संजय जाधव ह्यांच्या 'फिल्मॅजिक' फिल्म स्कुलच्या उद्घाटनाला लोटली अवघी सिनेसृष्टी

लॉकडाऊनमुळे गेले एक वर्ष कार्यक्रम आणि सोहळे बंद झाल्याने मराठी सिनेसृष्टीची झळाळीच गेल्यासारखे झाले होते. पण अकरा महिन्यांनंतर सिनेसृष्टीची ही झळाळी परतलीय. संजय जाधव ह्यांच्या फिल्मॅजिक ह्या फिल्म स्कुलच्या उद्घाटनाला सिनेसृष्टीतल्या मोठ-मोठ्या सुपरस्टार्सनी उपस्थिती लावली.

सई ताम्हणकर, स्वप्निल जोशी, तेजस्विनी पंडित, अंकुश चौधरी, मानसी साळवी, उमेश कामत, सोनाली खरे, सिध्दार्थ जाधव, श्रेया बुगडे, संजय नार्वेकर ह्या सुपरस्टार्ससोबतच नृत्यदिग्दर्शक उमेश जाधव, संगीतकार अमितराज आणि पंकज पडघन, फिल्ममेकर विजु माने, अभिजीत पानसे, केदार शिंदे अशा सेलिब्रिटींची मांदियाळी फिल्मॅजिक स्कुलच्या उद्घाटनाला दिसून आली.

संजय जाधव ह्यांचे गुरू आणि ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर ह्यांच्या हस्ते फिल्मॅजिक फिल्म स्कुलचे उद्घाटन झाले. ह्यावेळी संजय जाधव ह्यांना शुभेच्छा देताना सचिन पिळगावकर म्हणाले, संजयची वाटचाल मी खूप अगोदरपासून पाहत आलोय. त्याने अतिशय मेहनतीनं आपलं करीयर घडवलंय. त्याचं नेतृत्व फिल्मॅजिक स्कुलच्या विद्यर्थ्यांचं करीयर घडवायला नक्कीच उपयोगी पडेल.

फिल्मॅजिकच्या स्थापनेविषयी संजय जाधव म्हणाले,सिनेमाच्या मुख्य धारेत समाविष्ट होताना फिल्मसेटवर वापरली जाणारी भाषा, वावरायची पध्दत अशा अनेक गोष्टी नवोदिताला शिकाव्या लागतात. सिनेसृष्टीत पाऊल ठेवताना इथला माहौल पाहून अनेकांना भांबावायला होतं. मी स्वानुभवाने शिकत गेलो. पण नव्या पिढीला आत्मविश्वासाने आपली वाटचाल करता यावी, म्हणुन माझ्या आणि सिनेसृष्टीतल्या नावाजलेल्या तंत्रज्ञांच्या अनुभवाची शिदोरी आम्ही फिल्मॅजिकमधून विद्यार्थ्यांना देऊ इच्छितो.”  

फिल्मॅजिक फिल्म स्कुलचे वैशिष्ठ्य आहे की, इथे प्रवेशासाठी कोणत्याही वयाची, शैक्षणिक पात्रतेची किंवा भाषेची बंधन नाहीत.

अभिनेत्री सई ताम्हणकर म्हणाली, महाराष्ट्रीयन फिल्ममेकरने अशा पध्दतीने एक फिल्म स्कुल सुरू करण्याचा विचार करावा ह्याचं मला कौतुक वाटतंय. आणि आता महाराष्ट्रातल्या कानाकोप-यातल्या विद्यार्थ्यांना संजयदादाच्या फिल्ममेकिंगच्या अनुभवाचा लाभ होईल, ह्याचा मला अभिमान आहे.

अभिनेता अंकुश चौधरी म्हणाला, संजय जाधवसोबत माझं नातं आभाळमाया मालिकेपासूनचं आहे. तेव्हापासून आजपर्यंत मी त्याच्याकडून शिकतोच आहे. प्रत्येक मालिके, फिल्मगणिक मी खूप शिकत गेलो. जसं मला खूप शिकता आलंती संधी फिल्मॅजिकमूळे इथल्या विद्यार्थ्यांना मिळेल, असं मला वाटतं.

अभिनेत्री तेजस्विनी पंडित म्हणाली, जेव्हा आम्ही ह्या क्षेत्रात आलो, तेव्हा आम्हांला सिनेतंत्राविषयी माहिती करून देणा-या अशा कोणत्या इन्स्टिट्यूट नव्हत्या. आजकालच्या नवोदितांना फिल्मॅजिक सारख्या फिल्म स्कुल मिळतायत. तर ह्या संधीचा त्यांनी पूरेपूर फायदा घ्यावा असं मला वाटतं. आम्हांला जर संजयदादासारखे मेन्टॉर करीयरच्या सुरूवातीला मिळाले असते, तर आजपेक्षा निम्म्या कालावधीतच करीयरमध्ये यश संपादन करता आले असते.  

अभिनेता स्वप्निल जोशी म्हणाला, संजय जितका चांगला, निर्माता,दिग्दर्शक, अभिनेता आहे तितकाच चांगला शिक्षक आहे. मी त्याच्यासोबत खूप जास्त काम केलंय. त्यामुळे मी नक्कीच सांगू शकतो, की, त्याची शिकवण्याची कला फार कमाल आहे. तो तुमच्या मनात शिरून तुमच्याकडून परफॉर्मन्स काढून घेतो. त्यामूळे संजयने ही फिल्म स्कुल सुरू करणं खूप गरजेचं होतं. आणि त्याच्या फिल्म स्कुलला माझ्या शुभेच्छा.

अभिनेत्री सोनाली खरे म्हणाली,ज्या मुलांना फिल्मविषयी जिज्ञासा आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी फिल्मॅजिक उत्तम फिल्म स्कुल असणार आहे. आपण देश-विदेशातल्या फिल्म इंन्स्टिट्युटची नावं ऐकतो. पण आपल्या मराठी मुलांसाठी कोणाताही न्युनगंड न बाळगता आत्मविश्वास देणारी ही इन्स्टिट्युट असेल, असं मला वाटतं.

अभिनेता उमेश कामत म्हणाला, मला वाटतं की, योग्य मार्गदर्शन योग्य व्यक्तीकडून मिळणं खूप गरजेचं आहे. फिल्मटेक्निक शिकवण्यासाठी शिबीरं खूप होतात. पण संजयदादासारख्या सिनेमातल्या ऑलराउंडरकडून फिल्मविषयीच्या वेगवेगळ्या माध्यमातलं शिक्षण विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. त्यामूळे त्याच्या फिल्म स्कुलला माझ्या खूप शुभेच्छा

अभिनेत्री श्रेया बुगडे म्हणाली, “ह्या फिल्म स्कुलमध्ये जी मुलं शिकायला येणार आहेत, त्यांचा मला खरं तर हेवा वाटतो. लेखन, संकलन, छायाचित्रण, अभिनय, संगीत, नृत्य, दिग्दर्शन ह्या सर्व चित्रपटनिर्मितीच्या अंगांचा इत्थ्यंभूत अभ्यास संजयदादाचा आहे. त्यामूळे त्याने फिल्मस्कुल सुरू केल्याचा मला आनंद आहे. आता ह्या इन्स्टिट्युटमधून चांगले तंत्रज्ञ सिनेसृष्टीला मिळतील. असा मला विश्वास आहे. 

अभिनेता सिध्दार्थ जाधव म्हणाला, फिल्मॅजिकच्या निमीत्ताने संजयदादाचा दृष्टिकोण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल. ह्याचा मला आनंद आहे. संजयदादाकडे सिनेसृष्टीतल्या कामाचा खूप अनुभव आहे. नव्या कलाकाराला संजयदादा नेहमीच व्यासपीठ मिळवून देतो. त्यामुळे फिल्ममॅजिक ही फिल्म स्कुल सुरू झाल्याचा खूप आनंद आहे

अभिनेत्री मानसी साळवी म्हणाली, मी संजयसोबत आईशप्पथ फिल्म केली होती. तेव्हापासून मला त्याच्यातल्या गुरूचा अनुभव आलेला आहे. सिनेमासृष्टीत पाऊल ठेवताना त्याविषयीचं तंत्र माहिती असणे गरजेचे आहे. आणि मला असं वाटतं, ह्या फिल्म स्कुलचा युवापिढीला चांगलाच फायदा होईलं.

Visuals of the event - 

https://drive.google.com/drive/folders/1_p6hXUeNnjMJ_TV10M9hQ7Phz8OzAr30

Sanjay Jadhav's videobyte - 

https://drive.google.com/file/d/1tnAt21H8KPxga25OM6nbRXYEkob76Fx8/view

Celebrity Bytes -

https://drive.google.com/drive/folders/1W4-eT4MYpyy7Qi1HWTZTxeciMyf7IpQ6

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

TIME Group & NH STUDIOZ