नादिर गोदरेज यांचा प्रतिष्ठित 'सीएलएफएमए जीवनगौरव' पुरस्काराने सन्मान

नादिर गोदरेज यांचा प्रतिष्ठित 'सीएलएफएमए जीवनगौरव' पुरस्काराने सन्मान 

मुंबई२८ ऑगस्ट२०२३ -'गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड'चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आणि 'गोदरेज ॲग्रोव्हेट लिमिटेडचे' अध्यक्ष नादिर गोदरेज यांना पशुधन उद्योगातील योगदान आणि कामगिरी यांबद्दल प्रतिष्ठित 'सीएलएफएमए जीवनगौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 'सीएलएफएमए ऑफ इंडिया' या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका समारंभात गोदरेज यांना हा पुरस्कार देण्यात आला.

'द कंपाउंड फीड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया' (सीएलएफएमए) ही पशुधन क्षेत्रातील एक सर्वोच्च संस्था आहे. देशातील पशुधन क्षेत्रात या संस्थेचा मोठा दबदबा आहे. तिचे २३०हून अधिक सदस्य प्राणीजन्य प्रथिनांच्या संपूर्ण मूल्यशृंखलेचे प्रतिनिधित्व करतात. त्यांत पशुधन बाळगणारे शेतकरी, केंद्र व राज्य सरकारे, कृषी विद्यापीठे, देशभरातील संशोधन संस्था आणि तत्सम जाणकार यांचा समावेश होतो.

गोदरेज यांनी यापूर्वी 'सीएलएफएमए ऑफ इंडिया' या संस्थेचे अध्यक्षपद भूषविले होते. जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाल्यावर ते म्हणाले, "हा सन्मान मिळाल्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो. 'गोदरेज ॲग्रोव्हेट'च्या संपूर्ण चमूच्या सामूहिक प्रयत्नांना या सन्मानाचे श्रेय जाते."

“भारताच्या पशुखाद्य उद्योगामध्ये वाटचाल करताना आम्हाला अनेक वेळा वैविध्ये आणावी लागली आणि अनेकदा आम्हाला संधीही मिळाल्या. जागतिक पातळीवर भागीदारी करीत 'कंपाऊंड फीड' बनविण्यापासून ते आव्हानांना तोंड देण्यापर्यंत, आमची वाटचाल नेहमीच नाविन्यपूर्ण ठरली. सरकारचे सहकार्य आणि 'एनजीसीएआरडी'सारख्या अत्याधुनिक केंद्रांमुळे आम्हाला ही वाटचाल करता आली. शहरीकरण आणि बदलत्या उपभोग पद्धतींमुळे दर्जेदार प्रथिनांची मागणी वाढत आहे. यावरूनच प्रथिनांचा कार्यक्षम व सुलभ स्रोत प्रदान करण्याची या उद्योगाची क्षमता स्पष्ट होते. नवोन्मेष आणि सहकार्याचा स्वीकार करून आपण या क्षेत्राला स्वयंपूर्णता, समृद्धी आणि हरित भविष्याकडे नेऊ शकतो आणि भारतीय शेतीला उर्जितावस्था देऊ शकतो,” असे गोदरेज पुढे म्हणाले.

'सीएलएफएमए ऑफ इंडिया'च्या परिसंवादामध्ये पशुधन उद्योगातील तज्ज्ञ, धोरणकर्ते आणि भागधारक यांनी भाग घेतला. मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय या क्षेत्रांच्या शाश्वत वाढीसाठी आवश्यक ती धोरणे आखण्याची व त्याबाबत परस्पर सहकार्य करण्याची गरज या परिसंवादात व्यक्त करण्यात आली. या उद्योगांच्या उज्वल भविष्यासाठी, तसेच तांत्रिक नवकल्पना, जबाबदार शेतीपद्धती आणि राष्ट्राचा सर्वांगीण विकास यांसाठी या कार्यक्रमाने उत्प्रेरक म्हणून काम केले.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight