पुढील ५ वर्षांसाठी सीएजीआर २२% दराने वाढवण्याचे गोदरेज इंटेरिओज किचेनचे उद्दिष्ट
मुंबई, ३० मे २०२२: गोदरेज समुहाची प्रमुख कंपनी असलेल्या गोदरेज अँड बॉयसने त्यांची व्यवसाय शाखा घरगुती आणि संस्थात्मक विभागांमध्ये भारतातील आघाडीचा फर्निचर सोल्यूशन्स ब्रँड असलेल्या गोदरेज इंटेरिओने आपल्या स्वयंपाकघर श्रेणीत पुढील ५ वर्षांसाठी सीएजीआर २२% दराने वाढवण्याची योजना असल्याची घोषणा केली आहे. महामारीपासून टियर २ आणि ३ शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याबरोबरच संपूर्ण भारतातील मॉड्यूलर किचन व्यवसायामध्ये प्रचंड वाढ होत आहे. केवळ गेल्या वर्षभरात त्यांनी पूर्वेकडील भागात तब्बल ३५% वाढ नोंदवली आहे. मागणी लक्षात घेता गोदरेज इंटेरिओ महाराष्ट्रातील खालापूर येथील नवीन उत्पादन सुविधेद्वारे वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी सज्ज आहे. या केंद्रातून दररोज २५० स्वयंपाकघरांचे उत्पादन होऊ शकते.
गोदरेज इंटेरिओचा खालापूर प्रकल्प 'स्टील शेफ' चे उत्पादन करतो. मध्यमवर्गाच्या मागण्या पुऱ्या करणारे हे एक प्रकारचे मॉड्युलर स्टील किचन आहे. या स्वयंपाकघरांमध्ये स्टीलची ताकद आहे आणि ते लाकडाच्या सौंदर्यशास्त्राशी जोडले जाऊ शकतात आणि ग्राहकांच्या पसंतीनुसार अॅक्सेसरीज आणि हार्डवेअरच्या विस्तृत श्रेणीशी सुसंगत आहेत. जोडीला हा प्रकल्प निओ स्मार्ट चिमणी सारख्या भारतातील आधुनिक मॉड्यूलर स्वयंपाकघरांसाठी अपरिहार्य गोष्टींचे उत्पादन देखील करतो.
गोदरेज इंटेरिओचे वरिष्ठ उपाध्यक्ष (B2C) सुबोध मेहता म्हणाले, "गेल्या दोन वर्षांत, स्वयंपाकघर केवळ अन्न तयार करण्यासाठीच नव्हे तर स्वयंपाकासंबंधी प्रयोगांसाठी देखील केंद्रस्थानी बनले आहे. त्यामुळे, स्वयंपाकघरात घालवलेल्या वेळेत लक्षणीय वाढ झाली आहे. जोडीला, मोठी युनिट्स, तंत्रज्ञान प्रणित अॅक्सेसरीज आणि हार्डवेअरसाठीची गरज वाढत असल्याचेही आम्ही पाहिले. आज, ग्राहक कार्यक्षमतेने उच्च आणि वापरण्यास सोपा असलेल्या किचन सोल्यूशन्सच्या शोधात आहेत. त्याचप्रमाणे ग्राहक स्टील आणि मरीन प्लाय सारख्या टिकाऊ, स्वच्छ आणि देखभालीसाठी सोप्या साहित्याच्या शोधात असतो. तसेच आजकाल २७% बिल्डर्स आता नवीन अपार्टमेंटमध्ये पूर्ण कार्यक्षम स्वयंपाकघर सादर करत असल्याचा एक नवीन प्रवाह आम्हाला दिसत आहे. खराब वायुवीजन, उष्णता आणि भारतीय खाद्यपदार्थांमध्ये होत असलेल्या तीव्र स्वादांचा वापर यामुळे स्वयंपाक करणे कधीकधी वेळखाऊ आणि कठीण अनुभव बनतो. गोदरेज इंटेरिओचे स्वयंपाकघर या सर्वसामान्य तक्रारी दूर करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आणि तुमच्या स्वयंपाकघरातील सौंदर्य देखील वाढवते."
ते पुढे म्हणाले, "आम्ही ग्राहकांना खालापूरमधील आमच्या इन-हाऊस डिझाइन आणि उत्पादन सुविधा केंद्रातून डिझाइन, अॅक्सेसरीज, साहित्य आणि फिनिशेसच्या विस्तृत श्रेणीतून निवडण्याची ऑफर देतो. आमची सर्व उत्पादने १५ वर्षांच्या वॉरंटीसह येतात आणि स्वयंपाक करणे आनंददायी बनवत सहज शैलीत येतात. मॉड्यूलर किचन व्यवसायात झपाट्याने वाढ होण्याची अपेक्षा आहे आणि या श्रेणीत आमची आर्थिक वर्ष २२-२३ मध्ये २५% च्या सीएजीआरसह आक्रमक वाढीची महत्त्वाकांक्षा आहे."
Comments
Post a Comment