सौर ऊर्जा, वाहन आणि बांधकाम क्षेत्रांच्या वाढत्या मागणीसाठी फिनोलेक्स केबल्सची विस्ताराची योजना

 सौर ऊर्जावाहन आणि बांधकाम क्षेत्रांच्या वाढत्या मागणीसाठी फिनोलेक्स केबल्सची विस्ताराची योजना

मुंबई, 19 एप्रिल, 2023फिनोलेक्स केबल्स लिमिटेडया इलेक्ट्रिकल आणि टेलिकम्युनिकेशन केबलच्या भारतातील आघाडीची उत्पादक कंपनीच्या वतीने त्यांच्या उत्पादन क्षमतांचा लक्षणीय विस्तार करण्याची घोषणा करण्यात आली. वाहन उद्योगासाठी पीव्हीसी इन्सुलेटेड इलेक्ट्रिकल केबलच्या निर्मितीपासून सुरुवात करून 1956 मध्ये कंपनीची स्थापना झाल्यापासून ही कंपनी उद्योगातील एक विश्वसनीय नाव आहे.

कंपनीने उर्सेपुणे येथे उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी पुढील काही महिन्यांत 200 कोटी भांडवल तरतूद केली आहे. हे भांडवल सौर उर्जा उद्योग आणि वाहन उद्योगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उत्पादन क्षमता वाढविण्याच्या दिशेने निर्देशित केले आहेज्यामध्ये काही विशिष्ट मूल्यवर्धने आणली गेली आहेत जी अगोदर आउटसोर्स करण्यात आली होती आणि ऑप्टिक फायबर लाइनचा आगामी विस्तार करण्यात आला.

फिनोलेक्सच्या विस्तार योजनांचा उद्देश हा सोलर केबलऑटोमोटिव्ह केबल आणि ऑप्टिक फायबर केबलची वाढती मागणी पूर्ण करण्याचा आहे. कंपनीने नियंत्रित इलेक्ट्रॉन ई-बीम तंत्रज्ञानाचा वापर करून सौर केबल तयार करण्यासाठी उर्से येथे उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी विशेष रेडिएशन तंत्रज्ञान उपकरणे खरेदी केली आहेत. यामुळे कंपनीला उच्च-गुणवत्तेच्या सौर केबलचे उत्पादन करता येईल आणि सौर ऊर्जा उद्योगात मूल्य वाढेल.

कंपनीने सतत तंत्रज्ञान श्रेणीसुधारित करूनउत्पादन सुविधांचे आधुनिकीकरण करून आणि गुणवत्ता आणि सेवांची सर्वोच्च मानके राखून एक नाविन्यपूर्ण नेता आणि दर्जेदार निर्माता म्हणून आपली प्रतिष्ठा प्रस्थापित केली आहे. प्रत्येक केबल 99.97% शुद्ध इन-हाउस उत्पादित ब्राइट अॅनिल्ड इलेक्ट्रोलाइटिक ग्रेड कॉपर वापरून नवीनतम अत्याधुनिक मशीनसह तयार केली जाते आणि ती व्हर्जिन ग्रेड PVC सह इन्सुलेटेड आहेतसेच इन-हाउस तयार केली जाते. बॅकवर्ड इंटीग्रेशनच्या दिशेने वाटचाल करतानाकंपनीने गोवा येथे कॉपर रॉड उत्पादन सुविधा आणि उर्सेपिंपरी आणि रुरकी प्रकल्पांत स्वयंपूर्ण आणि गुणात्मक नियंत्रणासाठी इन-हाउस पीव्हीसी कंपाऊंड उत्पादन सुविधा उभारली आहे.

बांधकाम क्षेत्रजे त्याच्या इलेक्ट्रिकल वायर आणि केबलच्या कमाईतील 60% भाग घेतेहे फिनोलेक्ससाठी आणखी एक लक्षित क्षेत्र आहे. कंपनीने अलीकडेच त्यांच्या गोवा प्लांटमध्ये पीव्हीसी कंड्युट्सची मागणी पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त यंत्रसामग्री जोडली आहे. हे फिनोलेक्सला प्रोजेक्ट डेव्हलपर्ससोबत व्यावसायिक संबंध प्रस्थापित करण्यास सक्षम करेल आणि वायरएमसीबीस्विचलाइटिंग इत्यादींची विस्तृत श्रेणी देऊ करेल.

नाविन्यपूर्ण उत्पादने बाजारात आणण्यात फिनोलेक्स आघाडीवर आहे. फ्लेम रिटार्डंट लो स्मोक (FR-LSH) इलेक्ट्रिकल वायर सादर करणारी भारतातील पहिली कंपनी म्हणूनकंपनी कन्सिल्ट आणि कंड्युट वायरिंगसाठी त्याचा वापर करण्याची शिफारस करत आहे. FR-LSH वायर खूप कमी धूर आणि विषारी वायू उत्सर्जित करतात. तसेच आग पसरण्यास प्रतिबंध करतातज्यामुळे त्या सुरक्षिततेबद्दल जागरूक ग्राहकांसाठी आदर्श ठरतात.

ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणुकीसह शहरीकरणाच्या प्रक्रियेमुळे हाय व्होल्टेज (एचव्ही)/ एक्स्ट्रा हाय व्होल्टेज (ईएचव्ही) पॉवर केबलना मोठी मागणी निर्माण झाली आहे. फिनोलेक्स जे पॉवर सिस्टीम्स उत्पादन सुविधा EHV XLPE (अतिरिक्त हाय व्होल्टेज क्रॉस लिंक्ड पॉली इथिलीन) इन्सुलेटेड पॉवर केबल्स तयार करण्यासाठी सुसज्ज आहे. कारण भारतातील हा एकमेव प्लांट आहे, ज्यामध्ये 121 मीटर लांबीचा उभा स्तंभ आहे. कंपनी संपूर्ण भारतातील बहुतेक उपयोगिता घटकांत/युटिलिटीजमध्ये प्रवेश करू शकली आहे. मग ती राज्य-आधारित उपयोगिता असो किंवा खाजगी उपयोगिता. इंडोनेशियाम्यानमारकुवेत इत्यादी देशांत EHV केबल निर्यात करण्यात फिनोलेक्स यशस्वी ठरली आहेज्यामुळे भारत सरकारच्या आत्मनिर्भर उपक्रमाला मदत झाली.

लगतच्या श्रेणींत विस्तार करण्यावर लक्ष केंद्रित करूनकंपनीने टियर आणि शहरांमध्ये अप्रचलित बाजारपेठांची ओळख पटवली असून मार्च 2023 पर्यंत किरकोळ विक्रेत्यांची संख्या 200,000 पर्यंत नेण्यासाठी पुढील तीन महिन्यांत 50,000 किरकोळ विक्रेते जोडून बाजारपेठेत शिरकाव विस्तारण्याची योजना आहे. याव्यतिरिक्तफिनोलेक्सने ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी परवडणारी वायर श्रेणी सुरू केली आहे.

ग्राहकांच्या बदलत्या पसंतीला प्रतिसाद म्हणूनफिनोलेक्स केवळ उच्च-गुणवत्तेची श्रेणी उत्पादने विकण्यावर आपले लक्ष केंद्रित करत समीप श्रेणींचा समावेश करण्यासाठी आपली उत्पादन श्रेणी वाढवत आहे. त्याच्या विद्यमान किरकोळ चॅनेलमध्ये आता पंखेवॉटर हीटरस्विचस्विचगियरलाइटिंग आणि रूम हीटर्स यांचा समावेश आहेज्यामुळे सशक्त दुहेरी अंकी (डबल डिजीट) वृद्धी शक्य झाली आहे.

मागील वर्षी कंपनीने रूम हीटरची श्रेणी लाँच केली. रूम हीटर सहा उच्च-कार्यक्षमतास्टायलिश पद्धतीने डिझाइन केलेल्या प्रकारात उपलब्ध आहेत. जसे की तेलाने भरलेलेक्वार्ट्ज ट्यूबफॅन ब्लोअरकन्व्हेक्टर आणि हॅलोजन. ग्राहक व्यावहारिक आणि ऊर्जा-कार्यक्षम उपकरणांच्या शोधात असल्याचं ओळखूनफिनोलेक्सने अलीकडेच वाफेवरील आणि कोरड्या इस्त्री (स्टीम अँड ड्राय आयरन)च्या श्रेणीच्या लाँचसह लहान घरगुती उपकरणे विभागात प्रवेश केला आहे. कंपनी स्मार्ट स्विच आणि स्मार्ट डोअर लॉक श्रेणींत प्रवेश करण्याचा विचार करत आहे.

आपल्या वृद्धी धोरणात सातत्य ठेवण्यासाठीफिनोलेक्सची उत्पादनं देशभरातील अनेक रिटेल आउटलेट्सच्या स्टोअर शेल्फवर उपलब्ध असल्याची खात्री करण्यासाठी एक मजबूत टू-टियर डिस्ट्रिब्यूशन मॉडेल स्थापण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. आर्थिक वर्षाच्या अखेरीस 200,000 किरकोळ विक्रेत्यांपर्यंत किरकोळ पोहोच वाढविण्याची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे, ज्यामुळे मोठ्या असंघटित बाजारपेठेचं ब्रँडेड विश्वात रूपांतर होईल. जे उत्तम कामगिरी आणि उच्च सेवा स्तर देत राहील.

कंपनी अत्याधुनिक उत्पादन सुविधा आणि नाविन्यपूर्ण उत्पादन विकासात चालू असलेल्या गुंतवणुकीद्वारे आपली धोरणात्मक घोडदौड कायम ठेवण्यासाठी वचनबद्ध आहे. कंपनीच्या विस्तार योजना या आपल्या ग्राहकांच्या विकसित होत असलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीस हातभार लावण्यासाठी आपली कटिबद्धता दर्शवतात.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight