यूपीएल एसएएसने (UPL SAS) शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आणि शाश्वत कृषी पद्धतींना प्रोत्साहन ..

यूपीएल एसएएसने (UPL SASशेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आणि शाश्वत कृषी पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी एनएसएल शुगर्ससह (NSL Sugarsसामंजस्य करार केला

~३०,००० एकर एवढ्या क्षेत्राला व्यापणारा आणि वाढीव उत्पन्न व नफ्याद्वारे १५,००० शेतकऱ्यांना लाभ देणारा शाश्वत मिठास उपक्रम संयुक्तपणे राबवविणार

~नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करून आणि झेबा तंत्रज्ञानासह क्रांतिकारी प्रोन्युटिवा पॅकेज वापरुन १५% उत्पन्न वाढविण्याचे ध्येय

२१ ऑगस्ट२०२३: शाश्वत कृषी उत्पादने आणि उपाय पुरविणारी एक जागतिक स्तरावरील कंपनी, यूपीएल सस्टेनेबल अॅग्रिकल्चर सोल्युशन्स लिमिटेड (UPL SAS) ने ‘शेतकऱ्यांना प्राधान्य’ हा दृष्टिकोन समोर ठेऊन शाश्वत ऊस उत्पादनासाठी  देशातील आघाडीच्या साखर उत्पादकांपैकी एक असलेल्या एनएसएल शुगर्स लिमिटेड (NSL Sugars Limited) सोबत सामंजस्य करार केला. नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करून पर्यावरणपूरक व हरित शेतीला प्रोत्साहन देण्याचे या सहभागीदारीचे ध्येय आहे. एनएसएलसोबत केलेला हा सामंजस्य करार अप्रत्यक्षपणे तेलंगणाकर्नाटक आणि महाराष्ट्र या तीन राज्यांमधील जवळपास ५०,००० लाभार्थींना जोडेल  आणि याअंतर्गत सुमारे एक लाख एकर क्षेत्र येईल. यूपीएल एसएएस आणि एनएसएल शुगर्स यांच्यातील ही भागीदारी दोघांसाठी फायदेशीर आहे. यूपीएल एसएएसने या भागीदारीमुळे बाजारात प्रवेश मिळविला तर एनएसएल शुगर्सला ऊसाच्या शाश्वत शेतीचे फायदे मिळाले. शाश्वत व पर्यावरण पूरक साखर खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसह साखर मूल्य साखळीच्या संपूर्ण परिसंस्थेसाठीच ही भागीदारी फायदेशीर आहे.

            या भागीदारीचे प्राथमिक उद्दिष्ट प्रति एकर उत्पादनात किमान १५% वाढ म्हणजेच अंदाजे ५ मेट्रिक टन प्रति एकर उत्पादन करणे हे आहे. यामुळे शेतकऱ्यांना १२,००० ते १५,००० रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळेल. शाश्वत कृषी पद्धतींना प्रोत्साहन देत असतानाच शेतकऱ्यांच्या खर्चात मोठ्या प्रमाणात घट करणे हे देखील या भागीदारीचे उद्दिष्ट आहे. या एकत्रित प्रयत्नांमुळे अंदाजे ६ लाख लीटर पाणी आणि प्रति एकर ५० किलोग्रॅम युरियाची बचत होणे देखील अपेक्षित आहे. परिणामी पर्यावरणपूरकहरित व शाश्वत शेती पद्धतींना चालना मिळेल आणि पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम कमी होतील.

            ही भागीदारी यूपीएल एसएएसचा शाश्वत साखर उत्पादनासाठीचा कार्यक्रम –‘शाश्वत मिठास’ उपक्रमाचाच विस्तारीत कार्यक्रम म्हणून काम करेल. यापूर्वीही ‘शाश्वत मिठास’ उपक्रमाने महाराष्ट्रातील पुणे परिसरात जवळपास १०,००० एकर क्षेत्रामध्ये यशस्वीपणे कार्य करून लक्षणीय प्रगती केलेली आहे. तीन वर्षाच्या कालावधीमध्ये यूपीएल एसएएस आणि एनएसएल या उपक्रमाची टप्प्या टप्प्याने अंमलबजावणी करून या भागीदारीला वरच्या स्तरावर नेतील. पहिल्या वर्षात सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ३०,००० एकर क्षेत्र व्यापले जाईल. नंतर हळूहळू व्याप्ती वाढवीत संपूर्ण कार्यक्षेत्राला समाविष्ट केले जाईल.

            सुरुवातीच्या टप्प्यामधील ३०,००० एकर क्षेत्रावर या उपक्रमाचा मोठ्या प्रमाणात व लक्षणीय प्रभाव होईल अशी अपेक्षा आहे. यातून अंदाजे १८०० कोटी लीटर पाण्याची बचत होणे अपेक्षित असून ही बचत जवळपास ६ लाख लीटर प्रति एकर असेल. याशिवाय, एकूण १५०० मेट्रिक टन युरिया म्हणजेच प्रति एकर अंदाजे ५० किलोग्रॅम युरियाचा वापर कमी करण्याचे  देखील या कार्यक्रमाचे ध्येय आहेज्यामुळे नायट्रस ऑक्साइड (GHG) उत्सर्जनात २५% नी घट होईल. नायट्रस ऑक्साइड (GHG) हे कार्बनडायऑक्साइडपेक्षा ३०० पट जास्त शक्तिशाली असते. यूपीएल आणि एनएसएल मधील ही भागीदारी ऊस लागवडीमध्ये शाश्वत पद्धतींच्या वापरासाठी त्यांची असलेली कटिबद्धता आणि संसाधनांचे संरक्षण व जतन करणेपर्यावरणावर होणारा दुष्परिणाम कमी करणे आणि शाश्वत शेती पद्धतींना प्रोत्साहन देणे यांसाठी त्यांचे असणारे समर्पण दर्शविते.

            यूपीएल लिमिटेड मध्ये जागतिक कॉर्पोरेट आणि इंडस्ट्री अफेअर्सचे अध्यक्ष श्री. सागर कौशिक म्हणाले, शाश्वततेबाबतची आमची अढळ बांधिलकी आमच्या प्राधान्यक्रमामध्ये नेहमीच आघाडीवर आहे. आमच्या प्राथमिक व सर्वात महत्वाच्या  भागधारकांच्या, म्हणजेच शेतकऱ्यांच्यासमृद्धीसाठी आणि कल्याणासाठी आम्ही नेहमी समर्पित राहू. शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करून शेती आणि पर्यावरण  या दोहोंमध्ये समतोल साधण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. शाश्वत ऊस कार्यक्रमाची ओळख हा आमच्या एक व्यापक स्वप्नदृष्टीचा केवळ एक सुरुवातीचा टप्पा आहे. भविष्यात संपूर्ण अन्न मूल्य साखळीमध्ये शाश्वततेची व्याख्याच बदलण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि त्यासाठी या अशा शाश्वत पद्धतींमध्ये वेगवेगळ्या पिकांचा समावेश करण्याचा आमचा निश्चय आहे.

यूपीएल एसएएस लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आशिष डोभाल  म्हणाले, आमच्या या भागीदारीतून शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध करणेपर्यावरणावर होणारा दुष्परिणाम कामी करणे, बाजारातील मागणी पूर्ण करण्यासाठी उत्तम गुणवत्तेचे ऊस उपलब्ध करवून देणे हे आमचे ध्येय आहे. प्रोन्यूटिव्हा पॅकेज आणि क्रांतिकारी झेबा तंत्रज्ञान पिकाचे उत्पादन वाढविण्यात आणि मातीची गुणवत्ता व प्रत सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात व त्यामुळे ऊस तोडणी प्रक्रियेमध्ये पूर्णपणे परिवर्तन येईल. हे सर्वसमावेशक पॅकेज शेतकऱ्याला अनेक फायदे देते. उत्पादन वाढ आणि नफा याबरोबरच पर्यावरणीय शाश्वततेमध्ये देखील हे योगदान देते. यूपीएल एसएएस (UPL SAS) आणि एनएसएल (NSL) हे एकत्र येऊन ऊसाच्या क्षेत्रात शाश्वत प्रगती आणण्यासाठी नेतृत्व करत आहेतजेणेकरून शेतकरीपर्यावरण आणि संपूर्ण मूल्य साखळीलाच फायदा होईल.

एनएसएल समूहाचे चेअरमन श्री. गोविंद राजुलू चिंताला म्हणाले, मजबूत सहयोग आणि सहभाग यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सहाय तितके सर्वोत्तम उपाय पुरविणे यासाठी एनएसएल समूहाचे सर्वाधिक प्रयत्न व समर्पण असते. आमचा ठाम विश्वास आहे की आमच्या शेतकऱ्यांना ऊस लागवडीसाठी ज्या समस्यांना सामोरे जावे लागते त्या सोडविण्यासाठी शाश्वत शेतीचा स्वीकार करणे हे फार महत्त्वाचे आहे. पर्यावरणपूरक पद्धतींची अंमलबजावणी करून आमचे उद्दिष्ट ऊसाचे उत्पादन प्रति एकर जास्तीत जास्त वाढवणे हे आहे. ज्यामुळे आमच्या शेतकऱ्यांचे उत्पादन सुढाऊन त्यांचे उत्पन्न वाढेल. आपल्या शेतकऱ्यांना सक्षम बनविण्याच्या दृष्टीने आणि ऊसाच्या शेतीमध्ये एक भरभराटीचे व शाश्वत भविष्य सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने ही भागीदारी म्हणजे एक महत्वाचे पाऊल आहे. 

            बाजारपेठेतील ऊस पुरवठ्यातील कमतरतेच्या समस्येला सोडविण्यासाठी ही भागीदारी उद्योग क्षेत्रातील गरजांना सहाय्य करून पुरवठा साखळी स्थिर करत साखर कारखान्यांना पुरेश्या ऊसाची उपलब्धता सुनिश्चित करेल. शाश्वत व पर्यावरणपूरक ऊसाची लागवड व्हावी हे सुनिश्चित करण्यासाठी हा सामंजस्य करार शेतकऱ्यांना चांगल्या शेती पद्धती (गुड अॅग्रोनॉमीकल प्रॅक्टिसेस GAP)प्रोन्यूटिव्हाची अंमलबजावणी (संपूर्ण पीक संरक्षण आणि पोषण पॅकेज)लागवडीसंबंधित यांत्रिकीकरण, नांगरणीसाठी यंत्रेबूम फवारणी यंत्रेनर्चर.फार्म अॅप (Nurture.farm) च्या माध्यमातून विमा आणि तपासणी अशा प्रकारच्या अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत प्रत्येक टप्प्यांमध्ये शाश्वत उपाययोजना पुरवेल.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight