातून उत्कृष्ट नियोजन, समन्वय आणि सार्वजनिक सहभाग दिसून येतो. आम्हाला आनंद आहे की या कामगिरीला ‘एका दिवसात संस्थेकडून सर्वाधिक रक्त युनिट्स संकलित’ या शीर्षकाखाली आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये मान्यता देण्यात आली आहे.”

या असामान्य कामगिरीची दखल घेत आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने कोटक म्युच्युअल फंडला “एका दिवसात संस्थेकडून सर्वाधिक रक्त युनिट्स संकलित” हा किताब प्रदान केला आहे.

‘लेट्स सेव्ह लाइव्ह्स म्युच्युअली’ सारख्या उपक्रमांद्वारे कोटक म्युच्युअल फंड जबाबदार कॉर्पोरेट नागरिकत्वाची आपली बांधिलकी सातत्याने दाखवत आहे. लोकांना एकत्र येऊन समाजावर दीर्घकालीन परिणाम करणाऱ्या कारणांसाठी योगदान देण्याची संधी निर्माण करून, हा उपक्रम दाखवतो की जेव्हा समुदाय समान उद्देशाने एकत्र येतात, तेव्हा एका दिवसातही हजारो जीव वाचवता येऊ शकतात.

अस्वीकरण: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमींवर अवलंबून असते. सर्व योजना-संबंधित दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO