'द्विधा' मधून निमिष कुलकर्णी पहिल्यांदाच मराठी चित्रपटात!

 'द्विधा' मधून निमिष कुलकर्णी पहिल्यांदाच मराठी चित्रपटात!

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमामुळे अभिनेता निमिष कुलकर्णी घराघरांत पोहोचला. आपल्या सहजसुंदर अभिनयशैली आणि अचूक विनोदी टायमिंगमुळे त्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. मर्डरवाले  कुलकर्णीया मराठी नाटकानंतर हिंदी चित्रपट 'अग्नि'मध्ये तो झळकला. सध्या 'सनई चौघडे' मालिकेतील त्याच्या गाजणाऱ्या भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता तो 'द्विधा' या आगामी मराठी चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर दमदार पदार्पण करणारआहे. येत्या २१ ऑगस्टला 'द्विधा' हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

आदित्य (आदि) व्यक्तिरेखा या चित्रपटात तो साकारत आहे. मनाने प्रेमळ, समजूतदार आणि विश्वासू असलेला आदि कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारा शांत आधार आहे. आदि हा श्रावणीचा आत्येभाऊ. बालपणापासून एकत्र वाढल्यामुळे त्यांच्या नात्यात प्रेम, विश्वास आणि अनेक सुंदर आठवणींची घट्ट वीण आहे.तो इतरांप्रमाणे जास्त बोलत नाही; पण प्रत्येकाच्या मनातील न बोललेले भाव अचूक ओळखण्याची त्याच्यात विलक्षण संवेदनशीलता आहे. कधी कधी सर्वात मोठा आधार हा मोठ्या शब्दांत नव्हे, तर शांतपणे आपल्या माणसांच्या सोबत उभे राहण्यात असतो, याची जाणीव आदि आपल्या त्याच्या व्यक्तिमत्त्वातून करून देतो.

याबाबत निमिष कुलकर्णी म्हणतो, द्विधा हा केवळ बाप-लेकीच्या नात्याचा चित्रपट नाही, तर प्रत्येक नात्यात दडलेल्या भावनांचा प्रवास आहे. या चित्रपटात माझी भूमिका साकारताना अनेक भावनिक पैलू अनुभवायला मिळाले. निलेश नाईक सरांची संवेदनशील मांडणी आणि अनुभवी कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव खूप समृद्ध करणारा ठरला. प्रेक्षकांनी माझ्यावर आतापर्यंत भरभरून प्रेम केलं आहे. 'द्विधा' मधील माझी ही भूमिका देखील त्यांना नक्कीच आवडेल, अशी मला आशा आहे."

'द्विधा' या आगामी मराठी चित्रपटात बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक जिव्हाळा अत्यंत हळुवार पद्धतीने उलगडण्यात आला आहे.

या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन निलेश भास्कर नाईक यांचे असून निर्माती विदुला रमेश आजगावकर आहेत. चित्रपटात सतीश पुळेकर, मानसी कुलकर्णी, रेणुका दफ्तरदार,आस्ताद काळे, तन्वी कुलकर्णी, पुष्कर सराड, मनोज कोल्हटकर, भूषण कडू, प्रफुल्ल सावंत, हेमांगी वेळणकर आणि ओवी तानवडे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO