गोदरेज अप्लायन्सेसच्या एअर कूलर्सच्या विक्रीत तेजी

 गोदरेज अप्लायन्सेसच्या एअर कूलर्सच्या विक्रीत तेजी येण्याचे अनुमानतीन वर्षात १० टक्क्यांहून जास्त बाजारपेठ हिस्सेदारी मिळवण्याचे उद्दिष्ट 

मुंबई, ३० मे २०२२: उष्णतेच्या तीव्र लाटेने एअर कूलर्ससारख्या कूलिंग उत्पादनांच्या विक्रीत चांगलीच तेजी आणली आहे. गोदरेज समूहातील प्रमुख कंपनी गोदरेज अँड बॉयसच्या गोदरेज अप्लायन्सेसने देशात महामारी येण्याच्या काही काळ आधी आपले एअर कूलर्स बाजारपेठेत दाखल केले होते आणि यंदा या एअर कूलर्ससाठी महामारीचा वेढा नसलेला पहिला उन्हाळा आहे.

गोदरेज अँड बॉयसच्या गोदरेज अप्लायन्सेसचे बिझनेस हेड आणि एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट श्री कमल नंदी यांनी सांगितले"उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे कूलिंग उत्पादनांच्या विक्रीत तेजी आली आहेपण सर्व उपकरणांच्या किमतींमध्ये वाढ झाल्याने त्यांच्या किफायतशीरपणावर परिणाम होत आहे. हीच वेळ आहे जेव्हा प्रीमियम आणि जास्त विकल्या जाणाऱ्या श्रेणी पुढे करण्याचे धोरण उपयोगी ठरते.  एअर कंडिशनरमध्ये आधीपासून आणि आता एअर कूलरमध्ये देखील स्थान निर्माण केल्यामुळे आम्ही सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी कूलिंग उत्पादने सादर करण्यात सक्षम बनलो आहोत.  गोदरेज एअर कूलरसाठी हा पहिला उन्हाळा आहे आणि याची कामगिरी खूपच उत्साहवर्धक आहे.  पुढील ३ वर्षात १० टक्क्यांहून जास्त बाजारपेठ हिस्सेदारी मिळवण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्याचा विश्वास या श्रेणीने आम्हाला मिळवून दिला आहे."

गोदरेज अप्लायन्सेसचे प्रॉडक्ट ग्रुप हेड - एअर कूलर्स श्री अमित जैन म्हणाले, "गेल्या दोन वर्षात महामारीने सर्वांना आपल्या विळख्यात पकडले होतेपण यंदा उन्हाळ्यात एअर कूलर्सच्या मागणीत चांगली तेजी आली आहे.  आज सर्व ग्राहक उष्णतेपासून वाचण्यासाठी उपाय शोधत आहेत आणि आवश्यकतांव्यतिरिक्त इतर ठिकाणी केले जाणारे खर्च एअर कूलर्ससारख्या कूलिंग उत्पादनांवर केले जात आहेत.  किमती आणि देखरेखीचा खर्च किफायतशीर असणे हा एअर कूलर्सचा एक फायदा आहे. भारतभर गोदरेजचे मजबूत विक्री व सेवा नेटवर्क सर्वदूरपर्यंत पसरले आहेत्याचा आम्ही उपयोग करत आहोत शिवाय आमच्या एअर कूलर्ससाठी नवे विक्री नेटवर्क देखील तयार करत आहोत. आमच्या पोर्टफोलिओमध्ये डेझर्ट कूलर सेगमेंट आहे ज्यामध्ये मेकॅनिकलइलेक्ट्रॉनिक आणि हाय-एन्ड पर्याय उपलब्ध आहेत.  सर्व स्तरांमधील ग्राहकांकडून याला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे."

इन्व्हर्टर तंत्रज्ञानासह गोदरेज एअर कूलर अधिक गारवा आणि ऊर्जेमध्ये अधिक बचत असे लाभ प्रदान करतात.  विजेची बचत वाढवण्यासाठी एअर कूलरमध्ये एसीमधील इन्व्हर्टर तंत्रज्ञान प्रस्तुत करणारा हा पहिला ब्रँड आहे. याशिवायकुशलतेने डिझाईन करण्यात आलेले आईस ड्रीप तंत्रज्ञान१८ इंचांचे एरो-डायनामिक ब्लेड्स आणि ऑटो कूल तंत्रज्ञान यांच्यासह कुशल संचालन व अधिक चांगल्याप्रकारे गारवा असे लाभ यामध्ये मिळतात.  हरित वातावरण निर्माण करण्याच्या ब्रँडच्या वचनबद्धतेला अनुसरून निवडक मॉडेल्समध्ये नवीन इको मोड फंक्शन आहे जे ऊर्जा व पाणी यांची बचत करत जितके जास्त शक्य होतील तितके कूलिंग देण्यासाठी एअर कूलरला सक्षम बनवते.  यामध्ये विशेष अँटी-बॅक्टेरियल टॅंक पाण्याच्या टाकीमध्ये बॅक्टेरिया निर्माण होऊ देत नाहीयामुळे ताजी व शुद्ध हवा मिळत राहते. ग्राहकांच्या आरोग्यावर आणि स्वच्छतेवर भर देण्याच्या ब्रँड धोरणाला अनुसरून या सुविधा देण्यात आल्या आहेत.  आधुनिकआकर्षक डिझाईन व मजबुती असलेले हे कूलर अनेक आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहेत.

Comments

Popular posts from this blog

Mukka Proteins Limited

GJEPC Unveils Exclusive Gem & Jewellery Show..

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार