एयू स्‍मॉल फायनान्‍स बँकेकडून अल्‍ट्रा एचएनआय ग्राहकांसाठी एयू आयव्‍हीवाय प्रोग्राम लाँच

एयू स्मॉल फायनान्स बँकेकडून अल्ट्रा एचएनआय ग्राहकांसाठी एयू आयव्हीवाय प्रोग्राम लॉच  

मुंबई, 22ऑगस्‍ट 2023 - एयू स्‍मॉल फायनान्‍स बँक या भारतातील सर्वात मोठ्या एसएफबीने नवीन एयू आयव्‍हीवाय प्रोग्रामच्‍या लाँचची घोषणा केली आहे. विशेषत: हाय-नेट-वर्थ इंडिव्हिज्‍युअल्‍स (एचएनआय) व अल्‍ट्रा-हाय नेट वर्थ इंडिव्हिज्‍युअल्‍स (अल्‍ट्रा-एचएनआय) यांच्‍याकरिता डिझाइन करण्‍यात आलेला अत्‍यंत सुपर प्रिमिअम बँकिंग प्रोग्राम वैशिष्‍ट्यपूर्ण आहे आणि सूक्ष्‍मदर्शी ग्राहकांच्‍या निवडक समूहाला वैयक्तिक आमंत्रण देण्‍याच्‍या माध्‍यमातून विस्‍तारित करण्‍यात आला आहे. 

एयू आयव्‍हीवाय प्रोग्राम सीएक्‍सओ, उच्‍च-स्‍तरीय व्‍यावसायिक आणि स्‍वयं-रोजगारित उद्योजक यांच्‍यासह प्रतिष्ठित व्‍यक्‍तींच्‍या अत्‍याधुनिक गरजांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. दीर्घकालीन संबंध निर्माण करणारा पाया रचण्‍याकरिता आणि या उच्‍चभ्रू ग्राहकांच्‍या अद्वितीय महत्त्वाकांक्षांशी संलग्‍न असलेले विशेष बँकिग अनुभव प्रदान करण्‍याकरिता हा उपक्रम राबवण्‍यात येत आहे.

एयू आयव्‍हीवाय प्रोग्रामची खासियत म्‍हणजे त्‍याचे सर्वात विशिष्‍ट वैशिष्‍ट्य - '३-इन-१ मेटलिक डेबिट कार्ड'. प्रतिष्ठित व्हिसा इन्‍फानाइट व्‍यासपीठावर निर्माण करण्‍यात आलेल्‍या या कार्डमध्‍ये डेबिट, फॉरेक्‍स व प्रायोरिटी पासच्‍या फंक्‍शन्‍सचा समावेश आहे. हे फक्‍त कार्ड नसून सोयीसुविधा व लक्‍झरीचे गेटवे देखील आहे. अनेक कॉम्‍प्‍लीमेण्‍टरी सेवा आणि 'नो चार्जेस्'चे वचन देणाऱ्या या प्रोग्राममधून एयू स्‍मॉल फायनान्‍स बँकेची बँकिंग अनुभवामध्‍ये नवीन सुधारणा करण्‍याप्रती कटिबद्धता दिसून येते.

ठळक वैशिष्‍ट्ये:       

झीरो क्रॉस करण्‍सी मार्क-अप: 'झीरो क्रॉस करण्‍सी मार्क-अप'सह परदेशात प्रवास करणे सोपे झाले आहे, जेथे आंतरराष्‍ट्रीय व्‍यवहारांवरील अतिरिक्‍त शुल्‍क कमी करण्‍यात आले आहे. 

अमर्यादित बँकिंग सोयीसुविधा: एयू आयव्‍हीवायचे ग्राहक बँकेच्‍या कोणत्‍याही एटीएममध्‍ये अमर्यादित व्‍यवहार, तसेच शाखांमध्‍ये अमर्यादित कॅश डिपॉझिट, पैसे काढणे व डिजिटल पेमेंट्सचा आनंद घेऊ शकतात. 

विशेष लॉकर ॲक्‍सेस: सदस्‍यांना कोणत्‍याही आकाराचे दोन कॉम्‍प्‍लीमेण्‍टरी लॉकर्स दिले जातात, ज्‍यामधून मौल्‍यवान वस्‍तूंसाठी सुरक्षित स्‍टोरेजची खात्री मिळते. 

एयू आयव्‍हीवाय प्रोग्रामचे मूल्‍य तत्त्व नॉन-फ्यूएल खर्चांवर १ टक्‍के कॅशबॅकच्‍या रिवॉर्ड प्रोग्रामसह अधिक वाढते, ज्‍यामुळे प्रत्‍येक खरेदी लाभदायी अनुभव बनतो. एयू आयव्‍हीवाय ग्राहकाच्‍या कुटुंबाचे बँकेसोबतच्‍या टोटल रिलेशनशीप व्‍हॅल्‍यूशी संलग्‍न विशेष फायदे देत पारंपारिक बँकिंग मॉडेल्‍सना मागे टाकते. 

नवीन सदस्यांचे स्वागत विशेषतः क्युरेट केलेल्या ताज एपिक्युअर प्रिव्हिलेज्ड मेंबरशिपने केले जाते, ज्‍यामुळे नामांकित हॉटेल्‍स, फाइन डाइन आस्‍थापना, स्‍पा ट्रीटमेंट्स असे विशेषाधिकार मिळतात. 

''एयू आयव्‍हीवाय फक्‍त बँकिंग प्रोग्राम नसून त्‍यामध्‍ये विशिष्‍टता व अत्‍याधुनिकता सामावलेली आहे,'' असे एयू स्‍मॉल फायनान्‍स बँकेचे कार्यकारी संचालक उत्तम तिब्रेवाल म्‍हणाले. ''आमच्‍या बँकेने वैयक्तिकृत सेवा, नाविन्‍यपूर्ण सोल्‍यूशन्‍स आणि सर्वोत्तमतेप्रती अविरत कटिबद्धतेच्‍या माध्‍यमातून बँकिंग अनुभवाला नवीन आकार देण्‍यामध्‍ये सतत नेतृत्‍व केले आहे. एयू आयव्‍हीवाय प्रोग्राम नवीन आकारमान सादर करतो, पारंपारिक बँकिंग पद्धतीमध्‍ये परिवर्तन घडवून आणतो, ज्‍यामुळे आमच्‍या प्रतिष्ठित सदस्‍यांना त्‍यांच्‍या इच्‍छा व महत्त्वाकांक्षांशी जुळणारी असाधारण जीवनशैली देता येते.''

व्हिसा इंडियाच्‍या व्‍यवसाय विकासाचे प्रमुख सुजय रैना म्‍हणाले, ''आम्‍हाला या सुपर प्रिमिअम डेबिट कार्डच्‍या सादरीकरणासाठी एयू स्‍मॉल फायनान्‍स बँकेसोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे. हे कार्ड बँकेच्‍या हाय नेट वर्थ व अत्‍यंत श्रीमंत ग्राहकांच्‍या गरजांची पूर्तता करते. हे विशेष तत्त्व उच्‍च दर्जाचा बँकिंग अनुभव व प्रिमिअम जीवनशैली फायदे देते, ज्‍यामध्‍ये प्रिमिअम हॉटेल्‍स व इतर आदरातिथ्‍य अनुभवांचा विशेषाधिकार, आंतरराष्‍ट्रीय प्रवासावर फायदे आणि एअरपोर्ट लाऊंजेस व गोल्फिंग प्रीव्हिलेजेसची विशेष उपलब्‍धता यांचा समावेश आहे. हे सर्व विशेषाधिकार व्हिसाच्‍या सुरक्षित, विश्‍वसनीय आणि एकसंधी व्‍यवहार अनुभवाच्‍या वचनासह मिळतात.''  

लाँच करण्‍यात आलेला एयू आयव्‍हीवाय प्रोग्राम एयू स्‍मॉल फायनान्‍स बँकेची अल्‍ट्रा-प्रिमिअम ग्राहकांच्‍या अद्वितीय गरजांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या अद्वितीय सेवा व विशिष्‍टता प्रदान करण्‍याप्रती समर्पितता अधिक दृढ करतो. 

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight