कलर्स मराठी वाहिनीची नवी उमेद, नवी भरारी  !
लवकरच होणार मनोरंजनाचा नवा आरंभ...
मुंबई २२ जून, २०२० : गेल्या तीन महिन्यामध्ये ओढावलेल्या संकटामुळे सगळ्यांचीच आयुष्य थांबली असे म्हणायला हरकत नाही... प्रत्येकाने अनुभवली ती म्हणजे सगळीकडे पसरलेली भयाण शांतता...ज्या मुंबईला थांबण माहिती नव्हतं ती मुंबापुरी या लॉकडाऊनच्या काळात अक्षरश: स्तब्ध झाली... ज्या सेटवर लाईट्स कॅमेरा अॅक्शन असा आवाज ऐकू येत असे तिथे शुकशुकाट पसरला... कलाकारांची धावपळ, गजबजेलेले सेट्स, शूटिंगसाठी चोवीस तास राबणारी यंत्रणा थांबली. सारं एकदम शांत... पण, आता मात्र सगळ हळूहळू पूर्ववत होताना दिसू लागले आहे... लवकरच मालिकांचे शूटिंग सुरू होणार आहे... महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबासाठी ज्याने हा संकंटावर मात केली त्या रसिक प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा खजिना घेऊन नव्या उमेदीसोबत कलर्स मराठी वाहिनी पुन्हा सज्ज झाली आहे. आता आपले लाडके कलाकार आणि मालिका लवकरच तुमच्या भेटीस येणार... तेंव्हा पुन्हा एकदा आपल्यातील नाते घट्ट करूया, कलर्स मराठीसोबत नव्या रंगाने मनोरंजनाचा आरंभ करूया. आम्हाला खात्री आहे कलर्स मराठीवरील लाडक्या मालिका आणि कलाकारांवर तुम्ही तितकच प्रेम कराल...
“नवी उमेद, नवी भरारी सज्ज आहे कलर्स मराठी” या ब्रीद वाक्यासोबत नव्या रूपात, नव्या ढंगात कलर्स मराठीवाहिनी प्रेक्षकांच्या सेवेत रुजू होणार आहे. लॉकडाऊनच्या काळात कुटुंबातले सर्वच सदस्य घरी असल्याने सर्व वयोगटातील प्रेक्षकांचे मनोरंजन होईल या दृष्टीने कलर्स मराठीने वेगवेगळ्या विषयांवरील सिनेमे, रिऍलिटी शोज, आवडत्या मालिकांच्या भागांचे पुन:प्रक्षेपण केले ज्यामुळे प्रेक्षकांना पुन्हाएकदा त्यांच्या आवडत्या मालिका बघण्याची संधी मिळाली. याचसोबत प्रेक्षकांना उत्सुकता होती त्यांचे लाडके कलाकार काय करत आहेत ? त्यांचा दिनक्रम काय आहे ? त्यांचे छंद काय आहेत, ते कसे जोपासत आहेत ? हे जाणून घेण्याची. कलर्स मराठीने “लॉकडाऊन डायरी” या उपक्रमामधून प्रेक्षकांपर्यंत ही माहिती पोहचवली... या आणि यासारख्या अनेक माध्यमातून आवडत्या कलाकार आणि मालिकांविषयी माहिती वाहिनी पुरवत गेली ज्यामुळे कलाकार आणि मालिकांशी तुम्ही जोडलेले राहिलात.
लॉकडाऊनच्या शृंखला तोडून मैत्री, प्रेम, विश्वास, भक्ति यां रंगाची पुन्हाएकदा नव्याने उधळण होणार आहे...  आपल्यातील नात्याची वीण घट्ट करण्यासाठी नवा निर्धार घेऊन, नव्या उत्साहाने आपण लवकरच भेटू... तेंव्हा बघत रहा कलर्स मराठी...

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight