केप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड..

केप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडद्वारे बसंत धवन ह्यांची गृप चीफ मार्केटिंग ऑफिसर म्हणून नियुक्ती

मुंबई, 26 एप्रिल 2023: केप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड (सीजीसीएलह्या आघाडीच्या एनबीएफसीने आपल्या समूहाचे चीफ मार्केटिंग ऑफिसर म्हणून बसंत धवन ह्यांची नियुक्ती केली आहेही नियुक्ती 24 एप्रिल 2023 ह्या तारखेपासून करण्यात आली आहेधवन हे कंपनीच्या मार्केटिंग पोर्टफोलिओची जबाबदारी सांभाळतील आणि कंपनी वाढीच्या पुढील टप्प्यात प्रवेश करत असताना त्यांच्या सर्व व्यवसायांचे मार्केटिंग प्लानिंगडेव्हलपमेंटअंमलबजावणी तसेच देखरेखीची जबाबदारी त्यांच्यावर असेलह्यात ब्रॅण्ड मार्केटिंगब्रॅण्ड उभारणीधोरणात्मक संवादडिजिटल आणि सोशल मीडिया मार्केटिंग धोरणे आदींचा समावेश होतोकंपनीचा आवाका नवीन व पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या बाजारपेठांमध्ये विस्तारणे आणि कंपनीची व्याप्ती वाढवणे ह्यांत त्यांची भूमिका महत्त्वाची असेलब्रॅण्डची मान्यता भक्कम करणे आणि भारतभरात इक्विटी अधिक उंचीवर नेणे ह्या उद्दिष्टाने धोरणे आखण्याची व मार्केटिंगच्या एकंदर प्रयत्नांवर लक्ष ठेवणे ही जबाबदारी धवन ह्यांच्यावर असेलसर्व महानगरेश्रेणी  2 व श्रेणी 3 बाजारपेठांमध्ये कार्यक्षेत्र असलेल्या अनेकविध व्यवसाय विभागांमधील कंपनीच्या संपूर्ण ब्रॅण्ड समूहासाठी व्यूहरचनात्मक ब्रॅण्ड मार्गदर्शक तत्त्वे प्रस्थापित करण्यावर धवन लक्ष केंद्रित करतील.

मुंबई शेअर बाजार (बीएसईआणि राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसईह्यांवर सूचीबद्ध असलेली तसेच निफ्टी स्मॉलकॅप 250 इंडेक्सचा भाग असलेली सीजीसीएलएमएसएमई कर्जेपरवडण्याजोगी गृहकर्जेगोल्ड लोन्स आणि कन्स्ट्रक्शन फायनान्स ह्यांसारख्या अनेक उच्च वाढीच्या विभागात काम करते.

केप्री  ग्लोबल कॅपिटल लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्रीराजेश शर्मा ह्या नियुक्तीबद्दल म्हणाले, “देशातील बँकिंग सुविधांपासून वंचित असणाऱ्या लोकसंख्येची सेवा करण्याच्या अविचल उद्देशाने आम्ही विकासाच्या रोमांचक प्रवासात पुढे वाटचाल करत आहोतएक कुशल आणि समर्पित नेते म्हणून बसंत धवन आमच्या टीममध्ये सहभागी होत असल्यामुळे आमचा उत्साह वाढला आहेआम्ही आमचा व्यवसाय नवीन क्षेत्रांत उत्क्रांत करत असतानाआमचे प्रादेशिक कार्यक्षेत्र वाढवत असताना तसेच पत समावेशनाच्या क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणारी कंपनी म्हणून स्वत:ला प्रस्थापित करण्याच्या उद्दिष्टाने काम करत असतानाधवन ह्यांची ही नियुक्ती खूपच महत्त्वाची आहेत्यांचे अद्वितीय कौशल्यनिष्पत्ती साध्य करण्याप्रती अविचल बांधिलकी  सर्जनशीलतेची जोपासना करण्याची वृत्ती ह्यांमुळे कंपनीच्या मार्केटिंग क्षेत्रातील प्रयत्नांना चालना मिळेल आणि आजच्या सातत्याने उत्क्रांत होत असलेल्या डिजिटल क्षेत्रात आमच्या ब्रॅण्डचे बळ वाढेल असा आत्मविश्वास आम्हाला वाटतो.”

दीर्घकाळ काम केलेले व अनुभवी व्यवसाय नेते म्हणून धवन ह्यांच्याकडे सर्व उद्योगक्षेत्रांमध्ये ब्रॅण्ड्सची उभारणी करण्याचाउच्च कामगिरी करणाऱ्या टीम्स विकसित करण्याचा व त्यांची जोपासना करण्याचा तसेच नवोन्मेषकारी मार्केटिंग धोरणे तयार करण्याचा दोन दशकांहून अधिक अनुभव आहेसीजीसीएलमध्ये रुजू होण्यापूर्वी धवन ह्यांनीमाध्यम व मनोरंजनापासून ते दूरसंचार व क्रीडा ह्यांच्यापर्यंतअनेक उद्योगक्षेत्रांमध्ये नेतृत्वाच्या पदांवर काम केले आहेसीजीसीएलमध्ये रुजू होण्यापूर्वी ते ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी मीडियामध्ये (टीसीएममुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत होतेत्यापूर्वी ते सीएनएन न्यूज 18 आणि नेटवर्क 18मधील सीएनबीसी वाहिनी समूहामध्ये सीईओ होतेस्टार इंडियामध्ये वरिष्ठ उपाध्यक्ष आणि इमर्जिंग स्पोर्ट्स विभागाचे प्रमुख म्हणून क्रीडा प्रसारण क्षेत्रातही त्यांनी य

धवन IIM कलकत्ताचे माजी विद्यार्थी असूनत्यांनी मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन शाखेतील इंजिनीअरिंगची पदवी संपादन केली आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight