लोकेश गुप्ते दिग्दर्शित ‘अश्वत्थ’चा टीझर प्रकाशित
स्वप्नील जोशीने नवीन वर्षातील नवीन चित्रपटाची ‘अश्वत्थ’ची केली घोषणा लोकेश गुप्ते दिग्दर्शित ‘अश्वत्थ’चा टीझर प्रकाशित मुंबई : मराठीतील आघाडीचा सुपरस्टार स्वप्नील जोशीने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्या चाहत्यांना एक गोड बातमी दिली असून त्याच्या नवीन ‘अश्वत्थ’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. लोकेश गुप्ते दिग्दर्शित ‘अश्वत्थ’ २०२२ च्या हिवाळ्यात प्रदर्शित होणार असून स्वप्नील जोशीने या चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर आज प्रकाशित करत असल्याची घोषणा केली. ‘अश्वत्थ’चा टीझर भगवत गीतेतील एका लोकप्रिय अशा श्लोकाच्या पार्श्वभूमीवर बेतलेला आहे. संकृतमधील या श्लोकाचा ढोबळ अर्थ असा –जेव्हा मनुष्य योगारूढ होतो तेव्हा तो आपला उद्धार स्वतःच करतो आणि स्वतःच आत्मबलाच्या सामर्थ्यावर ऊंची गाठतो. त्याने आपल्या आत्म्याचे अधःपतन होवू देता कामा नये. मनुष्य स्वतःच स्वतःचा बंधू असतो आणि स्वतःच स्वतःचा शत्रू असतो... चौखूर उधळलेल्या घोड्याच्या पृष्ठभूमीवर सादर होणाऱ्या या श्लोकानंतर टीझरमध्ये मराठी शब्द उधृत होतात. ते आहेत, “मन, बुद्धी, चित्त आणि अहंकारावर मात करून स्वाभिमानाने जगतो तो अश्वत्थ.” या टीझरच्या माध्...