खास लोकाग्रहास्तव ‘यशोदा’ भेटायला येणार संध्याकाळी ६ वाजता.

झी मराठी ही अशी वाहिनी आहे जी नेहेमी नवनवीन प्रयोग करत असते, झी मराठीवर नेहेमीच वेगवेगळे विषय हाताळले जातात मग ते कौटुंबिक असुदे ऐतिहासिक किंवा मग कॉमेडी. ही वाहिनी आजवर प्रेक्षकांच्या मतांचा नेहेमीच आदर करत आलेय.

 

झी मराठीवर सुरु झालेली अशीच एक प्रबोधन आणि संस्कार पर मालिका म्हणजे “यशोदा - गोष्ट श्यामच्या आईची” ही मालिका दुपारी १२.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत होती, आणि या मालिकेने लहान मुलं आणि पालकांच्या मनात घर देखील केलं होत, ही कथा आहे यशोदाची म्हणजेच एका अश्या आईची आहे जिने साने गुरुजींना घडवलं, ही मालिका आपल्या मुलांवर संस्कार व्हावेत आणि आपली संस्कृती कळावी यासाठी सुरु केली होती, पण मालिकेची दुपारची ही वेळ बदलावी यासाठी अनेक पालकांचे फोन कॉल्स आणि इ मेल्स वाहिनीकडे आले, आणि या सर्वांचा आदर राखत ८ मे पासून ही मालिका प्रेक्षकांना नवीन वेळेत म्हणजे संध्या. ६ वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या मालिकेची निर्मिती केली आहे पिकोलो फिल्म्स ने (वीरेन प्रधान) यांनी आधी वीरेन प्रधान यांची उंच माझा झोका ही मालिका झी मराठीवर खूप गाजली होती.

तेव्हा पाहायला विसरू नका गोष्ट अमर संस्कारांची 'यशोदा- गोष्ट श्यामच्या आईची' एका नवीन वेळेत ८ मे पासून संध्या.६ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Cityflo & Salaam Bombay Foundation

June Is Here, But Humidity Isn't Going Anywhere: Functional Fashion Brands Helping Indians Stay Comfortable