झी टीव्हीवरील ‘सा रे ग म प’ : आपल्या नवीन भव्य पर्वासह पुन्हा येत आहे..

झी टीव्हीवरील ‘सा रे ग म प’ : आपल्या नवीन भव्य पर्वासह पुन्हा येत आहे;
हिंदी झी5 वरही होणार प्रसारण
मुंबई, 17 सप्टेंबर 2026: झी टीव्हीने आज मुंबईत एका विशेष पत्रकार परिषदेत लोकप्रिय आणि प्रतिष्ठित गायन रिअँलिटी शो ‘सा रे ग म प’ च्या नवीन पर्वाची घोषणा केली. संगीताचा उत्सव साजरा करणाऱ्या ‘हिंदुस्तान का संगीतस्थान’ या संकल्पनेवर आधारित या नवीन पर्वाची झलक यावेळी माध्यमांना दाखवण्यात आली. तसेच, अत्याधुनिक व्हर्च्युअल रिअँलिटी (VR) अनुभवाच्या माध्यमातून ‘सा रे ग म प 2026’ च्या भव्य आणि आकर्षक नव्या सेटचे प्रथम दर्शनही घडवण्यात आले. ह्या शो चा प्रीमियर 19 सप्टेंबर 2026 रोजी होणार असून हा कार्यक्रम दर शनिवार आणि रविवारी रात्री 9:30 वाजता झी टीव्ही आणि हिंदी झी5 वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
जवळपास तीन दशकांची समृद्ध परंपरा, अस्सल संगीत आणि विलक्षण गायक प्रतिभेला व्यासपीठ देण्याचा वारसा जपणाऱ्या ‘सा रे ग म प’च्या नव्या पर्वात प्रेक्षकांना पारंपरिक गायन स्पर्धेपलीकडचा एक भव्य संगीत अनुभव मिळणार आहे. नेत्रदीपक 360 अंशांचा मंच, 100 हून अधिक संगीतकार आणि विशाल कोरस समूहाच्या सहभागामुळे हा कार्यक्रम दूरचित्रवाणीवरील एका भव्य लाईव्ह कॉन्सर्टचा अनुभव देणार आहे. त्याचबरोबर भारतीय संगीत परंपरेचे वैभव, विविधता आणि समृद्ध सांगीतिक वारसा नव्या पर्वातून प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर सादर केला जाणार आहे.
सुमारे तीन दशकांपासून ‘सा रे ग म प’ हा कार्यक्रम गायन क्षेत्रातील नवोदित प्रतिभेचा शोध घेणारे, त्यांना घडवणारे आणि त्यांच्या कलेचा गौरव करणारे विश्वासार्ह व्यासपीठ म्हणून ओळखला जातो. या कार्यक्रमाची लोकप्रियता टिकून राहण्यामागील सर्वांत मोठे कारण म्हणजे बदलत्या काळानुसार आणि प्रेक्षकांच्या आवडीनिवडींनुसार स्वरूपात बदल झाले तरी अस्सल संगीत आणि खऱ्या गायक प्रतिभेला त्यांनी दिलेले सातत्यपूर्ण प्राधान्य हे आहे. याच समृद्ध वारशाला पुढे नेत झी टीव्ही आता संगीताला पूर्णपणे समर्पित असे एक स्वतंत्र विश्व उभारत आहे. येथे ध्वनी, संगीतकौशल्य, सादरीकरण आणि दृश्यरचना अशा प्रत्येक घटकाची सांगड घालून संगीतकलेचा भव्य उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
यंदाच्या पर्वात देशातील विविध भागांतील समृद्ध संगीत परंपरांचा सुरेल संगम पाहायला मिळणार आहे. मंत्रमुग्ध करणाऱ्या सादरीकरणांद्वारे भारतीय संगीताची विविधता, समृद्धता आणि सांस्कृतिक वारसा अधिक प्रभावीपणे उलगडला जाणार आहे, तर त्याचवेळी कार्यक्रमाच्या मूळ आत्म्याशीही प्रामाणिक राहण्यात येणार आहे. या अनुभवाला आणखी भव्यता देण्यासाठी विशेष 360 अंशांचा आकर्षक सेट उभारण्यात आला आहे. भारतीय संगीत रिअॅलिटी शोच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारचा सेट साकारण्यात आला असून त्याच्या माध्यमातून ‘हिंदुस्तान का संगीतस्थान’ हे अनोखे संगीतविश्व प्रेक्षकांसमोर जिवंत होणार आहे.
या पर्वात संगीतविश्वातील चार दिग्गज गुरु - शंकर महादेवन, कुमार सानू, नीति मोहन आणि जावेद अली यांची उपस्थिती विशेष आकर्षण ठरणार आहे. विविध संगीतप्रकारांतील त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ स्पर्धकांना मिळणार असून ते केवळ सादरीकरणांचे परीक्षण करणार नाहीत, तर संपूर्ण स्पर्धेदरम्यान आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा आणि दृष्टीकोनाचा खजिना स्पर्धकांसोबत वाटून त्यांना मार्गदर्शनही करणार आहेत. यंदाच्या पर्वाचे सूत्रसंचालन अभिनेता श्रेयस तळपदे करणार असून त्यांच्या उपस्थितीमुळे या भव्य संगीतसोहळ्याला आणखी रंगत प्राप्त होणार आहे.
ह्या नव्या पर्वाविषयी बोलताना झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेड (झील) चे मुख्य कंटेंट अधिकारी राघवेंद्र हुन्सूर म्हणाले,
"‘सा रे ग म प’ हे झीने भारताला दिलेले सर्वात जुने आणि विश्वासार्ह वचन आहे. जवळपास तीन दशकांपासून ही मालिका अस्सल संगीत आणि खऱ्या गायक प्रतिभेचे प्रतीक म्हणून ओळखली जाते. या काळात तिने अशी कामगिरी केली आहे, जी कोणतेही व्यासपीठ किंवा कोणताही अल्गोरिदम करू शकत नाही. तिने भारतीय संगीताला स्वतःची प्रतिभा ओळखण्याची संधी दिली आहे. झीमध्ये आमचा विश्वास आहे की कोणतीही प्रतिष्ठित मालमत्ता काळानुसार विकसित होत राहिली पाहिजे आणि स्वतःला नव्याने सादर केले पाहिजे, पण त्याचवेळी तिला खास बनवणाऱ्या मूलभूत मूल्यांशीही प्रामाणिक राहिले पाहिजे. आम्ही केवळ काळाच्या ओघात महत्त्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत नाही, तर दीर्घकाळ टिकणाऱ्या सांस्कृतिक संस्था घडवतो.
यंदाच्या पर्वात आम्ही आणखी एक गायन रिअँलिटी शो तयार करण्यापेक्षा संगीताला पूर्णपणे समर्पित असे एक संपूर्ण विश्व उभारण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या मातीशी आणि संगीताशी घट्ट जोडलेली नवी पिढी, त्यांच्या प्रवासाला दिशा देणारे आणि त्यांची प्रतिभा घडवणारे असामान्य संगीतगुरू, तसेच शंभरहून अधिक कलाकारांचा भव्य वाद्यवृंद, ज्यामुळे प्रत्येक आवाजाला त्याच्या स्वप्नांइतकीच मोठी झेप घेण्याची संधी मिळते. भारतीय संगीताची समृद्ध परंपरा आणि वैविध्य हे या पर्वाचे केंद्रस्थान आहे. संगीतकला ज्या भव्यतेची, दर्जाची आणि सन्मानाची हक्कदार आहे, तीच भव्यता, संगीतकौशल्य आणि वैविध्य या पर्वातून अनुभवायला मिळणार आहे. कारण आमच्या मते साधेपणा आणि भव्यता या परस्परविरोधी गोष्टी नाहीत.
‘हिंदुस्तान का संगीतस्थान’ या संकल्पनेमागे हाच विचार आहे. हे असे पर्व आहे जिथे कलाकार, संगीतकार आणि स्वतः संगीतच केंद्रस्थानी असणार आहे. हे केवळ गायकांचा शोध घेण्याचे व्यासपीठ नाही, तर भारतीय संगीताला स्वतःचे घर सापडण्याचे ठिकाण आहे."
नवीन पर्वाविषयी बोलताना झी टीव्हीचे मुख्य चॅनल अधिकारी मंगेश कुलकर्णी म्हणाले,"झी टीव्ही आज प्राइम टाईममध्ये निर्विवादपणे आघाडीवर असून हिंदी जीईसी क्षेत्रातील अव्वल तीन कार्यक्रमांचे घर बनले आहे. हे यश आमच्या प्रेक्षकांनी दिलेल्या भरभरून प्रेमाचे प्रतीक आहे आणि त्यांच्या विश्वासासोबत येणाऱ्या जबाबदारीची जाणीवही करून देते. ‘सा रे ग म प’चा वारसा तीन दशकांहून अधिक काळाचा आहे. या प्रतिष्ठित कार्यक्रमाला पुन्हा प्रेक्षकांसमोर आणताना, त्याची ओळख आणि आत्मा कायम राखत त्याला त्याच्या भव्यतेला साजेशा नव्या स्वरूपात सादर करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. म्हणूनच तो आजही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय गायन मंचांपैकी एक आहे. ‘सा रे ग म प’सारख्या दैदिप्यमान वारशाला नव्याने सादर करताना प्रेक्षकांच्या अपेक्षा किती मोठ्या असतात याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. यंदाच्या पर्वात आमचा प्रयत्न केवळ त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा नाही, तर त्या ओलांडण्याचा आहे. भव्य मंच, लाइव्ह कॉन्सर्टचा अनुभव देणारे सादरीकरण, 100 हून अधिक संगीतकारांचा थेट सहभाग आणि संगीत क्षेत्रातील दिग्गजांचा परीक्षक व मार्गदर्शक म्हणून सहभाग अशा प्रत्येक बाबीची रचना प्रेक्षकांना याआधी कधीही न अनुभवलेला संगीताचा अनुभव देण्यासाठी करण्यात आली आहे. मात्र, या सर्व भव्यतेच्या केंद्रस्थानी ‘सा रे ग म प’ची मूळ ओळख कायम आहे. हे असे व्यासपीठ आहे जिथे प्रतिभा स्वतः बोलते, स्वप्नांना स्वर मिळतात आणि संगीतच सर्वात महत्त्वाचे असते. म्हणूनच ‘सा रे ग म प’ हे ‘हिंदुस्तान का संगीतस्थान’ होते, आहे आणि कायम राहील."
ह्या नवीन पर्वाविषयी बोलताना हिंदी झी5 च्या बिझनेस हेड आणि अँड टीव्हीच्या मुख्य चॅनल अधिकारी कावेरी दास म्हणाल्या,
"‘सा रे ग म प’ हा झीच्या नॉन-फिक्शन कंटेंटमधील मानाचा तुरा आहे आणि भारतीय मनोरंजनविश्वातील सर्वाधिक लोकप्रिय संगीत फ्रँचायझींपैकी एक आहे. अनेक दशकांपासून या कार्यक्रमाने प्रामाणिकपणा आणि असामान्य गायक प्रतिभेच्या शोधासाठी असलेल्या अढळ वचनबद्धतेच्या जोरावर आपला समृद्ध वारसा निर्माण केला आहे. प्रत्येक पर्वासोबत या कार्यक्रमाने स्वतःसाठी नवे मापदंड निश्चित केले आहेत आणि यंदाचे पर्वही त्याला अपवाद नाही. भव्य सादरीकरण, संगीतक्षेत्रातील दिग्गज मार्गदर्शक, तसेच मंचावर झळकणारी अप्रतिम प्रतिभा अशा प्रत्येक घटकाची रचना प्रेक्षकांना आतापर्यंतचा सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी करण्यात आली आहे. आज प्रेक्षक अर्थपूर्ण, दर्जेदार आणि सांस्कृतिकदृष्ट्या जवळची असलेली मनोरंजन सामग्री शोधत असताना, ‘सा रे ग म प’ने आपले वेगळेपण कायम राखले आहे. यंदाचे पर्व या कार्यक्रमाचे भारतातील सर्वाधिक लोकप्रिय आणि विश्वासार्ह संगीत रिअॅलिटी फ्रँचायझी म्हणून असलेले स्थान आणखी मजबूत करेल, याची आम्हाला खात्री आहे.
हिंदी झी 5 साठी हा अभिमानाचा क्षण आहे की, अनेक पिढ्यांतील संगीतप्रेमींना प्रेरणा देणाऱ्या या प्रतिष्ठित कार्यक्रमाचे आम्ही डिजिटल घर आहोत. ‘सा रे ग म प’ आता आपल्या सर्वांत भव्य स्वरूपात परतत असताना भारतीय संगीताच्या समृद्ध वारशाचा गौरव करणारे आणि संगीत रिअँलिटी मनोरंजनाची व्याप्ती व महत्त्वाकांक्षा नव्याने परिभाषित करणारे हे पर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही अत्यंत उत्सुक आहोत."
‘हिंदुस्तान का संगीतस्थान’ सह सा रे ग म प आपल्या समृद्ध वारशाला नव्या युगात घेऊन येत आहे. एक असे जग जिथे कलाकारांवर प्रकाशझोत टाकला जातो, संगीतकारांच्या कलेला योग्य दाद मिळते आणि संगीताच्या महानतेला साजेशी भव्यता प्राप्त होते.
‘सा रे ग म प 2026’चा प्रीमियर होत आहे 19 सप्टेंबर 2026 रोजी; दर शनिवार आणि रविवार रात्री 9:30 वाजता फक्त झी टीव्ही आणि हिंदी झी5 वर!
Comments
Post a Comment