फॉर्मातील एफसी गोवाचा आज केरळ ब्लास्टर्सशी सामना..

फॉर्मातील एफसी गोवाचा आज केरळ ब्लास्टर्सशी सामना 

12 नोव्हेंबर, 2022: हीरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) 2022-23 च्या यंदाच्या हंगामातील मॅचवीक 6 मधील एका रंगतदार सामन्यात रविवारी (13 नोव्हेंबर) फॉर्मात असलेला एफसी गोवा संघ केरळ ब्लास्टर्स एफसीशी दोन हात करेल. 


ब्लास्टर्सच्या माहेरघर (होमग्राउंड) असलेल्या कोची येथील जवाहरलाल नेहरू इंटरनॅशनल स्टेडियमवर होणार्‍या लढतीचा यजमानांना थोडा फायदा होईल. मात्र, हंगामातील चौथ्या विजयासाठी उत्सुक असलेला पाहुणा गौर्स क्लब सातत्य राखण्यादृष्टीने मैदानात उतरेल. 


सध्या 4  सामन्यांतून 9 गुणांसह क्रमवारीत तिसर्‍या स्थानावर असलेल्या कार्लोस पेन आणि त्यांच्या प्रशिक्षकपदाखालील एफसी गोवा क्लब आणखी एका विजयासह एटीके मोहन बागानला (5 सामन्यांत 10 गुण) मागे टाकून गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावण्यास उत्सुक आहेत. तसेच झाल्यास प्ले-ऑफमधील दावेदारी आणखी मजबूत होईल. शिवाय आणखी एक अवे विजय एफसी गोवा आणि कंपनीचा आत्मविश्वास उंचावण्यास पुरेसा ठरेल. 

गॅफर म्हणतो.. 

रविवारच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला एफसी गोवाचे प्रशिक्षक पेना यांनी क्लबच्या क्षमतेवर तसेच सांघिक कामगिरीवर विश्वास दाखवला आहे. मात्र, प्रतिस्पर्ध्यांना कमी लेखण्यास ते तयार नाहीत. केरळ ब्लास्टर्स कडवी लढत देऊ शकतात हे देखील त्यांनी कबूल केले. 

 

यंदाच्या हंगामाची आश्वासक सुरुवात पाहता आमच्या संघाचा आत्मविश्वास पूर्णपणे उंचावलेला आहे. सर्व खेळाडू फॉर्मात आहेत. सांघिक कामगिरीही चांगली होत आहे. मात्र, सातत्य राखण्याचे मोठे आव्हान प्रत्येक संघासमोर असते. परंतु, तीन सामन्यांत विजय मिळाला असला तरी अद्याप सुधारणा आवश्यक आहे. चुकांमधून बोध घेतल्यास आम्हाला सर्वकाही सोपे जाईल, असे पेना पुढे म्हणाले. 

 

आम्ही आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांपैकी ब्लास्टर्सविरुद्धचा  सामना सर्वात कठीण असणार आहे. आम्ही त्यांना अशा प्रकारे सामोरे जाणार आहोत, हे फार महत्त्वाचे आहे. मी संघाच्या कामगिरीवर खूश आहे जमशेदपूर एफसी विरुद्धच्या घरच्या सामन्याप्रमाणेच खेळण्याला आमचे प्राधान्य राहील, असे 38 वर्षीय पेना म्हणाले. 

 

पुढील सामन्यात एका अव्वल प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध एका चांगल्या स्टेडियममध्ये आणि एका सर्वोत्तम वातावरणामध्ये खेळताना नेमके काय करायला हवे, याची आम्हाला जाणीव आहे, असे एफसी गोवाच्या प्रशिक्षकांनी सांगितले. 

पुढील आव्हान 

चेंडू अधिकाधिक वेळ आपल्याकडे ठेवणे, हा एफसी गोवा आणि केरळ ब्लास्टर्स या दोन्ही क्लबच्या खेळण्याच्या शैलीचा कॉमन भाग आहे. मात्र, त्यातही खूप फरक आहे. आक्रमण अधिक तेज करून प्रतिस्पर्ध्यांवर दडपण आणणे, गौर्सना आवडते. दुसरीकडे, इव्हान वुकोमानोविक यांच्या प्रशिक्षकपदाखालील क्लब त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध गोल करण्यासाठी संक्रमणाच्या वेगावर अवलंबून असतात. 

 

मात्र, दक्षिणेकडील क्लब असलेल्या केरळचा हरवलेला फॉर्म हा वुकोमॅनोविक यांच्यासाठी चिंतेची बाब आहे. ईस्ट बंगाल एफसीला हरवून ब्लास्टर्सनी 2022-23 हंगामाची आश्वासक सुरुच्वात केली तरी त्यांना पुढील तीन सामन्यांत पराभव पाहावा लागला. मागील सामन्यात नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसीवर मात करताना केरळने सलग तीन पराभवांची मालिका खंडित केली. 

 

मागील सामन्यात गवसलेला सूर तसेच घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा केरळ संघाला एफसी गोवाविरुद्ध होउ शकतो. मात्र, सातत्य राखण्याचे आव्हानही यजमानांसमोर असेल. 

 

अल्वारो वाझक्वेझ, इकर ग्वारोटक्सेना आणि नोआ सदाउई ही फॉर्मात असलेली आक्रमण फळी ही एफसी गोवाची सर्वात जमेची बाजू आहे. या परदेशी खेळाडूंना ब्रँडन फर्नांडिस, रिडीम त्लांग, माकन चोथे आणि ब्रिसन फर्नांडिस या भारतीय सहकार्‍यांची चांगली साथ लाभली आहे. 

 

मिडफिल्डमध्ये, आयुष छेत्री एडू बेडिया सोबत प्रभावी ठरला आहे आणि रविवारी यंदाच्या हंगामातील सलग तिसरी आश्वासक सुरुवात करण्यास तो उत्सुक आहे. सर्व खेळाडू त्यांचा फॉर्म राखून प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखतील, असा क्लब व्यवस्थापनाला विश्वास वाटतो. 

 

एफसी गोवाच्या आतापर्यंतच्या कामगिरीचा एक अधोरेखित पैलू म्हणजे बचाव. त्यांनी आतापर्यंत 4  सामन्यांमध्ये फक्त 2 गोल खाल्ले (कन्सिड) आहेत. गोलरक्षक धीरज सिंग याने अव्वल फॉर्म मिळवला आहे आणि त्याला सेरिटन फर्नांडिस, अन्वर अली, मार्क व्हॅलिएंटे, फारेस अर्नाउट आणि आयबन्भा डोहलिंग या खेळाडूंनी चांगला पाठिंबा दिला आहे. 

 

केरळ ब्लास्टर्स विरुद्धचा सामना सेरिटनसाठी विशेष असू शकतो. त्याचा एफसी गोवासाठी 100 वा आयएसएल सामना आहे. इंडियन सुपर लीगमध्ये एखाद्या क्लबकडून 100 किंवा त्याहून अधिक सामने खेळणारा  तो केवळ दुसरा फुटबॉलपटू असेल. 

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO