अन्नपूर्णामध्ये येणार इटालियन फ्लोअर कंपन्या - अनूफूड २०२२
अन्नपूर्णामध्ये येणार इटालियन फ्लोअर कंपन्या - अनूफूड २०२२ बढावा देणार प्रीमियम सॉफ्ट व्हीट फ्लोअर्सना
मुंबई, भारत (सप्टेंबर १३,२०२२) – आहारमध्ये यशस्वीरित्या उत्पादने लाँच केल्यानंतर, भारतात सॉफ्टव्हीट फ्लोअरच्या (गव्हाचे मऊ पीठ) निर्यातीला बढावा देण्यासाठी तसेच त्यांच्या उच्च दर्जाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी, इटालियन असोसिएशन ऑफ मिलर्स इटालमोपाद्वारे व्यवस्थापित
आणि युरोपीयन कमिशनद्वारे निधी पुरवले गेलेले ‘प्योर फ्लोअर फ्रॉम युरोप’ अभियान मुंबईतीलअन्नपूर्णा-अनूफूड या आंतरराष्ट्रीय ट्रेड शोमध्ये येणार आहे. हा ट्रेड शो १४ ते १६ सप्टेंबर २०२२ या काळात होणार आहे.याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी तसेच या ॲग्युगिॲरो अँड फिग्ना व मोलिनो कॅप्युटो यांसारख्या संघटनेतील सर्वांत मोठ्या उत्पादकांच्या प्रतिनिधींनी भेटण्यासाठी दालन क्रमांक ४ मधील आमच्या बूथक्रमांक डी-२८ला भेट द्या. शोच्या डेमोसाठी राखून ठेवण्यात आलेल्या क्षेत्रात तुम्ही शेफ्स डेव्हिड सिविटिएलो आणि रिकार्डो स्कॅइओली यांनी खास तयार केलेल्या पिझा, फोकॅशिया आणि ब्रेड्सची चवहीघेऊ शकता. आणि तुम्ही स्वत: शेफ असाल तर तुम्ही आमच्या पाककला कार्यशाळांमध्येही सहभागी होऊ शकता. या कार्यशाळा १४, १५ व १६ सप्टेंबर २०२२ रोजी अनुक्रमे दुपारी १:०० ते ३:००, दुपारी १२.३०ते २.३० ते आणि सकाळी १०.३० ते ११.३० या काळात अन्नपूर्णा अनूफूड इंडिया गोर्मे पॅव्हिलिनय, दालन क्रमांक ४ येथे घेतल्या जाणार आहेत. यात सहभागी होण्यासाठी श्रीमती देवना खन्ना यांच्याशी ९८११२७६८०० या क्रमांकावर संपर्क साधा.
१९५८ मध्ये स्थापन झालेली आणि रोमस्थित इटालमोपा ही युरोपीय संघातील सर्वांत महत्त्वपूर्ण औद्योगिक पीठ उत्पादक संघटना आहे. यात इटलीतील ८२ फ्लोअर मिलिंग कंपन्या या संघटनेच्या सदस्य आहेत. युरोपातील मिलिंग उद्योगामध्ये उच्च दर्जाच्या पिठांचे उत्पादन करण्यासाठी आवश्यकती सर्व काळजी घेतली जाते. सर्वोत्तम धान्याची निवड, पारंपरिक व अत्याधुनिक तंत्रज्ञानांचे कुशलमिश्रण आणि दर्जाच्या मानकांचे काटेकोर पालन करून पिठांचे उत्पादन केले जाते.
प्योर फ्लोअर फ्रॉम युरोप हे अभियान आणखी दोन वर्षे चालणार असून, यामध्ये अन्य काही ग्राहक वव्यापारी कार्यक्रमांचा समावेश केला जाणार आहे. या कार्यक्रमांमध्ये शेफ्सद्वारे उत्पादनांची प्रात्यक्षिकेदाखवली जातील. यात पिझा व पास्तासारखे लोकप्रिय इटालियन पदार्थ, पेस्ट्रीज व ब्रेडसारखे पदार्थयात करून दाखवले जातील. किराणामाल, फूडसर्व्हिस आणि अन्नपदार्थ उत्पादन क्षेत्रातील अन्य काही महत्त्वाच्या ट्रेड शोजमध्येही हे अभियान राबवले जाईल: नवी दिल्लीतील सिआल इंडियामध्ये आम्ही १/३ डिसेंबर २०२२ या काळात सहभागी होणार आहोत आणि नंतर पुन्हा मुंबईत ४/६ मे २०२३ या काळात होणाऱ्या सिआल इंडियामध्ये आम्ही सहभागी होणार आहोत. नवी दिल्लीत २०२३ न। होणाऱ्या आहार व सिआलमध्ये आम्ही सहभागी होणार आहोत. इटलीमधील सेंद्रीय पिठे व रव्याच्या मिलर्सचीशैक्षणिक सहल काढली जाणार आहे तसेच निर्यातदार, वितरक व शेफ यांच्यासाठी विशेष अभ्यास दौरे काढले जाणार आहेत.
“इटलीतून सॉफ्ट व्हीट फ्लोअर्सची निर्यात वाढवण्यासाठी आम्हाला भारतात मोठी संधी दिसत आहे.घरगुती स्वयंपाक करणारे व शेफ्स यांच्याकडून, अव्वल दर्जाच्या तसेच थआरोग्यपूर्ण, पोषक व सुरक्षित अशा घटक पदार्थांना आजपर्यंत कधीही नव्हती एवढी मागणी होऊ लागली आहे,” असे इटालमोपाचेअध्यक्ष एमिलिओ फेरारी सांगतात. “आमच्या सदस्य कंपन्यांचे पीठ हे सर्व निकष पूर्ण करते आणि बहुतेक सर्व पाककृतींचा दर्जा वाढवण्यात यामुळे मदत होते.”
युरोपीय संघातील निर्यातदार देशांपैकी भारतात इटलीतून सर्वाधिक पीठ आयात केले जाते. ‘प्योरफ्लोअर फ्रॉम युरोप’ या अभियानाचे उद्दिष्ट वैविध्यपूर्ण, उच्चदर्जाच्या, भेसळमुक्त व सुरक्षितपिठाबद्दल जागरूकता निर्माण करणे हे आहे. युरोपातील व विशेषत्वाने इटलीतील सॉफ्ट व्हीटफ्लोअरचा श्रेष्ठ दर्जा व निराळेपणा, व्यावसायिक स्तरावर अन्नपदार्थ तयार करणाऱ्या शेफ्ससाठी,घरगुती स्वयंपाक करण्यांसाठी आणि लोकामध्ये मतांचा विकास करणाऱ्या नेत्यांसाठी, सारखाच परिपूर्ण आहे. अभिजात युरोपीय व इटालियन पाककृती तसेच स्थानिक स्तरावरील वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ ‘प्योरफ्लोअर फ्रॉम युरोप’पासून तयार केले जातात, तेव्हा सर्वोत्तम होतात.
इटलीतील पिठे अन्नपदार्थांची सुरक्षितता व उच्च दर्जा यांची निश्चिती करून तयार केली जातात. त्यांनाजगभरात मान्यता आहे. गव्हाचे पीठ अर्थात कणिक जवळपास दररोज मूलभूत अन्नाचा भाग म्हणून घेतली जाते. या पिठातून जीवनसत्वे, क्षार, तंतूमय पदार्थ व वनस्पतीजन्य प्रथिनांसारखे पोषणाचेनिम्न-मेदयुक्त स्रोत मिळतात आणि आहारात समतोल साधला जातो.दर्जाचे मूल्यमापन व सुरक्षिततेची तपासणी गहू खरेदी करण्याच्या टप्प्यापासून सुरू होते आणि पिठाच्या वितरणापर्यंत हे सुरू राहते, या प्रक्रियेचे नियंत्रण व ट्रेसेबिलिटी प्रणालीद्वारे ठेवली
जाते. ईयू मिलिंगमध्ये नियमनांची अत्यंत काटेकोर यंत्रणा आहे, यामध्ये स्वायत्त व अधिमान्यताप्राप्तप्रयोगशाळांद्वारे हजारो चाचण्या व उलटचाचण्या गेतल्या जातात. शिवाय ही प्रक्रिया सुलभ वपर्यावरणपूरक आहे. ऊर्जेची बचत, हवेतील उत्सर्जन कमी करणे व बाय-प्रोडक्ट्स उपयोगात आणणेआदी मार्गांनी प्रक्रियेची शाश्वतता वाढवण्याचे प्रयत्न सातत्याने केले जातात.
Comments
Post a Comment