आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेडने स्थापली आकाश एज्युटेक प्रा. लि. ही नवी उपकंपनी, डिजिटल एडटेक व्यवसायात करणार प्रगती
- आकाश एज्युटेक प्रा. लि. (एईपीएल) या संपूर्ण मालकीच्या उपकंपनीमध्ये आकाश डिजिटल अॅण्ड मेरिटनेशनचा समावेश, विद्यार्थ्यांना अधिक चांगली कामगिरी करता यावी आसाठी यात उच्च दर्जाचे परीक्षांची तयारी करून घेणारे लाईव्ह क्लासेस आणि लाईव्ह ट्युशन्सचा मेळ असलेले अत्याधुनिक ऑनलाइन व्यासपीठ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे
- या क्षेत्रातील ज्येष्ठ श्री. नरसिम्हा जयकुमार यांची एईपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती
1 जुलै 2020: आपल्या विविध डिजिटल सेवा एकाच आस्थापनेअंतर्गत आणण्यासाठी आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेड (एईएसएल) या परीक्षा तयारी क्षेत्रातील देशातील आघाडीच्या संस्थेने आकाश एज्युटेक प्रा. लि. (एईपीएल) या नावाने नवी उपकंपनी सुरू केली आहे. यातून एईएसएलच्या डिजिटल एडटेक व्यवसायाला वृद्धिंगत करण्याचा उद्देश आहे. आकाश एज्युटेक प्रा. लि. ही एईएसएलची 100 टक्के मालकीची उपकंपनी आहे.
या नव्या उपकंपनीत आकाश डिजिटल आणि मेरिटनेशन व्यवसायाचा समावेश असेल. एईपीएलतर्फे विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे परीक्षा तयारीचे लाईव्ह क्लासेस आणि लाईव्ह ट्युशन्स एकत्र उपलब्ध करून देण्यासाठी अत्याधुनिक ऑनलाइन व्यासपीठ देण्यात येईल तसेच सेल्फ स्टडी मटेरियलमुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगले यश मिळवता येईल. आकाश डिजिटलची सुरुवात सात वर्षांपूर्वी झाली तर 2009 मध्ये सुरू झालेल्या मेरिटनेशनचे एईएसएलने 2020 मध्ये संपादन केले.
आकाश एज्युटेक प्रा. लि.च्या स्थापनेबद्दल आकाश एज्युकेशन सर्विसेस लिमिटेड (एईएसएल)चे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आकाश चौधरी म्हणाले, "आकाश एज्युटेक प्रा. लि,च्या स्थापनेमुळे एईएसएलच्या डिजिटल व्यवसायाच्या प्रगतीला चालना मिळेल. ऑफलाइन क्षेत्रातील एक सगळ्यात मोठी संस्था असण्यासोबतच एईएसएल ही भारतातील ऑनलाइन लाईव्ह ट्युटरिंगमधीलही एक सर्वात मोठी संस्था आहे. या नव्या उपकंपनीमुळे एईएसएलला डिजिटल शिक्षणात स्पर्धात्मक स्थान मिळण्यासोबतच आपल्या 200 ऑफलाइन सेंटर्समधील 250000 विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सेवांमध्ये वृद्धी करता येणार आहे. 'विद्यार्थी प्रथम' या आमच्या संस्थापकांच्या तत्वाला अनुसरूनच या नव्या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे."
एईपीएलच्या डिजिटल व्यवसायाची धुरा सांभाळण्यासाठी कंपनीने या क्षेत्रातील ज्येष्ठ श्री. नरसिम्हा जयकुमार यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. 20 वर्षांहून अधिक काळाच्या व्यापक अनुभवासह श्री. जयकुमार आतापर्यंत Shubhloans.com चे सीबीओ होते. Shubhloans.com च्या आधी श्री. जयकुमार नाइटिंगल्स या आघाडीच्या होम हेल्थकेअर सर्विसेस कंपनीचे सीईओ होते. त्यांनी 99acres.com चे (भारतातील आघाडीचे ऑनलाइन रीअल इस्टेट पोर्टल आणि इन्फोएज इंडिया लिमिटेड या लिस्टेड कंपनीचा भाग,BSE: Naukri) सीबीओ तसेच HomeShop18 च्या ई-कॉमर्सचे सीओओ आणि गुगल, एक्स्पेडिया आणि गॅलिलिओ अशा ठिकाणी आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. सुरथकाल येथून एनआयटी म्हणून बीटेक (कम्प्युटर इंजिनीअरिंग), आयआयएम बंगळुरुमधून पीजीडीएम आणि लंडन स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीचे शिक्षण त्यांनी घेतले आहे.
एईपीएलचे सीईओ श्री. नरसिम्हा जयकुमार म्हणाले, "एईएसएलने गेल्या दशकात लक्षणीय प्रगती करत देशातील एक सगळ्यात मोठी शैक्षणिक कंपनी म्हणून ओळख निर्माण केली आहे. आकाश एज्युटेक प्रा. लि.च्या स्थापनेमुळे आम्ही नव्या क्षेत्रात आणि अत्याधुनिक शैक्षणिक तंत्रज्ञानात प्रगती करू शकू. यातून आम्ही आमचे विद्यार्थी, कर्मचारी, गुंतवणूकदार आणि इतर भागधारकांना दीर्घकालीन मूल्य देऊ शकू."
एईपीएलचे व्यवस्थापकीय संचालक श्री. पवन चौहान म्हणाले, "शिक्षण, अभ्यासक्रम आणि कोर्सेस या संदर्भात मेरिटनेशन आणि आकाश डिजिटल या दोघांमधील सर्वोत्तम आणि अत्यंत प्रभावी असे सर्व काही आकाश एज्युटेक प्रा. लि.मुळे एकाच छताखाली उपलब्ध होईल. या दोन्ही व्यासपीठांचा वारसा आणि अभ्यासपद्धती यामुळे K12च्या विद्यार्थ्यांना आणि स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करणाऱ्यांना प्रचंड लाभ होणार आहेत आणि त्यांना दर्जेदार शिक्षण ऑनलाइन उपलब्ध होईल."
आकाश डिजिटल विद्यार्थ्यांना जेईई, नीट आणि आठवी ते 12 वीच्या परीक्षा, बोर्डाच्या आणि स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करण्यासाठी त्यांच्या घरूनच सोयीनुसार दर्जेदार ऑनलाइन टेस्ट तयारी करण्याची सोय देते. या एड-टेक व्यासपीठामुळे आकाश इन्स्टिट्यूटचा वारसा आणि शिस्त लाईव्ह ऑनलाइन क्लासेस, रेकॉर्ड केलेले व्हिडीओ लेक्चर्स आणि ऑनलाइन प्रॅक्टिस टेस्टच्या माध्यमातून तुमच्या घरात उपलब्ध होतो. दर्जेदार शिक्षण हवे आहे मात्र भौगोलिक वा आर्थिक कारणांमुळे ते उपलब्ध होऊ शकत नाही अशा विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देऊन त्यांना सक्षम करण्याचे काम ही संस्था करते.
मेरिटनेशन हे भारतातील के12 विद्यार्थ्यांसाठीचे पहिले ऑनलाइन लर्निंग व्यासपीट आहे. सर्व मुख्य बोर्डांचे 2.5 कोटींहून अधिक विद्यार्थी इथे आहेत. सर्व शैक्षणिक बोर्डाच्या पहिली ते बारावीच्या विद्कार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांचा विचार इथे होते आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती बहरण्यासाठी वैयक्तिक स्वरुपाचे आणि गुंतवून ठेवणारा कंटेंट देण्याच्या दृष्टीने ते तंत्रज्ञानाच्या कौशल्यांचा वापर करतात. मेरिटनेशनच्या लाईव्ह क्लास व्यासपीठावर भारतातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांना लाईव्ह ट्युशन क्लासच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या थेट संपर्कात आणले जाते तेही विद्यार्थ्यांच्या घरात... त्यांच्या सोयीने.
ऑक्टोबर 2019 मध्ये एईएसएलने ब्लॅकस्टोन इन्क. सोबत भागीदारी करत भारतातील सर्वात मोठी डिजिटल समर्थित, बहुमाध्यम परीक्षा तयारी कंपनी सुरू केली. आपल्या 200 प्रत्यक्ष केंद्राच्या बळकट नेटवर्कला साह्यकारी असा भव्य डिजिटल व्यवसाय यातून सुरू करण्यात आला.
Comments
Post a Comment