घराचं रूपांतर स्टुडिओमध्ये करण्यापासून आमची सुरुवात होती - डॉ. निलेश साबळे
१ जुलै पासून डॉ. निलेश साबळे झी युवा वाहिनीवर लाव रे तो व्हिडीओ हा नवा कोरा कार्यक्रम घेऊन प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे. डॉ. निलेश साबळे घरच्या घरी या मालिकेचं शूटिंग करत आहेत. घरात शूटिंग करणं ही तारेवरची कसरत आहे. त्याच्या पत्नीच्या मदतीने त्याने ही कसरत कशी पार पाडली? कॅमेराचा अँगल सेट करण्यापासून ते लाईट ऍडजस्ट करून सिन कसे शूट केले या बद्दल बोलताना डॉ. निलेश साबळे म्हणाले, "सध्या घरात मी आणि माझी पत्नी डॉ. गौरी असे आम्ही दोघेच आहोत. त्यामुळे सेटअप उभा करण्यापासून ते शूटिंग करेपर्यंत सगळं आम्हा दोघांनाच करायचं होतं. 'लाव रे तो व्हिडीओ' हा तळागाळातील अतरंगी टॅलेंट हुडकून काढणारा कार्यक्रम करायचं झी युवा च्या साथीन आम्ही ठरवलं. घराचं रूपांतर स्टुडिओमध्ये करण्यापासून आमची सुरुवात होती. प्रोफेशनल कॅमेरे, लाईट बोर्ड, वायर्स, माईक हे सगळं मागवलं. त्यातल्या प्रत्येक गोष्टीच निर्जंतुकीकरण करण्याच्या एक महत्वाचा कार्यक्रम पार पडला. सध्या डॉ. गौरी हे कॅमेरामन आणि दिग्दर्शकाच्या भूमिकेत असते. बऱ्याचदा शूटिंग करताना रात्र कशी निघून जाते हे आम्हा दोघांना कळत देखील नाही. झी युवा वाहिनी वर १ जुलै पासून सुरु बुधवार आणि गुरूवार येणाऱ्या 'लाव रे तो व्हिडीओ' मध्ये नीलेश साबळे आणि विकास जायफळे ( VJ ) दोन भूमिकांमधून ग्रामीण विरुद्ध शहरी यांच्यातील मजा पाहायला मिळेल. महाराष्ट्रातल्या हौशी कलाकारांची सादरीकरण खरोखरच वाखाणण्याजोगी आहेत. या निमित्ताने मला अनेक गोष्टींचा बारीक सारीक अभ्यास करून खूप काही शिकता आलं."
Comments
Post a Comment