ब्यान्नव वर्षाच्या आज्जी आणि नवा गडी नावं राज्य' कलाकारांची अनोखी भेट !

ब्यान्नव वर्षाच्या गोड़ आज्जीने दिले  'नवा गडी नवं राज्य' च्या टीमला भरभरून आशीर्वाद !

'नवा गडी नवं राज्य' हि मालिका प्रसिद्धीच्या शिखरावर असून सर्व वयोगटातील प्रेक्षक ह्या मालिकेला लाभले आहेत. आता हेच पहाना, पुण्यात पार पडलेल्या उत्सव नात्यांचा ह्या सोहळ्यात चक्क ब्यान्नव वर्षाच्या गोड़ आजींनी हजेरी लावून त्या उत्सवाचा आनंद घेतला, हे दृश्य फार आश्चर्य कारक होते. ह्या प्रसंगाचे औचित्य साधून आपल्या लाडक्या रमा ,आनंदी आणि राघव ह्या कलाकारांनी अश्या रसिक आजींची भेट घेऊन त्यांचा आशिर्वाद तर घेतलाच व त्यांच्या शुभेच्छा सुमनांचा स्वीकारही केला. प्रेक्षकांकडून असेच भर भरून प्रेम भेटते हे पाहून फार आनंद होतो. सर्व नात्यांना भुरळ पडणारी हि मालिका पाहायला विसरू नका 'नवा गडी नवं राज्य' रात्री ९: ०० वाजता फक्त आपल्या झी मराठी वर. 

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Cityflo & Salaam Bombay Foundation

मुलूंडच्या 'विठू माऊली' समूहाची सलग पाचवी वारी