जीप मेरिडियन

 जीप इंडियाने दाखल केली बहुप्रतिक्षित नवीन जीप मेरिडियन, किंमत ...लाख रुपये...

- या श्रेणीतील अनेक सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्ये उपलब्ध असलेली ही एसयुव्ही प्रीमियम डी एसयुव्ही  श्रेणीमध्ये 4x4क्षमतेसह, सुधारणा आणि  आकर्षकता यांच्या अनोख्या मिलाफाचे दर्शन घडवते.

-अधिकृत बुकिंग सुरू होण्यापूर्वी जीप मेरिडियनला ६७,००० पेक्षा अधिक ग्राहकांनी चौकशी केली असून, ५०००पेक्षा जास्त ग्राहकांनी नोंदणी करण्यात रस दाखवला आहे. 

-जीप मेरिडियन लिमिटेडआणि लिमिटेड (ओ) अशा दोन प्रकारात विविध पर्यायांसह उपलब्ध आहे.  

-जीप डीलरशिप्स आणि जीप इंडिया वेबसाइटवर जीप मेरिडियनसाठी नोंदणी सुरू झाली आहे.  जूनमध्ये ग्राहकांना वितरण सुरू होईल.

मुंबई, २३ मे २०२२ ः जीपची बहुप्रतीक्षित नवीन जीप मेरिडियन ही एसयुव्ही ......लाख रुपयांच्या विशेष प्रारंभिक किमतीत दाखल करण्यात आली आहे. एसयूव्ही सेगमेंटचा आणखी विस्तार आणण्यासाठी ही नवी एसयुव्ही डिझाइन करण्यात आली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानायुक्त जागतिक दर्जाच्या अनेक सुविधा यात असून, ती भारतीय  ग्राहकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन, डिझाइन करण्यात आली असून पारंपरिक एसयुव्हीचा अनुभव देणारी आहे. 

जीप मेरिडियनची रचना प्रिमियम एसयूव्ही सेगमेंटची व्याख्या बदलणारया जीप ग्रँड चेरोकीपासून प्रेरणा घेऊन करण्यात आली आहे.  सर्वाधिक वेग आणि सर्वोत्तम पॉवर-टू-वेट गुणोत्तरासह विविध वैशिष्ट्ये यासाठी ही एसयुव्ही ओळखली जाते. 

अत्यंत सक्षम आणि वेगवान अशी ही एसयुव्ही अवघ्या १०.८ सेकंदात ०-१०० किमी/तास वेगाने जाऊ शकते आणि ताशी १९८किमी इतका वेग गाठू शकते.

जीप मेरिडियन दाखल करताना, जीप ब्रँड इंडियाचे प्रमुख निपुण जे. महाजन म्हणाले, " जीप ब्रँडचा विश्वास आहे की भारतीय ग्राहकांनी अधिक अत्याधुनिक जीप मेरिडियनचा अनुभव घेण्याची वेळ आली आहे. या सेगमेंटचा अधिक विस्तार करण्यासाठी आणि शक्तिशाली, अत्याधुनिक, आरामदायी एसयुव्हीच्या शोधात असणाऱ्या ग्राहकांसाठी उत्तम पर्याय देण्यासाठी आम्ही या एसयुव्हीची किंमत अगदी किफायतशीर ठेवली आहे. या किंमतीवरून आमचा हा उद्देश्य स्पष्ट होतो.

जीप मेरिडियन साहस आणि अत्याधुनिकतेचे अनोखे मिश्रण आहे. तिच्या वैशिष्ट्यांचे माध्यमासह सर्वच स्तरावर खूप कौतुक झाले आहे. आता ग्राहकही जीप मेरिडियनचा अनुभव घेऊ शकतात. विविध स्तरातील ग्राहकांना आकर्षित करणे आणि जीप लाइफचा अनुभव घेऊ पाहणाऱ्या ग्राहकांसाठी एक उत्कृष्ट पर्याय देणे हे जीप मेरिडियनचे उद्दिष्ट आहे.

नवीन जीप मेरिडियनला मिळत असलेल्या प्रतिसादाने जीप इंडियाला आनंद वाटत आहे. जूनच्या सुरुवातीला ‘मेड-इन-इंडिया आणि मेड-फॉर-इंडिया’अशा जीप मेरिडियनची डिलिव्हरी सुरू करण्याचा कंपनीचा विचार  आहे.

अभियांत्रिकी/ इंजिनीअरिंग आणि आर्किटेक्चर ः

या सेगमेंटसाठी प्रथमच देण्यात आलेला स्वतंत्र फ्रंट आणि रियर सस्पेंशन सेटअप या नवीन जीप मेरिडियनमध्ये आहे.   नवीन जीप मेरिडियन फ्रिक्वेन्सी सिलेक्टिव्ह डॅम्पिंग आणि हायड्रॉलिक रिबाउंड स्टॉपरने सुसज्ज आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या रस्त्यांवर आरामदायी प्रवासाचा अनुभव येतो.  ड्रायव्हिंगही आनंददायी होते. 

२.२ एनएम इतका सर्वात कमी पार्किंग टॉर्क आणि ४.३ एनएम डायनॅमिक टॉर्कमुळे स्टीयरिंगवर उत्तम नियंत्रण ठेवणे सुलभ होते. ५.७ मीटर इतका कमी रेडियस असल्याने शहरातही ड्रायव्हिंग करणे अगदी आरामदायी होते.  

जीपचा अस्सल डीएनए कायम ठेवणारी अनेक वैशिष्ट्ये यात आहेत. त्यामुळे या एसयुव्हीची कार्यक्षमता  वाढते.

ट्रिम्स आणि पॉवरट्रेन ः

प्रवाशांना आरामदायी आणि अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी या सेगमेंटच्या सर्वोत्तम वैशिष्ट्यांचा समावेश असलेली जीप मेरिडियन लिमिटेडआणि लिमिटेड (ओ) अशा दोन प्रकारामध्ये उपलब्ध आहे. लिमिटेड आणि लिमिटेड (ओ) दोन्ही ४x२ फ्रंट-व्हील ड्राइव्हसह उपलब्ध असून सहा-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि नऊ-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचाही पर्याय आहे. लिमिटेड (ओ) प्रकारात ४x४ ऑल-व्हील ड्राइव्हसह नऊ-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनदेखील उपलब्ध आहे.

जीप मेरिडियनमध्ये  २.०-लिटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन आहे. ३७५० आरपीएमवर १२५ किलोवॅट (१७०एचपी) आणि  १७५०-२, ५०० आरपीएम दरम्यान उपलब्ध जास्तीत जास्त ३५० एनएम टॉर्क निर्माण करते.

डी-सेगमेंटमधील सर्वात इंधन-कार्यक्षम एसयूव्हींपैकी एक   जीप मेरिडियन असून प्रति लिटर १६.२किमी (एआरएआय प्रमाणित) अॅव्हरेज देते.

डिझाइन आणि आरामदायीपणा

कारमधील प्रवाशांना पूर्ण आराम मिळावा यासाठी, यातील  पहिल्या आणि दुसऱ्या रांगेत ९४०मिमी आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या रांगेत ७८० मिमी जागा देण्यात आली आहे. त्यामुळे जीप मेरिडियन हे या सेगमेंटमधील सर्वात प्रशस्त वाहन ठरते. 

जीप मेरिडियन या एसयूव्हीमध्ये तीन आसन रांगा आहेत.   यात पाच लोकबसल्यानंतर ४८१ लिटर बूट स्पेस राहते तर सर्व सात जागा व्यापल्यावर १७० लिटर बूट स्पेस उरते. दुसऱ्या रांगेतील वन-टच फोल्ड-अँड-टंबल सीट्समुळे  आणि ८०डिग्री दरवाजा उघडण्याच्या तरतुदींमुळे प्रवाशांना सहजतेने आत-बाहेर करण्यास मदत होते. 

या कारमध्ये सर्वोत्तम कूलिंगचा अनुभव येतो. या सेगमेंटमधील अन्य स्पर्धकांपेक्षा यात ३० टक्क्यांपर्यंत अधिक वेगाने कूलिंग होते. मल्टी-झोन क्लायमेट कंट्रोल सिस्टम,  थर्ड-रो एसी इव्हपोरेटर युनिट आणि थर्मो-अकॉस्टिक केबिन इन्सुलेशनमुळे प्रवास सुखाचा होतो.

जीप मेरिडियनमध्ये एम्पेरॅडॉर ब्राउन लेदर सीट्स, कंट्रोल्ससह थर्ड-रो कूलिंग, ऑटोमॅटिक हेडलॅम्प, डायमंड कट ड्युअल-टोन १८-इंच अलॉय व्हील आणि इतर अनेक आकर्षक वैशिष्ट्ये आहेत. जीप मेरिडियन, कनेक्टिव्हिटी आणि आघाडीची इन्फोटेनमेंट वैशिष्ट्ये देणारया (यू कनेक्ट ५) UConnect5 ने सुसज्ज आहे.   

आता जीप इंडियाच्या वेबसाइटवर (jeep india.com) आणि भारतभरातील जीप डीलरशिप्समध्ये ५०,००० रुपयांच्या अल्प डाउन पेमेंटसह नवीन जीप मेरिडियनचे बुकिंगसाठी सुरू असून, जूनमध्ये ग्राहकांना तिचे वितरण सुरू होईल.

Comments

Popular posts from this blog

Mukka Proteins Limited

भोईवाडा,परळ येथे श्री स्वामी समर्थ यांच्या पादुका पालखी सोहळा उत्साहात संपन्न

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार