किचन कल्लाकारच्या मंचावर टेलिव्हिजनवरील लोकप्रिय सासूबाई

झी मराठीवर नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या किचन कल्लाकार या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळतेय. किचन आणि कलाकार हे समीकरण जुळलेलं नसताना पाककलेच्या कसोटीला उतरलेल्या कलाकारांची उडणारी तारांबळ बघताना प्रेक्षकांना खूप मजा येतेय. प्रेक्षक आपल्या लाडक्या कलाकारांना या कार्यक्रमात किचनमध्ये धावपळ करताना पाहतात पण या आठवड्यात टेलिव्हिजनवर गाजलेल्या सासूबाई या मंचावर सज्ज होणार आहेत. अभिनेत्री उषा नाडकर्णी, सविता मालपेकर आणि देवमाणूस मधील सरू आजी म्हणजेच अभिनेत्री रुक्मिणी सुतार या किचन कल्लाकारच्या किचनमध्ये हजेरी लावणार आहेत.
या अभिनेत्रींनी छोटा पडदा गाजवला आहे आणि आता त्या किचनमध्ये काय कल्ला करणार हे प्रेक्षकांना पाहताना नक्कीच मजा येईल. त्यात या सगळ्या सासू एकाच मंचावर असताना किचनमध्ये दंगा तर होणारच त्यामुळे कुठली सासू भारी ठरतेय हे पाहण्यासाठी बघायला विसरू नका मस्त मजेदार किचन कल्लाकार बुधवार आणि गुरुवार रात्री ९.३० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर  

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO