केप्री लोन्सच्या ग्रुप चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर पदावर तरुण अग्रवाल यांची नियुक्ती

केप्री लोन्सच्या ग्रुप चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर पदावर तरुण अग्रवाल यांची नियुक्ती

मुंबई, 12 जुलै 2024: केप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड (केप्री लोन्सया एका प्रमुख नॉन-बँकिंग फायनान्शिअल कंपनीने श्री. तरुण अग्रवाल यांची ग्रुप चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर म्हणून नियुक्ती केली आहेहे त्यांच्या डिजिटल परिवर्तन प्रवासातील एक महत्त्वाचे पाऊल आहे.

श्री अग्रवाल यांना तंत्रज्ञान नेतृत्वातील प्रचंड अनुभव असून केप्री लोनमध्ये इनोव्हेशन आणि कार्यक्षमतेला ते चालना देतील. ग्राहक-केंद्रित उपाययोजना वाढविणे आणि कंपनीच्या डिजिटल पायाभूत सुविधा प्रगत करणे यावर ते भर देतीलव्याप्ती वाढविणारी आणि विश्वसनीय प्रणाली तयार करण्यात त्यांच्या तज्ज्ञतेमुळे प्लॅटफॉर्म भक्कम होईल आणि वापरकर्त्यांच्या वाढत्या मागण्या हाताळण्यास सक्षम होईल. केप्री लोनचे वित्तीय क्षेत्रातील अग्रस्थान कायम ठेवण्यासोबतच ग्राहकांना अखंड आणि सुरक्षित अनुभव प्रदान करणेहे या धोरणात्मक पावलाचे उद्दिष्ट आहे.

केप्री ग्लोबलचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश शर्मा म्हणाले, "आमच्या ग्रुपचे नवे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर या पदावर स्वागत करताना आम्ही अत्यंत रोमांचित आहोत. विविध प्रकारचे तंत्रज्ञान आणि डेटा सायन्स यांचा उफयोग करून घेऊन केप्री लोन्स डिजिटायझेशनची महत्त्वाकांक्षी वाटचाल करत आहे. तरुण यांची नियुक्ती ही आमच्या ग्राहकांसाठी अतुलनीय मूल्य निर्माण करणाऱ्या आघाडीच्या एनबीएफसींमध्ये आमचे स्थान निर्माण करण्याच्या महत्त्वाच्या टप्प्याचे द्योतक आहे. आमच्या सेवांमध्ये वृद्धी करण्यासाठीग्राहकांना अधिक चांगला अनुभव देण्यासाठी, क्रॉस-प्रोडक्ट सिनर्जीसाठी आणि अविरत इनोव्हेशनला चालना देण्यासाठी डिजिटायझेशन अत्यंत महत्त्वाचे आहे."

श्री. अग्रवाल हे एक अनुभवी व्यावसायिक असून त्यांना जनरेटिव्ह एआयबिग डेटा नालिटिक्सक्लाउड कम्प्युटिंगडेव्हऑप्सइन्फ्रास्ट्रक्चरप्लॅटफॉर्म इंजीनिअरिंगआणि क्वालिटी श्युअरन्समध्ये सुमारे 20 वर्षांचा अनुभव आहे. केप्री लोन्समध्ये रुजू होण्यापूर्वी ते पेटीएममध्ये वरिष्ठ उपाध्यक्ष होते. त्याचप्रमाणे डोबी सिस्टिम्सक्वाड नालिटिक्स (वायझर)एक्स्पिडिया इंडिया आणि गुआव्हस नेटवर्क्समध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. भारताच्या आधार वेब सर्व्हिसेसशी डोबी साइनचे एकत्रिकरण करणे आणि एडब्ल्यूएस आणि अझुरेमध्ये कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीशी जुळवून घेणारे मल्टि-क्लाउड रिकव्हरी सोल्यूशन विकसित करणे ही त्यांची उल्लेखनीय ध्येयसिद्धी आहे.

त्यांनी आयएमटी गाझियाबादमधून बिझनेस मॅनेजमेंट विषयात पदव्युत्तर पदविका प्राप्त केली आहे आणि कुरुक्षेत्र विद्यापीठातून कम्प्युटर सायन्स शाखेतून बी. टेक. ही पदवी प्राप्त केली आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Reflections and Aspirations from EV Industry Leaders in 2024 & Outlook 2025

The International Temples Convention & Expo (ITCX) 2025