गोदरेज कॅपिटलतर्फे निर्माण....

गोदरेज कॅपिटलतर्फे निर्माण हा एमएसएमईजना व्यवसाय विस्तारासाठी मदत करणारा डिजिटल प्लॅटफॉर्म लाँच

·         एमएसएमई चालकांना व्यवसाय पूर्ण क्षमतेनिशी विस्तारण्यासाठी हा प्लॅटफॉर्म सर्वसमावेशक संधी पुरवणार

·         एमएसएमईंना तोंड द्यावे लागत असलेल्या प्रमुख आव्हानांवर मात करण्यासाठी गोदरेज कॅपिटलची अमेझॉन ग्लोबल सेलिंगऑनस्युरिटी, झोलव्हिट आणि एमएसएमईएक्स अशा विश्वासार्ह ब्रँड्सशी भागिदारी. नजीकच्या भविष्यात पार्टनर नेटवर्कचाही विस्तार करणार

मुंबई१७ एप्रिल २०२३ – गोदरेज कॅपिटल या गोदरेज समूहाच्या आर्थिक सेवा विभागाने आज निर्माण हा आपला नवा डिजिटल प्लॅटफॉर्म लाँच केला असून त्याद्वारे एमएसएमई चालकांना आपला व्यवसाय विस्तारण्यासाठी सर्वसमावेशक संधी पुरवल्या जाणार आहेत. विचारपूर्वक तयार करण्यात आलेल्या गोदरेज कॅपिटल निर्माणमध्ये एमएसएमईजच्या विकासासाठी आवश्यक सेवा पुरवणाऱ्या विविध प्रकारच्या भागिदारांचा समावेश करण्यात आला आहे.

आज देशातील एमएसएमईजना बाजारपेठेत मर्यादित प्रवेश, प्रादेशिक व्याप्तीच्या पलीकडे विस्तार करण्याची अपुरी क्षमताकायदेशीर आणि नियामक बाबींची पूर्तता करण्यासाठी आवश्यक ज्ञानाचा अभावमर्यादित तंत्रज्ञान, नोकरभरती आणि कर्मचारी टिकवणे तसेच मर्यादित प्रमाणात कर्ज उपलब्ध होणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. गोदरेज कॅपिटलने या समस्या सोडवण्याचे आणि त्यासाठी आवश्यक सेवा ग्रो द बिझनेस’, ‘इझ बिझनेस ऑपरेशन्स आणि ‘ट्रान्सफर्मेशन थ्रु अपस्केलिंग अशा वेगवेगळ्या विभागांअंतर्गत पुरवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

कंपनीने या कामाच्या सुरुवातीला अमेझॉन ग्लोबल सेलिंगऑनस्युरिटीझोल्विहच आणि एमएसएमईएक्स अशा ब्रँड्सशी भागिदारी केली असून त्याद्वारे बाजारपेठेतील व्याप्ती वाढवणे, कायदेशीर आणि नियामक बाबी सुलभ करणेकर्मचाऱ्यांचे आरोग्य व हित जपणेछोट्या व्यवसायांना व्यावसायिक ज्ञान देणे अशा सेवा दिल्या जाणार आहेत. त्याशिवाय गोदरेज कॅपिटल निर्माणच्या युजर्सना सवलतीत उत्पादन आणि सेवा मिळणार आहेततर गोदरेज कॅपिटलच्या ग्राहकांना अतिरिक्त आणि विशेष किंमतींचा लाभ घेता येणार आहे.

विशेष म्हणजे हा प्लॅटफॉर्म देशाच्या बीएफएसआय क्षेत्रातील अशा प्रकारचा पहिलाच प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे मुख्य सेवांबरोबरच व्यावसायिक विकासाच्या संधींचा लाभ घेण्यासाठी इतर मूल्यवर्धित सेवाव्यवसाय करण्यातील सुलभताआवश्यक ज्ञान आणि नेटवर्कचे पर्याय पुरवले जाणार आहेत.

गोदरेज कॅपिटलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनिश शहा म्हणाले, गोदरेज समूहाने प्रदीर्घ काळापासून भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाला योगदान देण्याची बांधिलकी जपली आहे आणि गोदरेज कॅपिटलच्या माध्यमातून निर्माणचे लाँच करून एमएसएमईजना त्यांच्या पूर्ण क्षमतेचा विस्तार करण्याची व देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लावण्याची संधी देताना आम्हाला अभिमान वाटत आहे. आम्ही आपल्या देशातील एमएसएमईजसमोर असलेल्या आव्हानांचा सखोल अभ्यास केला आहे आणि आधीपासून पुरवल्या जात असलेल्या कर्ज सुविधा व आता निर्माणच्या मदतीने या आव्हानांवर मात करण्यास मदत करण्यासाठी व या क्षेत्राच्या विकासासाठी योगदान देण्याकरता मदत होणार आहे.

गोदरेज कॅपिटलने धोरणात्मक भागिदारीच्या माध्यमातून या प्लॅटफॉर्मवर अधिकाधिक मूल्यवर्धित सेवा देण्यावर आणि आव्हानांवर मात करण्यासाठी आवश्यक सेवा पुरवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

लाँचच्या प्राथमिक टप्प्यात ही सेवा भारतातील ३० महत्त्वाच्या बाजारपेठेत विस्तारली जाणार असून देशाच्या सर्व कानाकोपऱ्यात उपलब्ध असेल.

गोदरेज कॅपिटलने नोव्हेंबर २०२० मध्ये स्थापना झाल्यापासून आतापर्यंत ५३०० कोटी रुपयांचे गृहएसएमई आणि एमएसएमई कर्जासाठी वाटप केले आहे. कंपनीने भारतातील १३ शहरांत आपले अस्तित्व विस्तारले आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO