एम्बेसी डेव्हलपमेंट्स..

एम्बेसी डेव्हलपमेंट्सने जुहू येथील एम्बेसी तेराझामधील संपूर्ण निवासी टॉवरच्या ७११ कोटी रुपयांच्या विक्रीसाठी एंजल वन लिमिटेडचे संस्थापक व सीएमडी श्री. दिनेश ठक्कर यांच्यासोबत सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केली 

हा भारतातील एकाच निवासी युनिटचा आतापर्यंतचा सर्वात मोठा व्यवहार ठरला आहे.

मुंबई, सप्टेंबर २२, २०२६:-एम्बेसी डेव्हलपमेंट्स लिमिटेड (NSE: EMBDL | BSE: 532/832) ("ईडीएल")ने आज जुहू येथील आपल्या एम्बेसी तेराझा या अल्ट्रा-लक्झरी प्रकल्पातील संपूर्ण निवासी टॉवरच्या विक्रीसाठी एंजल वन लिमिटेडचे ("एओएल") संस्थापक, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. दिनेश ठक्कर यांच्यासोबत सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केल्याची घोषणा केली.

हा देशातील एकाच निवासी युनिटचा (सिंगल रेसिडेन्शिअल युनिट) आतापर्यंतचा सर्वात मोठा व्यवहार आहे. या निवासस्थानात तळमजला अधिक ७ मजल्यांचा (G+7) संपूर्ण टॉवर समाविष्ट आहे. त्याचे रेरा कारपेट क्षेत्र ६३,००० चौरस फूट आहे आणि या व्यवहाराचे अंदाजे मूल्य ७११ कोटी रुपये आहे.

या व्यवहारासाठी सामंजस्य करारावर मुंबईत १९ सप्टेंबर २०२६ रोजी स्वाक्षरी करण्यात आली.

मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित निवासी गंतव्य आणि आघाडीची व्यावसायिक कुटुंबे, उद्योगपती, तसेच सेलिब्रिटींचे निवासस्थान जुहू तारा रोडवर वसलेले एम्बेसी तेराझा २ एकरांपेक्षा जास्त जागेवर पसरलेला, कमी घनतेचा अल्ट्रा-लक्झरी प्रकल्प आहे. यामध्ये अंदाजे ५० निवासस्थान असून त्याचे अंदाजे एकूण विकास मूल्य (ग्रॉस डेव्हलपमेंट व्हॅल्यू) (जीडीव्ही) ३,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. येथील पाच टॉवर्समध्ये प्रत्येक मजल्यावर एकच निवासस्थान असणे हे याच्या डिझाइनचे प्रमुख वैशिष्ट्य आहे, ज्यातून समुद्र आणि शहराचे विहंगम दृश्य, विचारपूर्वक नियोजित केलेली रचना, समृद्ध अंतर्गत उद्याने आणि खास निवडक वेलनेस व जीवनशैली सुविधा मिळतात. हा प्रकल्प एम्बेसी डेव्हलपमेंट्स लिमिटेडद्वारे डेव्हलपमेंट मॅनेजमेंट ("डीएम") मॉडेल अंतर्गत विकसित केला जात आहे.

या घडामोडीबाबत मत व्यक्त करत एम्बेसी डेव्हलपमेंट्स लिमिटेडचे चेअरमन जितेंद्र विरवानी म्हणाले, "गेल्या तीन दशकांत आजच्या गृहखरेदीदारांसाठी कोणती बाब सर्वाधिक मोलाची ठरते, याची सखोल समज एम्बेसीने विकसित केली आहे. आम्ही हाच दृष्टिकोन मुंबईत घेऊन आलो आहोत आणि अगदी कमी कालावधीत देशातील अत्यंत सूक्ष्मदर्शी खरेदीदारांच्या पसंतीस उतरला आहे. श्री. दिनेश ठक्कर यांनी एम्बेसी तेराझामधील संपूर्ण टॉवर विकत घेणे ही आमच्या या दूरदृष्टीची आणि मुंबईत दाखल झाल्यानंतर अवघ्या १८ महिन्यांच्या आत एम्बेसी ब्रँडने मिळवलेल्या विश्वासाची पोचपावती आहे."

एंजल वन लिमिटेडचे संस्थापक, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दिनेश ठक्कर म्हणाले, "जुहूचे स्वतःचे खास वैशिष्ट्य आहे, ज्याची बरोबरी मुंबईतील फार कमी ठिकाणं करू शकतात. मी नवीन घराचा शोध सुरू केला, तेव्हा गोपनीयता, प्रशस्त, समुद्राचे विहंगम दृश्य आणि आमच्या कुटुंबाचे घर ठरेल अशा एका आलिशान, आयकॉनिक निवासस्थानाची निर्मिती करण्याला प्राधान्य दिले.आम्ही आमच्या या नव्या स्वप्नातील घराचे नाव ‘एंजेलस' ठेवले आहे. एम्बेसी ग्रुपद्वारे ते प्रत्यक्षात साकारले जात आहे. एम्बेसी तेराझा या सर्व आकांक्षा एकाच प्रकल्पात एकत्र आणते. हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी, मी माझ्या संकल्पनेला साजेसा वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना साकारण्याच्या एम्बेसीच्या क्षमतेवर आणि त्यांनी वर्षानुवर्षे कमावलेल्या प्रतिष्ठेवर विश्वास दाखवला. एवढ्या भव्य प्रमाणावरील घरासाठी, निवासस्थानाइतकाच विकासकावर असलेला विश्वासही महत्त्वाचा ठरतो. मी आमच्या कुटुंबासाठी अत्यंत विशेष घर म्हणून एम्बेसी तेराझामधील ‘एंजेलस' प्रत्यक्षात साकारताना पाहण्यासाठी मनापासून उत्सुक आहे."

वरळी येथील एम्बेसी सिटाडेल आणि अलिबाग येथील एम्बेसी सेरेनिटी नंतर, पनवेलमधील एम्बेसी पार्क आणि ठाण्यातील एम्बेसी वन या सुरू असलेल्या प्रकल्पांसोबत एम्बेसी तेराझामुळे मुंबई महानगर प्रदेशात ईडीएलच्या निवासी क्षेत्राचा विस्तार आणखी दृढ झाला आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Honda Motorcycle & Scooter India