*आजपासून मिशन खेलो इंडिया युथ गेम्स: महाराष्ट्र  पदकाच्या त्री-शतकासाठी सज्ज; खो-खो संघांना विजयी सलामीची संधी*

आजपासून पाचव्या सत्रातील खेलो इंडिया युथ गेम्स

विशेष प्रतिनिधी/ जबलपूर 

दोन वेळचा चॅम्पियन महाराष्ट्र संघ  पाचव्या सत्रातील खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये विक्रमी पदकांची कमाई करण्यासाठी सज्ज झाला आहे. आज सोमवारपासून पाचव्या सत्रातील खेलो इंडिया युथ गेम्स ला सुरुवात होत आहे. चार वेळच्या चॅम्पियन महाराष्ट्र महिला व पुरुष खो-खो संघांना पहिल्याच दिवशी विजय सलामीची मोठी संधी आहे. जानकी पुरस्कार विजेती जान्हवी पेठेच्या नेतृत्वात महाराष्ट्र महिला संघ जबलपूरच्या मैदानावर सलामी सामन्यात तामिळनाडू विरुद्ध मोठ्या विजयासाठी सज्ज झाला आहे. वीर अभिमन्यू पुरस्कार विजेता नरेंद्र आपल्या नेतृत्वात महाराष्ट्र संघाला तेलंगणा विरुद्ध विजय मिळवून देण्यासाठी उत्सुक आहे.

महाराष्ट्र खोखो संघ उघडणार विजयाचे खाते

आतापर्यंत खेलो इंडिया स्पर्धेत सोनेरी यशाचा पल्ला गाठणारा महाराष्ट्र महिला व पुरुष खो-खो संघ विजयाचे खाते उघडण्यासाठी सज्ज झाला आहे. मुख्य प्रशिक्षक मनीषा मानकर, प्रशांत पवार, संजय मुंडे आणि संतोष वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन्ही संघांनी पुण्याच्या बालेवाडीत कसून सराव केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र संघाला सलामी सामन्यात मोठ्या विजयाची संधी आहे.

जान्हवी तिसऱ्यांदा स्पर्धेत, प्रिती, संपदामुळे महिला संघ मजबूत

जानकी पुरस्कार विजेती जान्हवी महाराष्ट्र महिला संघाचे नेतृत्व करणार आहे. तिच्यासोबतच संघामध्ये जानकी पुरस्कार विजेते प्रीती अश्विनी आणि संपदा मोरे यांचा समावेश आहे. त्यामुळे महिला संघाला किताबाचा प्रभाव दावेदार मानले जात आहे. 

नरेंद्रची हॅट्रिक; आदित्य, किरण, सचिन फार्मात

वीर अभिमन्यू पुरस्कार विजेता नरेंद्र हा तिसऱ्यांदा या स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून खेळत आहे. त्यामुळे या हॅट्रिकच्या स्पर्धेत संघाला सोनेरी यश मिळवून देण्याचा त्याचा निर्धार आहे. सोबतच वीर अभिमन्यू पुरस्कार विजेता किरण वसावे, आदित्य आणि सचिन पवार यांचाही समावेश आहे. त्यामुळे संघाला निर्विवादपणे आपले वर्चस्व कायम ठेवत सोनेरीय संपादन करण्याची मोठी संधी आहे.

महाराष्ट्राचे ३७७ खेळाडू सहभागी

आतापर्यंत दोन वेळा २०० पेक्षा अधिक पदकांची कमाई करणाऱ्या महाराष्ट्र संघाची नजर आता मध्य प्रदेशातील स्पर्धेत पदकांचे तिहेरी शतक साजरे करण्यावर लागली आहे.  या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचा ३७७ सदस्य संघ सहभागी होणार आहे. 

दोन वेळा महाराष्ट्र संघ चॅम्पियन

महाराष्ट्राच्या युवा खेळाडूंची केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या वतीने आयोजित खेलो इंडिया युथ गेम्स मधील कामगिरी उल्लेखनीय ठरलेली आहे. तळागाळातील गुणवंत युवा खेळाडूंनी २०१९ आणि २०२० मध्ये महाराष्ट्राला चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवून दिला. २०२० मध्ये गुवाहाटी येथे झालेल्या स्पर्धेदरम्यान महाराष्ट्र संघाने विक्रमी २५६ पदकांची कमाई केली होती. या दरम्यान महाराष्ट्र संघाने ७८ सुवर्णपदकांचा बहुमान पटकावला होता. तसेच २०१९ मध्ये पुणे येथील स्पर्धेत महाराष्ट्र संघ २२८ पदकांसह सर्वसाधारण विजेतेपदाचा मानकरी ठरला होता.

योगासन, मल्लखांब, कुस्ती, कबड्डीमध्ये प्रबळ दावेदार

पारंपारिक वारसा लाभलेल्या योगासन मल्लखांब या खेळ प्रकारात महाराष्ट्राचे खेळाडूंनी गुजरातीतील नॅशनल गेम्स मध्ये सोनेरी यशाचा पल्ला गाठला. त्यामुळे आता याच कामगिरीला उजाळा देण्यासाठी महाराष्ट्राचे खेळाडू सज्ज झाले आहेत. यातून महाराष्ट्र संघाला योगासन, मल्लखांब, कबड्डी, खो-खो आणि कुस्ती या खेळ प्रकारात सोनेरी ही यशाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. मल्लखांब आणि योगासन या खेळामध्ये महाराष्ट्राचे युवा खेळाडू निश्चितपणे मोठ्या संख्येत पदकांची कमाई करताना दिसतील.

निश्चितपणे महाराष्ट्र संघाला सर्वसाधारण विजेतेपद मिळेल: क्रीडा आयुक्त

गुजरात येथील नॅशनल गेम आणि महाराष्ट्र राज्य ऑलम्पिक स्पर्धेदरम्यान युवा खेळाडूंनी प्रचंड मेहनत करत मोठे यश संपादन केले आहे. त्यामुळे याच कामगिरीला उजाळा देत महाराष्ट्राचे खेळाडू मध्य प्रदेश येथील खेलो इंडिया युथ गेम्स गाजवतील. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या सराव शिबिरातून हे खेळाडू कसून मेहनत करत आहेत. तज्ञ प्रशिक्षक आणि अत्याधुनिक सुविधांच्या माध्यमातून हे खेळाडू आपल्या गुणवत्तेचा दर्जा उंचावत आहेत.यातून महाराष्ट्र संघ निश्चितपणे या स्पर्धेदरम्यान सर्वसाधारण विजेते पदाचा मानकरी ठरेल, असा विश्वास क्रीडा आयुक्त डॉ.सुहास दिवसे यांनी व्यक्त केला.

२२ खेळामध्ये महाराष्ट्राचे ३७७ खेळाडू

मध्यप्रदेश येथे आयोजित पाचव्या खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये महाराष्ट्राचे ३७७ खेळाडू सहभागी होणार आहेत. हे खेळाडू २२ खेळ प्रकारात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील. यामध्ये टेबल टेनिस, खो- खो, बॉक्सिंग, बास्केटबॉल, बॅडमिंटन, तिरंदाजी, नेमबाजी, कयाकिंग व कनोइंग, योगासन, गटका, सायकलिंग ट्रॅक, ॲथलेटिक्स, कबड्डी, वेटलिफ्टिंग, लॉन टेनिस, मल्लखांब, तलवारबाजी, कुस्ती आणि जलतरण या खेळ प्रकारांचा समावेश आहे.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Racks & Rollers..

Retail Jeweller MD & CEO Awards 2024: Excellence takes the spotlight