अभिनेत्री विशाखा कशाळकर

 विशाखाचा अनोखा अंदाज 

मराठी सिनेइंडस्ट्रीत दररोज नवनवीन चेहरे दाखल होत आहेत. नाटकं तसेच हिंदी टीव्ही मालिकांमधील ओळखीचा एक चेहरा आता मराठी चित्रपटात पहिल्यांदाच काम करताना दिसणार आहे. हिंदी मालिका नोंकझोक’ मधून बालकलाकार म्हणून काम केलेली व पुढे मालिकानाटकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री विशाखा कशाळकर विस्टल ब्लोईंग सूट’ या चित्रपटातील आव्हानात्मक भूमिकेतून मराठी चित्रपटात पदार्पण करीत आहे.

नोंकझोक’, ‘संभव क्या’ या हिंदी तसेच ‘एक वाडा झपाटलेला’‘निवडुंग’ या मराठी मालिकांमधून विशाखाने अभिनय केला आहे. राधा’ या मराठी एकपात्री नाटकामध्ये पाच वेगवेगळ्या भूमिका सशक्तपणे पेलत आपल्या अभिनयाची चुणूक विशाखाने दाखविली होती. आता विस्टल ब्लोईंग सूट  या चित्रपटातही तिच्या अभिनयाचे वेगळे रंग दिसणार आहेत.

दृकश्राव्य माध्यमाचा सशक्त वापरभारावून टाकणारे संगीतकथेचा छाती दडपविणारा आवाकावैज्ञानिक कसोटीवर खरी उतरणारी अनेक वर्ष रिसर्च करून लिहिलेली संहिता ही या चित्रपटाची खास वैशिष्ट्ये असणार आहेत. वेगळ्या धाटणीची भूमिका करायला मिळाल्याचं समाधान व्यक्त करताना ही भूमिका हा चित्रपट प्रेक्षकांसाठी सुद्धा खूप वेगळा अनुभव असेल  असा विश्वास विशाखा व्यक्त करते.

राष्ट्रीय–आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये दमदार हजेरी लावायला सज्ज असलेला विस्टल ब्लोईंग सूट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

TIME Group & NH STUDIOZ