आषाढी एकादशी निमित्त सावनी रविंद्र करतेय, पहिल्यांदाच ऑनलाइन लाइव कॉन्सर्ट
आषाढी एकादशीला वेगवेगळ्या देऊळांमध्ये आणि प्रेक्षागृहांमध्ये विठ्ठल-रखुमाईविषयीची भक्तिगीते, अभंग आणि गाणी ऐकण्याची संधी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांमधल्या रसिकांना मिळते. परंतू यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात जमावबंदी असल्याने अशा कॉन्सर्टस आणि कार्यक्रमांना रसिक मुकणार आहेत. म्हणूनच सुरेल गळ्याची गायिका सावनी रविंद्रने रसिकांसाठी एक तोडगा काढला आहे.
सावनी यंदा पहिल्यांदाच ऑनलाइन लाइव कॉन्सर्ट करत आहे. आषाढी एकादशी निमित्ताने ‘मन जाय पंढरीसी’ ह्या ऑनलाइन लाइव इन कॉन्सर्टव्दारे तुम्ही घर बसल्या सहकुटूंब विठ्ठल भक्तीने ओथंबून जाणा-या अजरामर भक्तीगीतांची अनुभूती घेऊ शकता.
आषाढी एकदाशी 1 जुलैला आहे. परंतू वर्क फॉर्म होम करणा-या देशातल्या आणि विदेशातल्या रसिकांना बुधवारी दोन तासांची कॉन्सर्ट अनुभवायला आपल्या कामामूळे कदाचित शक्य होणार नाही. म्हणूनच शनिवारी 27 जूनला ही कॉन्सर्ट अगदी नाममात्र शुल्कासह ठेवण्यात आली आहे.
सावनी रविंद्र म्हणते, “सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामूळे कुठलेच कार्यक्रम गेले दोन तीन महिने होऊ शकलेले नाही आहेत. असे असले तरीही, तंत्रज्ञानामूळे ह्या लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियाव्दारे अनेक कलाकार आपल्या चाहत्यांसोबत कनेक्टेड राहिले आहेत. पण संपूर्ण कार्यक्रम पाहण्याची संधी रसिकांना मिळाली नाही आहे. अजूनही प्रेक्षागृहात कार्यक्रम जरी आम्ही करू शकत नसलो तरीही आम्ही कलाकार एकत्र जमून ऑनलाइन कॉन्सर्ट करू शकतो. म्हणूनच, आषाढी एकादशीचे निमित्त साधून ही पहिली वहिली ऑनलाइन लाइव इन कॉन्सर्ट करायचे ठरवले.”
सावनी पूढे सांगते, “यंदा महाराष्ट्रातले अनेक भक्त वारीलाही सहभागी होऊ शकले नाही आहेत. पंढरपूरला दरवर्षी लोटणारा भक्तीचा महासागरही महाराष्ट्राला अनुभवता आला नाही आहे. कलाकार म्हणून आम्हीही हे सारं खूप मिस करतोय. त्यामूळे पांडुरंगा चरणी व्हर्च्युअली अशा पध्दतीने सेवा रूजू करण्याचा हा प्रयत्न आहे. “
Comments
Post a Comment