मीडियम स्पाइसी
"मीडियम स्पाइसी" चा ट्रेलर सोशल मीडियावर सुपरहिट
लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत, विधि कासलीवाल निर्मित आणि मोहित टाकळकर दिग्दर्शित "मीडियम स्पाइसी" ची लज्जतदार झलक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. एक वेगळा विषय आणि फ्रेश स्टारकास्ट यामुळे अवघ्या काही दिवसातच ट्रेलरने १ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूव्जचा टप्पा गाठला आहे व प्रेक्षक आता या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत. नोकरी की कुटुंब? करियर की रिलेशनशिप? प्रेमसंबंध की लग्न? गौरी की प्राजक्ता? अशा अजूनही काही प्रश्नांमध्ये गुरफटलेल्या एका शेफच्या आयुष्यावर हा चित्रपट बेतलेला आहे असे ट्रेलर मधून स्पष्ट होत आहे. ललित प्रभाकर, सई ताम्हणकर, पर्ण पेठे, नेहा जोशी, पुष्कराज चिरपुटकर, इप्शिता या तरुण कलाकारांसह ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी, अरुंधती नाग आणि अभिनेते रवींद्र मंकणी यांच्या सहज सुंदर अभिनयाने सजलेल्या "मीडियम स्पाइसी"ने प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबद्दल उत्कंठा वाढवली आहे. युवा नाटककार मोहित टाकळकर "मीडियम स्पाइसी" या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत असून प्रत्येकवेळी एक वेगळा विषय घेऊन चित्रपट निर्मिती करणाऱ्या निर्मात्या विधि कासलीवाल यांची भक्कम साथ त्यांना लाभली आहे.
लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत, विधि कासलीवाल निर्मित, इरावती कर्णिक लिखित आणि मोहित टाकळकर दिग्दर्शित "मीडियम स्पाइसी" ची लज्जतदार डिश १७ जून २०२२ पासून संपूर्ण महाराष्ट्रात रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
"मीडियम स्पाइसी" ट्रेलर पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा :
Comments
Post a Comment