प्लॅनेट मराठीची यशस्वी दोन वर्षं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा
प्लॅनेट मराठीची यशस्वी दोन वर्षं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा महाराष्ट्रीय संस्कृतीला लाभलेला साहित्याचा वैभवशाली वारसा जगभरातील मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने अक्षय विलास बर्दापूरकर यांनी 'प्लॅनेट मराठी' या ओटीटीची सुरुवात केली. मराठीतील सर्वोत्कृष्ट आणि दर्जेदार कंटेंट देणाऱ्या या प्लॅनेट मराठीला आता यशस्वी दोन वर्षं पूर्ण झाली आहेत. जगातील पहिल्या मराठी ओटीटीचा मान मिळवणाऱ्या प्लॅनेट मराठीने अनेक जबरदस्त चित्रपट, वेबसिरीज,शोज, इव्हेंट प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत. यातील रान बाजार,मी पुन्हा येईन,अनुराधा,अथांग, बदली या सर्वाधिक लोकप्रिय वेब सीरिज तर पटलं तर घ्या आणि कलरफुल कोकण हे शोज प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. तमाशा लाईव्ह हा ओटीटीवर सर्वाधिक पाहिलेला सिनेमा ठरला तर पाँडिचेरी अणि जून ला प्रेक्षकांचे विशेष प्रेम मिळालं. याव्यतिरिक्त टॉक शोज, शॉर्ट फिल्म्स, सांगीतिक मैफल असे बरेच मनोरंजनात्मक कार्यक्रमही त्यांनी प्लॅनेट मराठीच्या माध्यमातून जगभरात पोहोचवले. या काळात त्यांनी अनेक नवोदितांना उत्तम व्यासपीठ मिळवून दिले. या सगळ्याच्या ...