राघवची नोकरी धोक्यात ?

 राघवची नोकरी धोक्यात ?

'नवा गडी नवं राज्य' ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी ठरत असून मालिका आता एका रोमांचक वळणावर आली आहे. नुकतंच आपण पाहिलं की राघवला नवीन केसच्या कामानिमित्त ऑफिस मध्ये खूप उशिरापर्यंत थांबावं लागतं म्हणून योजनापण त्यांच्या बरोबर थांबते. पण दुसऱ्या दिवशी योजना राघव वर खोटा आरोप करते की  राघवने   तिच्यासोबत वाईट वागणूक केली अशी खोटी बातमी पसरवते आणि व्हिडिओ सगळीकडे व्हायरल करून गैरसमज निर्माण करते. हे सगळं बघून घरच्यांचा गोंधळ होतो. आता या सर्व प्रकरणामध्ये राघवला त्याची नोकरी सोडावी लागेल का आनंदी राघवला त्याचा सन्मान परत मिळून देऊ शकेल?  हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचे ठरणार आहे. तेव्हा पाहायला विसरू नका 'नवा गडी नवं राज्यसोमवार ते शनिवार रात्री ९:०० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight