जगन्‍नाथ निवंगुणे यांनी मित्र व कुटुंबासोबत साजरा केला वाढदिवस

एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका 'डॉ. बी. आर. आम्‍बेडकर'मध्‍ये रामजी मालोजी सकपाळची भूमिका साकारणारे जगन्‍नाथ निवंगुणे यांनी पुण्‍यामध्‍ये त्‍यांचे कुटुंब व मित्रांसोबत त्‍यांचा वाढदिवस साजरा केला. या साजरीकरणाबात सविस्‍तरपणे सांगताना जगन्‍नाथ म्‍हणाले, ''प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर वाढदिवस हा कुटुंबासोबत वेळ व्‍यतित करण्‍याचा उत्तम क्षण आहे. म्‍हणून मी पुण्‍याला जाऊन जवळपास दोन महिन्‍यांनंतर माझ्या प्रियजनांसोबत संपूर्ण दिवस व्‍यतित केला. कुटुंबाने मला अनेक सरप्राईजेज देत हा दिवस साजरा केला. संपूर्ण दिवस छान व्यतित केला, जेथे आम्‍ही स्‍वादिष्‍ट घरगुती पदार्थांचा आस्‍वाद घेतला, गाणी गायलो व नाचलो. मालिका 'एक महानायक डॉ. बी. आर. आम्‍बेडकर'चे कलाकार व टीम व्हिडिओ कॉल्‍स व मेसेजेसच्‍या माध्‍यमातून व्‍हर्च्‍युअली कनेक्‍ट झाले. मला माझ्या सोशल मीडिया पेजेसवर चाहत्‍यांकडून अनेक कॉल्स व मेसेजेस् मिळाले. मला सांगावेसे वाटते की, मला मिळत असलेले प्रेम व कौतुक मालिकेमधील भीमरावांचे वडिल रामजी या भूमिकेमुळे मिळाले आहे आणि हे अत्‍यंत अविश्‍वसनीय वाटते. मालिका व रामजी यांची भूमिका माझ्या करिअरमधील मैलाचा दगड आहेत." सुरू झाल्‍यापासूनच मालिकेने नवीन बेंचमार्क स्‍थापित केला आहे आणि पटकथा व पात्रांसाठी कौतुकाची थाप मिळवली आहे. 'एक महानायक डॉ. बी. आर. आम्‍बेडकर' ही हिंदी जीईसीमध्‍ये बाबासाहेबांच्‍या जीवनावर आधारित आतापर्यंत कधीच सांगण्‍यात न आलेली कथा आहे. स्‍मृती सुशीलकुमार शिंदे यांच्‍या सोबो फिल्‍म्‍सची निर्मिती असलेली ही मालिका बाबासाहेब आणि त्‍यांचा वयाच्‍या पाचव्‍या वर्षांपासून ते भारतीय संविधानाचे शिल्‍पकार बनण्‍यापर्यंतचा प्रवास सांगणारी प्रेरक कथा आहे.

पहा जगन्‍नाथ शिवंगुणे यांना रामजी मालोजी सकपाळच्‍या भूमिकेत 'एक महानायक डॉ. बी. आर. आम्‍बेडकर'मध्‍ये दर सोमवार ते शुक्रवार रात्री ८.३० वाजता फक्‍त एण्‍ड टीव्‍हीवर

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

TIME Group & NH STUDIOZ