'यमराज'ने मढ-मार्वे रोडवर वाहतूकीच्‍या नियमांचे उल्‍लंघन करणा-यांना दिली चेतावणी

दि रिसॉर्टने मुंबईच्‍या रस्‍त्‍यांवर वाहतूक सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्‍यासाठी राबवली अद्वितीय मोहिम

 मुंबई, १७ फेब्रुवारी २०२१: बुधवारी मुंबईच्‍या मढ-मार्वे रोडवरील प्रवाशांना एक सरप्राईज मिळाले, जेथे त्‍यांना साक्षात मृत्‍यूदेवता – यमराजचे दर्शन घडले.


मुंबईतील दि रिसॉर्टने एक अद्वितीय उपक्रम राबवला, जेथे एका स्‍वयंसेवकाने यमराजाप्रमाणे पोशाख परिधान केला आणि वाहतूकीच्‍या नियमांचे उल्‍लंघन करणा-या ड्रायव्‍हर्स व मोटरचालकांसोबत चर्चा केली. मोहिम अशी होती की, ड्रायव्‍हर किंवा राइडर वाहतूकीच्‍या नियमांचे उल्‍लंघन करत असेल तर मृत्‍यूदेवता यमराजने स्‍वत:हून त्‍यांना थांबवावे. यावेळी यमराजने अशा मोटरचालकांना थांबवण्‍यासोबत वाहतूकीच्‍या नियमांचे पालन करण्‍याचे आवाहन देखील केले. त्‍याला लोकांकडून आश्‍वासन देखील मिळाले की, ते वाहतूकीच्‍या नियमांचे उल्‍लंघन करणार नाहीत आणि त्‍यांच्‍या सुरक्षिततेची काळजी घेतील.

दि रिसॉर्टने रस्‍ता सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्‍यासाठी आणि लोकांना नियमांचे पालन न केल्‍यास होणा-या अनेक अपघातांबाबत माहिती देण्‍यासाठी सर्जनशील पद्धतीने हा अद्वितीय उपक्रम राबवला. त्‍वरित लक्ष वेधून ही विचारशील मोहिम ड्रायव्‍हर्सना वाहतूकीच्‍या नियमांचे उल्‍लंघन करण्‍यापूर्वी विचार करण्‍यास भाग पाडण्‍यामध्‍ये यशस्वी ठरली. रस्‍ता सुरक्षा ही मुंबईच्‍या वाहतूक पोलिसांसाठी मोठी समस्‍या राहिली आहे. प्रत्‍येक वेळी पोलिसांनी रस्‍ता सुरक्षेबाबबत मोहिमा राबवल्‍या आहेत, तरीदेखील लोक वाहतूकीचे नियम मोडत आहेत.

लोकांना थांबवल्‍यानंतर यमराजने त्‍यांना दुचाकी चालकांसाठी हेलमेट्सचा वापर, चार-चाकी ड्रायव्‍हर्ससाठी सीट-बेल्‍ट्सचा वापर, वाहनांदरम्‍यान सुरक्षित अंतर, इंडिकेटर्सचा वापर, ड्रायव्हिंग करताना किंवा वाहन चालवताना मोबाइल फोनचा वापर न करणे आणि अति वेगाने वाहन चालवण्‍याचे टाळणे अशा विविध वाहतूकीच्‍या नियमांबाबत जागरूक करण्‍याची खात्री देखील घेतली.

यमराज उभा राहिलेल्‍या जागेपासून काही अंतरावर घोषवाक्‍य लिहिलेले फलक देखील होते, जसे 'यमराज को देख डर गये क्‍या तो आपका वक्‍त अभी खत्‍म नही हुआ','गाडी धीरे चलाइये' आणि 'वेअर हेलमेट,वेअर सील्‍ट बेल्‍ट' ते 'घर पर कोई आपका इंतजार कर रहा है','ड्राइव्‍ह स्‍लो'.

या उपक्रमाबाबत बोलताना दि रिसॉर्टचे सत्‍यजित कोतवाल म्‍हणाले,''सामान्‍य मानसिकता अशी आहे की, लोकांना एखाद्या गोष्‍टीची भिती वाटत असेल तर ते ती गोष्‍ट करत नाहीत. पोलिस लोकांना चेतावणी देण्‍याचा सर्वतोपरी प्रयत्‍न करतात आणि वाहतूकीच्‍या नियमांचे पालन करण्‍याबाबत जागरूक करतात. पण आम्‍हाला वाटले की, यमराजचा चेहरा त्‍यांना पुढील वेळेस रस्‍त्‍यावर वाहतूकीच्‍या नियमांचे उल्‍लंघन करण्‍यापासून प्रतिबंध करेल. मला वाटते की, आम्‍ही या मोहिमेच्‍या माध्‍यमातून लोकांना जागरूक करण्‍यामध्‍ये यशस्‍वी ठरलो.''

Comments

Popular posts from this blog

Mukka Proteins Limited

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार