'हृदयी प्रीत जागते’ ही मालिका माझ्यासाठी एक वेगळाच अनुभव आहे: पूजा कातुर्डे

'हृदयी प्रीत जागते’ ही मालिका माझ्यासाठी एक वेगळाच अनुभव आहेपूजा कातुर्डे

झी मराठी वाहिनीवर 'हृदयी प्रीत जागते’ ही मालिका ७ नोव्हेंबर रात्री  ८ वा. प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेह्या मालिकेत अभिनेत्री पूजा कातुर्डे आपल्याला मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.  पूजा कातुर्डे ने मालिकावेब सिरीज आणि नाटकांमध्ये काम केले आहेआणि झी मराठी बरोबर ही पहिलीच मालिका आहेया मालिकेबद्दल व आपल्या प्रवासा बद्दल बोलताना पूजा म्हणाली की, 'हृदयी प्रीत जागते’ ही मालिका एक संगीतमय प्रेम कथा आहे त्यात वीणा ही अतिशय साधी मुलगी आहे आणि ती तिच्या बाबांची खूब लाडकी आहेवीणा लहानपणापासून आईच्या प्रेमाला मुकलेय त्यामुळे बाबाच तिच्यासाठी सर्वस्व आहेतवीणाचे वडील कीर्तनकार आहेततिला कीर्तनाची आवड आहेकौटुंबिक संबंध मजबूत आणि एकजूट ठेवणे हे तिचे ध्येय आहेया मालिकेत  वीणा आणि प्रभास ते दोघेही त्यांच्या स्वभावातजीवनशैलीत वेगळे ध्रुव आहेतपण संगीत हा त्यांच्यातील एकमेव समान धागा आहेवीणा कीर्तनकार आहे तर प्रभास रॉक बँड परफॉर्मर आहेते दोघेही संगीतासाठी वचनबद्ध आहेतहे पात्र साकारण्यात मला खूप मज्जा येतेय आणि हि मालिका माझ्यासाठी महत्त्वाची आहे कारण ती अतिशय अनोखी व्यक्तिरेखा साकारत आहेया नव्या पात्रात प्रेक्षकांसमोर आल्याचा  मला खरोखर आनंद आहे आणि मला खात्री आहे प्रेक्षकांना ही मालिका नक्कीच आवडेल.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Cityflo & Salaam Bombay Foundation

मुलूंडच्या 'विठू माऊली' समूहाची सलग पाचवी वारी