होम मिनिस्टर घरच्याघरी वारी विशेष
कुठे भेटलात दोघं? कसं जमलं? तुमच्या मिस्टरांना कशी हाक मारता? कुणी कुणाला आधी लग्नासाठी विचारलं?  दोघांपैकी कोण जास्त चिडतं? असे खुमासदार प्रश्न विचारत घराघरात रंगणाऱ्या होम मिनिस्टरचा कार्यक्रमाचा फॅनक्लब चांगलाच वाढला आहे. लॉकडाऊनच्या काळात भाऊजी 'होम मिनिस्टर घरच्याघरी'द्वारे तमाम वहिनींची ऑनलाईन भेट घेत आहेत. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य घरातील वहिनींपासून ते सेलिब्रिटी सौभाग्यवतींना बोलतं करणाऱ्या या होम मिनिस्टरमध्ये लवकरच अशा 'सौं' ना भेटण्याची संधी मिळणार आहे ज्या विठ्ठलाच्या नगरीमध्ये राहतात.
आषाढी एकादशी निमित्त होम मिनिस्टर घरच्याघरी कार्यक्रमात या आठवड्यात खास भाग प्रदर्शित करण्यात येणार आहेत आणि म्हणूनच बांदेकर भाऊजींनी थेट पंढरपूरची ऑनलाईन वारी केली. २२ जुन ते १ जुलै दरम्यान प्रदर्शित होणाऱ्या वारी स्पेशल एपिसोड्स मध्ये भाऊजी आळंदी, देहू, फलटण, पंढरपूर या ठिकाणी स्थायिक असलेल्या वहिनींची भेट घेणार आहेत. तेव्हा आषाढी एकादशी निमित्त खास होम मिनिस्टर घरच्याघरी वारी विशेष भाग पाहायला विसरू नका सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ६.३० वाजता फक्त झी मराठीवर!!!

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Cityflo & Salaam Bombay Foundation

June Is Here, But Humidity Isn't Going Anywhere: Functional Fashion Brands Helping Indians Stay Comfortable