छत्रपती संभाजी महाराज स्मारक लवकर पूर्ण करण्याची ग्वाही

संगमेश्वरात सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची छत्रपती संभाजी महाराज स्मारकाची पाहणी करुन स्मारक लवकर पूर्ण करण्याची ग्वाही

संगमेश्वर दि १५ जुलै २०२६ - महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री तथा भाजपचे वरिष्ठ नेते आणि आमदार ॲड. आशिष शेलार यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे उभारण्यात येणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या प्रस्तावित जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध असून भाजपचे आमदार प्रमोद जठार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचे यासाठी विशेष प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

"धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण केले जाईल. स्मारकाच्या प्रस्तावित आराखड्याचा आढावा घेण्यासाठी आणि प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी मी येथे आलो आहे," असे शेलार यांनी यावेळी सांगितले.

यावेळी त्यांनी स्मारकाचा प्रस्तावित आराखडा आणि सादरीकरण पाहून संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. स्मारकाच्या उभारणीबाबत विविध बाबींचा आढावा घेण्यात आला.

या पाहणीवेळी आमदार प्रमोद जठार, प्रशांत यादव, राजेंद्र महाडिक, पंचायत समिती सभापती शर्वरी वेल्ये तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते श्री आशिष शेलार यांचा सत्कारही करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO