बाळ्या आणि सल्याची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर

मराठी चित्रपटाचा इतिहास सुवर्ण अक्षरात करणारा चित्रपट म्हणजे सैराट. या चित्रपटातील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. या चित्रपटात पारश्याची पुरेपूर साथ देणारे त्याचे दोन मित्र बाळ्या आणि सल्या यांच्या लक्षवेधी भूमिका प्रेक्षक अजूनही विसरले नाही आहेत. हीच जोडी आता पुन्हा एकदा झी टॉकीज प्रस्तुत टॉकीज ओरिजनल 'गस्त' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पुन्हा एकदा सल्या म्हणजे अरबाज आणि बाळ्या म्हणजे तानाजी आपल्या मैत्रीची जादू दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
गस्त या चित्रपटात तानाजी प्रमुख भूमिका निभावत असून अरबाज त्याच्या मित्राच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येईल. चोरी होत असल्यामुळे गस्त घातलेल्या एका गावात अमर आणि त्याची प्रेयसी सुजाता यांची प्रेमकथा पुढे नेण्यासाठी अमरचे मित्र त्याची मदत करत असतात. अरबाज आणि तानाजी पुन्हा एकदा एकत्र येणार म्हणजे मनोरंजनाचा धमाका असणार यात शंकाच नाही.
पुन्हा एकदा तानाजी सोबत काम करण्याचा अनुभव सांगताना अरबाज म्हणाला, "पुन्हा एकदा तानाजी सोबत काम करताना आम्हाला जुने दिवस आठवत आहेत. धमाल-मजा-मस्ती मध्ये गस्त या चित्रपटाचं शूटिंग केव्हा पूर्ण झालं हे आम्हाला कळलंच नाही. मी या चित्रपटात अमरचा मित्र चिन्याची भूमिका साकारतोय. अमर आणि चिन्या यांची जोडी बाळ्या आणि सल्या इतकीच प्रेक्षकांना देखील आवडेल याची मला खात्री आहे."

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight