बँक ऑफ बडोदा घेऊन येत आहे व्यक्तिगत निवासी ग्राहकांसाठी व्हिडिओ री-केवायसी

बँक ऑफ बडोदा घेऊन येत आहे व्यक्तिगत निवासी ग्राहकांसाठी व्हिडिओ री-केवायसी

ग्राहक शाखेला भेट केवळ काही मिनिटांत सुरक्षितपणे डिजिटल पद्धतीने री-केवायसी पूर्ण करू शकतात

मुंबई, 23 ऑगस्ट, 2023: बँक ऑफ बडोदा (बँक) ह्या भारतातील आघाडीच्या सार्वजनिक बँकांपैकी एकीने पात्र व्यक्तिगत निवासी ग्राहकांसाठी (रेसिडेंट कस्टमर) व्हिडिओ री-केवायसीची घोषणा केली आहे. इंग्रजी व हिंदी भाषेत ही सुविधा उपलब्ध आहे. ग्राहकांना केवायसीमधील (नो युअर कस्टमर) नियमित अद्यतन डिजिटल पद्धतीने पूर्ण करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली ही पर्यायी व अधिक सोयीस्कर पद्धत आहे. ज्या ग्राहकांना री-केवायसी करणे आवश्यक आहे, ते शाखेत न जाता केवळ काही मिनिटांत व्हिडिओ केवायसी करू शकतात. 

व्हिडिओ केवायसी सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी ग्राहक निवासी व्यक्ती असला/असली पाहिजे, त्याचे/तिचे वय 18 वर्षांहून अधिक असले पाहिजे आणि त्याच्या/तिच्याकडे आधार क्रमांक व मूळ पॅन कार्ड असले पाहिजे. पहिल्या टप्प्यात ग्राहकांना Bank of Baroda websiteला भेट द्यावी लागेल आणि काही मूलभूत माहिती भरून ऑनलाइन री-केवायसी अर्ज पूर्ण करावा लागेल. हा ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर, बँक एग्झिक्युटिव व्हिडिओ केवायसी कॉल करतील. व्हिडिओ कॉलमध्ये ग्राहकांना मूळ पॅन कार्ड, एक कोरा पांढरा कागद व एक निळा/काळा पेन ह्यांची आवश्यकता असेल. 

व्हिडिओ री-केवायसी कॉल्स सर्व कामाच्या दिवसांना कामाच्या वेळेत (सकाळी 10:00 ते संध्याकाळी 6:00) घेतले जातील. 

व्हिडिओ सत्र यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर बँकेच्या नोंदींमधील ग्राहकांचे तपशील अद्ययावत केले जातील आणि त्याची पुष्टी करणारा एक टेक्स्ट संदेश ग्राहकाला पाठवला जाईल. 

केवायसी नियमितपणे अद्ययावत करणे (री-केवायसी) भारतीय रिझर्व्ह बँकेने बंधनकारक केले आहे. त्यानुसार केवायसी अद्ययावतीकरणाची वेळ आल्यानंतर ग्राहकांनी तत्काळ त्यांचे बँकेकडील दस्तावेज अद्यतन करणे आवश्यक आहे. व्हिडिओ री-केवायसी सुविधा सुरू केल्यामुळे ही प्रक्रिया अधिक सुलभ, अधिक सोयीस्कर झाली आहे आणि ग्राहकाचा संपूर्ण अनुभव त्यामुळे उंचावला आहे. ज्या ग्राहकांचे री-केवायसी अद्यतन राहिले आहे ते ह्या सुविधेचा लाभ घेऊन सहजतेने प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकतात. 

बँक ऑफ बडोदाने 2021 मध्ये पूर्ण क्षमतेची डिजिटल बचतखाती उघडण्यासाठी व्हिडिओ केवायसीची सुविधा प्रथम आणली. बँकेने आता ग्राहकांच्या सोयीसाठी री-केवायसीसाठीही व्हिडिओ केवायसी सुविधा सुरू केली आहे. 

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight